अंडरआर्म्समधील सुरकुत्या अशा करता येतील कमी

अंडरआर्म्समधील सुरकुत्या अशा करता येतील कमी

स्वच्छ, नितळ अंडरआर्म्स हे आपल्या सगळ्यांनाच हवे असतात. अंडरआर्म्सची थोडीशी काळजी घेतली की, अंडरआर्म्स चांगलेही दिसू लागतात. अंडरआर्म्स काळवंडणे ही एकमेव अंडरआर्म्ससंदर्भातील समस्या नाही. तर या व्यतिरिक्तही अंडरआर्म्सचे काही त्रास असतात. त्यातीलच एक म्हणजे अंडरआर्म्सला सुरकुत्या पडणे. त्वचेवर सुरकुत्या असणे हे कधीच चांगले नाही. जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या अधिक असतील तरी देखील तुमचे अंडरआर्म्स आकर्षक दिसत नाहीत. हात वर केल्यानंतर तुमच्या अंडरआर्म्सला सुरकुत्या दिसत असतील तर या सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही काही काळजी घ्यायला हवी. ही काळजी कोणती ते आता पाहुयात. 

अंडरआर्म्स काळवंडलेत? मग रोजच्या रोज अशी घ्या काळजी

अंडरआर्म्स सुरकुत्या पडण्याची कारणं

Instagram

  • अंडरआर्म्समध्ये सुरकुत्या पडण्याचे पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे वजन वाढणे. वजन वाढल्यामुळे शरीराला वळकट्या पडतात. अंडरआर्म्समध्येही हे फॅट वाढत राहते. त्यामुळे त्या टिकाणी सुरकुत्या पडतात 
  • वजन एकदम कमी होणे हे देखील अंडरआर्म्समधील सुरकुत्या पडण्यासाठी कारणीभूत आहे.  वजन कमी झाल्यानंतर  त्वचा सैल पडते आणि सैल पडते त्यामुळेही त्या ठिकाणी सुरकुत्या येतात. 
  • तुमच्या चालण्याची आणि बसण्याची पद्धतही तुमच्या सुरकुत्यांसाठी कारणीभूत असतात. जर तुम्ही पोक काढून चालत असाल तर तुमचा हा ताण तुमच्या अंडरआर्म्सवर येतो.
  • तुमचे कपडे हे देखील तुमच्या अंडरआर्म्सच्या सुरकुत्यांसाठी कारणीभूत असतात. कपडे जास्त घट्ट असतील तरी देखील तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. अंडरआर्म्समध्ये कपडे लागून लागून तुम्हाला जखमा होतात आणि  सुरकुत्या पडतात

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या (How To Clean Underarms In Marathi)

अंडरआर्म्समधील सुरकुत्या अशा करा कमी

Instagram

  • अंडरआर्म्समधील सुरकुत्या कमी करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे मसाज. रात्री झोपताना आवडीचे कोणतेही तेल किंवा मॉश्चरायझर घेऊन त्याचा उत्तम मसाज करा. अंडरआर्म्समधील सैल झालेली त्वचा थोडीशी पूर्ववत करण्यास ती नक्कीच मदत करेल.
  • व्यायामाने देखील तुम्हाला अंडरआर्म्सच्या सुरकुत्या कमी करता येतात. पुशअप्स किंवा नी पुशअप्स हे असे व्यायामप्रकार आहेत ज्यामुळे तुमच्या छाती आणि अंडरआर्म्समधील त्वचा घट्ट होते.  त्यामुळे सुरकुत्या दिसत नाहीत.
  • अंडरआर्म्समधील केस काढताना सतत एकाच जागी रेझर फिरवू नका. त्यामुळेही तुमची त्वचा नाजूक होते. त्वचा अधिक नाजूक झाल्यामुळे तेथे रॅशेश येतात. हे रॅशेश वाढले की, अंडरआर्म्समध्ये सुरकुत्या वाढतात .
  • स्क्रब करा आणि अंडरआर्म्स स्वच्छ करा.अंडरआर्म्समध्ये घाण तशीच राहिली तरी देखील अंडरआर्म्समध्ये रॅशेश होतात. त्यामुळे अंडरआर्म्स स्वच्छ करुन ते पुसून कोरडे करा. पण तेथील त्वचा मॉश्चराईज करायला विसरु नका. 

आता अंडरआर्म्समध्ये सुरकुत्या असतील तर त्याची कारणे जाणून त्यावर योग्य तो उपाय योग्य वेळी करा. 

काखेतून येतोय घामाचा दुर्गंध, करा सोपे घरगुती उपाय (How To Get Rid Of Underarms Smell)

 

 

 

 

Beauty

GLOW IRIDESCENT BRIGHTENING MOISTURISING CREAM

INR 1,595 AT MyGlamm