एखाद्या टीव्ही कमर्शिअलमध्ये मऊ, मुलायम हात पाहिले की, असे हात आपले का नाहीत असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. पण तुम्ही नियमित हातांची योग्यपद्धतीने काळजी घेतली तर तुमचे हातही मऊ मुलायम राहतील. घरी राहून आणि कोणत्याही महागड्या गोष्टींचा वापर न करता तुम्ही हातांची काळजी घेऊ शकता. योग्यपद्धतीने ही काळजी कशी घ्यायला हवी ते आता आपण जाणून घेऊया.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल
हातांना करा मसाज
चेहऱ्याप्रमाणे तुमच्या हातांनाही मसाजची गरज असते. आंघोळीनंतर आणि झोपताना हातांना मसाज करायला विसरु नका. हा मसाज म्हणजे फार वेळ करण्याची गोष्ट नाही. बोटांपासून सुरु करुन हाताच्या कोपऱ्यापर्यंत तुम्ही हातांना मसाज करा. मोजून 10 वेळा तुम्ही असे केले तरी चालेल. हे करण्यासाठी फार फार 2 मिनिटं लागतात. मसाजमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळतो शिवाय तुमची त्वचा रिलॅक्स होऊन त्यातील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुमच्या आवडते मॉश्चराईजर घेऊन तुम्ही हातांना मसाज करा.
नेहमी करा मॉश्चराईज
बरेचदा हात रुक्ष वाटतात त्याचे पहिले कारण म्हणजे तुमच्या त्वचेतील मॉश्चर कमी झालेले असते. तुमच्या त्वचेला मॉश्चराईज करण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या मॉईश्चरायझरचा उपयोग करु शकता. जर तुम्हाला मॉश्चराईजर आवडत नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करु शकता. खोबरेल तेल हे त्वचेमध्ये मॉस्चरायझर आणण्यासाठी पुरेसे आहेत. अगदी कमीत कमी तेलाचा उपयोग करुन तुम्ही त्वचा मॉश्चराईज करु शकता. तुम्ही मॉश्चराईजर लावण्याचे काम रात्री केल्यास उत्तम! कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवरील मॉश्चराईजर टिकून राहण्यास मदत मिळेल.
तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ
नखं ठेवा स्वच्छ
नखं रुक्ष आणि घाण दिसण्यामागे नखांचाही मोठा हात असतो. जर तुमची नखं अस्वच्छ असतील तरी देखील तुमचे हात रुक्ष आणि अनाकर्षक दिसतात. त्यामुळे हात सुंदर आणि मुलायम दिसावे असे वाटत असतील तर तुम्ही तुमची नखं स्वच्छ ठेवा. नखांची योग्य काळजी घ्या. नखं हेल्दी असतील तर हात सुंदर दिसतात. त्यामुळे नखं फाईल करणे, नखांमधील घाण काढणे, क्युटीकल काढणे अशी सगळी कामं तुम्ही योग्यवेळी केल्यास हात चांगले राहतात. त्यामुळे वेळोवेळी हातांची निगा राखत राहा.
मेनिक्युअर आहे तुमच्यासाठी बेस्ट
हातांच्या सौंदर्याबाबत तुम्ही अधिक आग्रही असाल तर तुम्ही दर महिन्याला मेनिक्युअर करा. मेनिक्युअर केल्यामुळे तुमच्या नखांवरील क्युटिकल काढले जाते. नखांखाली वाढलेली मृत त्वचा काढली जाते. शिवाय यामध्ये मसाज आणि स्क्रब असल्यामुळे तुमचे हात अधिक आकर्षक दिसायला लागतात. त्यामुळे शक्य असल्यास महिन्यातून एकदा घरच्या घरी किंवा प्रोफेशनल्सची मदत घेऊन मेनिक्युअर करा. जर तुमच्या बजेटमध्ये हे बसत नसेल तर आम्ही घरच्या घरी मेनिक्युर कसे करावे हे देखील तुमच्यासोबत शेअर केले आहे.
आता तुमचे हात रुक्ष वाटत असतील तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने हातांची काळजी घ्या.
झोपताना लावा हा अप्रतिम फेसमास्क, मिळेल तजेलदार त्वचा
तुमच्या त्वचेसाठी उत्तम मॉश्चरायझर शोधत असाल तर तुम्ही माय ग्लॅमचे हे उत्पादन नक्की ट्राय करु शकता.