ADVERTISEMENT
home / Fitness
हातावरील चरबी घालवा व्यायामाशिवाय, उत्तम पर्याय

हातावरील चरबी घालवा व्यायामाशिवाय, उत्तम पर्याय

चरबी खरं तर अंगावर कुठेच चांगली वाटत नाही. पण हातावरील चरबी अधिकच त्रासदायक ठरते. तुम्हालाही हातावरील जमा झालेली चरबी कमी करायची असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा.  निरोगी, सुंदर आणि तरूण त्वचा हवी असेल तर आजकाल प्रदूषण, सूर्यकिरण, केमिकलयुक्त उत्पादन आणि असंतुलित आहार या सगळ्यामुळे चरबी कमी करणं ही अशक्यप्राय गोष्ट होत चालली आहे. हे तुमच्या त्वचेला अधिक निस्तेज करते आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त त्रास होतो.  तसंच अंगावरील चरबी कमी करणं हे सोपं नाही. त्यातही हातावरील चरबी कमी करणं. अनेक ट्रिटमेंटचा दावा असतो की, चरबी कमी करता येते पण त्याचे दुष्परिणाम फारच वाईट असतात. पण तुम्हाला हातावरील चरबी व्यायामाशिवाय कमी करायची असेल तर आमच्याकडे उत्तम पर्याय आहे. तुम्ही त्याचा अवलंब केलात तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. काही घरगुती उपायांचा तुम्ही नियमित वापर केल्यास, तुम्हाला तुमच्या हातावरील चरबी कमी करता येईल आणि त्रासही होणार नाही. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. 

हॉट टॉवेल ट्रिटमेंट

वाफ घेऊन हातावरील चरबी कमी करता येऊ शकते. आता हे कसं असा प्रश्न येणं साहजिक आहे. हॉट टॉवेल ट्रिटमेंट करताना त्वचेवर येणारा घाम शरीरातील चरबी बाहेर आणतो आणि त्वचा अधिक सुंदर बनवितो. तसंच त्वचेला रेजुवेनेट करण्याचे आणि त्वचा अधिक कसदार करण्याचे कामही या ट्रिटमेंटमध्ये होते. सर्वात पहिले एका पॅनमध्ये पाणी उकळून घ्या.  नंतर थोडंसं थंड होऊ द्या. आता त्यामध्ये एक टॉवेल बुडवा.  बाहेर काढून पाणी पिळा आणि हातावर लावा. चांगल्या परिणामासाठी  असे साधारणतः 3-4 वेळा करा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय केलात तर तुम्हाला त्याचा जास्त चांगला परिणाम दिसून येईल.

हातावरची चरबी महिनाभरात करा कमी, जाणून घ्या (How To Reduce Arm Fat In Marathi)

हळद

ADVERTISEMENT

Shuttestock

कित्येक वर्षांपासून त्वचेशी संबंधित समस्यांवर हळदीचा प्रयोग केला जातो. यामध्ये अँटिबॅक्टेरियल घटक आढळतात जे त्वचेला कोणत्याही सूज येण्यापासून दूर ठेवतात. हातावरील चरबी कमी करण्यसाठीही याचा उपयोग होतो. यासाठी 1 चमचा हळद, 1 चमचा दही आणि 1 चमचा बेसन घ्या. हे सर्व साहित्य एका वाटीत मिक्स करून घ्या. यामध्ये  एकही गुठळी राहू देऊ नका. तुम्हाला हे पीठ जाडसर बनवायचे असेल तर तुम्ही यात थोडे अधिक दही मिक्स करू शकता. ही जाडसर पेस्ट हाताला लावा आणि साधारण 20 मिनिट्स सुकू द्ाय.  त्यानंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून हा प्रयोग तुम्ही दोन वेळा करून पाहा. याशिवाय ही गोष्ट लक्षात ठेवा हळदीचं प्रमाण जास्त घेऊ नका.  अन्यथा त्वचा पिवळसर दिसू शकते.  यामुळे तुमच्या अंगातील उष्णता कमी होऊन हातावरील चरबी कमी करता येते. 

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय (How To Reduce Face Fat In Marathi)

ग्लिसरीन

ADVERTISEMENT

Shutterstock

ग्लिसरीन त्वचेला मॉईस्जराईज करते. तसंच त्वचा अधिक कसदार करण्यासाठी ग्लिसरीनचा उपयोग होतो. 1 चमचा ग्लिसरीन घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला. एका वाटीत हे तयार मिश्रण असेल त्यात कापूस बुडवा आणि आपल्या हातावर लावा.  लक्षात ठेवा की,  हे पूर्ण हातावर लावा. साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा आणि त्वचेमध्ये हे शोषून घेऊ द्या. त्यानंतर थंड पाण्याने पुन्हा हात धुवा.  आठवड्यातून तुम्ही 3-4 वेळा हा प्रयोग करून पाहा. यामुळे हातावरील चरबी कमी होऊन तुमच्या त्वचेवर चमकही येईल. 

दूध

Shutterstock

ADVERTISEMENT

दूध त्वचेमध्ये अधिक चमक आणते आणि त्वचा टोन्ड करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 1 चमचा दूध आणि त्यामध्ये 1 चमजा मध मिक्स करून घ्या. हे हातावर लावा आणि हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. 10 मिनिट्सनंतर कोमट पाण्याने हात धुवा. यामुळे तुम्ही डबल चिनपासूनही सुटका मिळवू शकता.  योग्य परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग आपल्या हातावर करू शकता. 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस

अंडे

Shutterstock

ADVERTISEMENT

अंड्याचा सफेद भाग त्वचेवरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अंड्याचा सफेद भाग त्यामध्ये 1 चमचा दूध आणि 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिक्स करून फेटून घ्या. सर्व नीट एकत्र झाले की हा मास्क हातावर लावा. अर्धा तास तसाच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा.  योग्य परिणामांसाठी तुम्ही रोज हा प्रयोग हातांवर करा. तुम्हाला लवकरच हातावरील चरबी कमी झालेली दिसून येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT