त्वचा अधिक कसदार (टाईट) करण्यासाठी सोप्या टिप्स (Skin Tightening Tips In Marathi)

Skin Tightening Tips In Marathi

आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्वचा कसदार न राहणं या गोष्टी सुरू होतातच. साधारण वयाच्या तिशीनंतर चेहऱ्यावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. विशेषतः त्वचा सैल पडण्यास सुरूवात होते. जो प्रत्येकासाठी चिंतेचा विषय आहे. ज्यांना आपण नेहमी तरूण दिसावं असं वाटतं त्यांच्यासाठी तर अगदीच त्रासदायक ठरतं. त्यामुळे त्वचा अधिक कसदार अर्थात टाईट करण्यासाठी काही सोप्या टिप्स POPxo मराठीची टीम तुम्हाला देत आहे. या टिप्स वापरून तुम्ही घरच्या घरी उपयोग करून तुमची त्वचा अधिक कसदार ठेऊ शकता. या अतिशय सोप्या टिप्स (skin tightening tips in marathi) असून याचा वापर करणंही सोपं आहे. तसंच तुम्हाला तुमच्या घरातील गोष्टींचा वापर करून याचा उपयोग करून घेता येतो. जाणून घेऊया काय आहेत या सोप्या टिप्स.

Table of Contents

  त्वचा टाईट करण्यासाठी काही सोप्या टिप्स (Skin Tightening Tips In Marathi)

  त्वचा सैलसर होणं कोणालाही आवडत नाही. त्यामुळे घरच्या घरी काही सोपे उपाय करता येतात आणि या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देत आहोत. त्वचा टाईट करण्यासाठी तुम्ही काही घरच्या वस्तूंचा उपयोग करून त्वचेची काळजी घेऊ शकता. कशा प्रकारे याचा उपयोग करता येईल ते पाहूया. 

  कॉफी पावडर (Coffee Powder)

  Shutterstock

  अँटिऑक्सिडंट वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट गुण आढळतात. त्यामुळे कॉफीचा उपयोग सैलसर त्वचा टाईट करण्यासाठी करता येतो. सध्या कॉफी स्क्रबची चलती आहे. यामुळे त्वचेमध्ये बराच फरक पडतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी आणि त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. कॉफी स्क्रब घरच्या घरीही तयार करता येतो. त्यामुळे केवळ बाजारात जाऊन आणावा लागेल असा समज करून घेऊ नका.  सोप्या टिप्स अवलंबून तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता. 

  कसा करावा वापर - 

  • पाव कप कॉफी पावडर घेऊन त्यात पाव कप ब्राऊन शुगर आणि दोन चमचे नारळाचे तेल मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या
  • हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा 
  • साधारण 10-15 मिनिट्स तसंच राहू द्या 
  • नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि परिणाम पाहा 

  कोरफड जेल (Aloe-Vera Gel)

  Shutterstock

  कोरफड जेल ही त्वचेसाठी उत्तम मानली जाते. त्वचेच्या कोणत्याही समस्या असतील तर कोरफड जेलचा वापर करणं सोयीस्कर ठरते. कोरफडमध्ये अनेक प्रकारचे फाईटोकेमिकल्स आढळतात, जे त्वचेला सुरक्षा देण्याचे काम करतात. यामुळे त्वचेवर अधिक उजळपणा येतो आणि वाढत्या वयाचा परिणाम कमी होण्यास फायदेशीर ठरते. 

  कसा करावा वापर - 

  • एक कोरफडचे पान कापून त्यातील जेल काढून घ्या 
  • त्यानंतर चेहऱ्याला जेल लावा आणि साधारण 15-20 मिनिट्स तसंच राहू द्या. तुम्हाला हवं तर हलक्या हाताने मालिशही करू शकता
  • नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा 
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करून पाहा.  तुम्हाला याचा उत्तम परिणाम दिसून येईल

  तुरटी (Alum)

  Shutterstock

  त्वचा अधिक कसदार होण्यासाठी तुरटीचा चांगला फायदा मिळतो. कारण यामध्ये अँटिपर्सपिरेंट्स (Antiperspirant) असल्याने त्वचा अधिक कसदार होते. यामध्ये अल्युमिनिअम, जिंक आणि मँगनीज याचा मेळ असल्याने त्वचेला अधिक टाईट ठेवण्यास फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये अल्युमिनिअमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे बऱ्याचजा घरच्या घरी चेहऱ्यावर तुरटीचा वापर करणे उत्तम ठरते. 

  कसा करावा वापर - 

  • तुरटीचा तुकडा पाण्यात बुडवून नंतर चेहऱ्यावर अगदी अलगद रगडा 
  • साधारण 15-20 मिनिट्स तसंच राहू द्या
  • त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्या
  • तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करू शकता. त्वचेवरील जळजळ अथवा लालसरपणादेखील तुरटीच्या वापराने कमी होण्यास मदत मिळते

  टोमॅटो (Tomato)

  Shutterstock

  त्वचा टाईट होण्यासाठी तुम्ही टॉमेटोचाही उपयोग करून घेऊ शकता. टॉमेटोमध्ये विटामिन सी असते, जे त्वचेला अधिक उजळ बनविण्याचे आणि त्वचा अधिक टाईट करण्याचे काम करते. तसंच टॉमेटोमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला अधिक सुंदर बनविण्यास मदत करतात. तसंच टॉमेटो हे अतिशय स्वस्तही असतात आणि खिशाला परवडण्यासारखा उपाय  आहे. 

  कसा करावा वापर - 

  • टॉमेटोचा रस काढून घ्या 
  • कापसाच्या मदतीने तुम्ही टॉमेटोचा रस संपूर्ण चेहऱ्याला लावा 
  • किमान 10-15 मिनिट्स असंच राहू द्या 
  • नंतर थंड पाण्याने धुवा आणि चेहऱ्यामधील फरक पाहा.  तुम्हाला नेहमी असं दिसायचं असेल तर आठवड्यातून  किमान दोन वेळा हा प्रयोग करा 

  लिंबाचा रस (Lime Juice)

  Shutterstock

  विटामिन सी हे त्वचा अधिक कसदार करण्यासाठी उपयुक्त ठरते हे आम्ही तुम्हाला आधीदेखील सांगितले आहे. लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे स्किन टाईटनिंगसाठी लिंबाच्या रसाचा उपयोग करून घेता येतो. घरात कायम उपलब्ध  असणारा आणि पटकन करता येण्याजोगा हा उपाय आहे. त्यामुळे ही सर्वात सोपी टिप म्हणून याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. 

  कसा करावा वापर - 

  • एका लिंबाचा रस काढून घ्या 
  • त्यानंतर त्यात कापूस घालून लिंबाचा रस चेहऱ्याला लावा 
  • साधारण 15 मिनिट्स चेहरा तसाच ठेवा 
  • त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. याचा नियमित वापर तुम्ही करू शकता

  मुलतानी माती (Multani Mitti)

  Shutterstock

  मुलतानी माती त्वचेवर वापरून फायदा मिळतो. यामुळे त्वचेला नैसर्गिक मॉईस्चराईजर मिळते. तसंच मुरूमं हटविण्यासाठी आणि सनबर्नवर उपचार करण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे त्वचा अधिक उजळते आणि एजिंग अर्थात वय कमी दर्शविण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्वचा अधिक कसदार होते आणि मऊ आणि मुलायमही राहाते. 

  कसा करावा वापर - 

  • आवश्यकतेनुसार मुलतानी माती, गुलाबपाणी आणि मध एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण 15-20 मिनिट्स तसंच राहू द्या
  • पेस्ट सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि परिणाम पाहा 

  पपई (Papaya)

  Shutterstock

  वाढत्या वयाचा परिणाम कमी करायचा असेल तर पपई हा उत्तम उपाय आहे. पपई हे विटामिन सी ने युक्त आहे. तसंच स्किन टाईटनिंगसाठी याचा उपयोग होतो.  हे नैसर्गिक असल्याने चेहऱ्याला काही त्रासही होत नाही. तसंच केवळ चेहऱ्याला लाऊनच नाही तर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही नियमित पपईचे सेवनही करायला हवे. यामुळे त्वचा अधिक चांगली राहाते. 

  कसा करावा वापर - 

  • पाव कप पपईचे तुकडे घ्या
  • त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ घालून नीट मॅश करून मिक्स करून घ्या 
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण पंधरा मिनिट्स सुकू द्या 
  • नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता

  दही (Yogurt)

  Shutterstock

  त्वचा अधिक कसदार करण्यासाठी दह्याचा उपयोग करण्यात येऊ शकता. कारण दह्यामध्ये विटामिन सी चा चांगला स्रो आहे. हे त्वचेला सुरक्षा देण्यासह त्वचा कसदार बनविण्याचे काम करते. तसंच दह्यामुळे त्वचा अधिक तजेलदारही दिसते. तुम्हाला जर त्वरीत उजळ त्वचा हवी असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. 

  कसा करावा वापर - 

  • दोन चमचे दही घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा 
  • त्यानंतर हा पेस्टने चेहऱ्याला 10 मिनिट्स हलक्या हाताने मसाज करा 
  • नंतर अजून दहा मिनिट्स तसेच राहू द्या आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवा आणि फरक पाहा

  नारळाचे दूध (Coconut Milk)

  Shutterstock

  असं म्हटलं जातं की नारळाच्या दुधाचा उपयोग स्किन टाईट करण्यासाठी उत्तम आहे आणि यामध्ये कुठेही दुमत नाही. यामध्ये असणारे विटामिन सी आणि नैसर्गिक घटक त्वचा अधिक मऊ,  मुलायम आणि कसदार राखण्यासाठी मदत करतात. 

  कसा करावा वापर - 

  • नारळाच्या दुधात कापूस भिजवा आणि चेहऱ्याला लावा 
  • साधारण पंधरा मिनिट्स सुकू द्या 
  • नंतर पाण्य्याने स्वच्छ धुऊन घ्या

  त्वचा कसदार करण्यासाठी फेसमास्क (Face Mask For Skin Tightening In Marathi)

  चेहऱ्याची त्वचा अधिक टाईट करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही फेसमास्कचाही उपयोग करून पाहू शकता.  तुम्हाला याचा वापर करून त्वचा अधिक कसदार करता येईल. 

  अंड्याचा फेसमास्क (Egg White Mask)

  Shutterstock

  तुम्ही जर विचार करत असाल की चेहऱ्याची त्वचा कसदार कशी करायची तर, एग व्हाईट मास्क अर्थात अंड्याचा मास्क हा उत्तम पर्याय आहे. अंड्याचा सफेद भाग तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो आणि चेहरा अधिक कसदार करतो. 

  • एक अंड्याचा सफेद भाग घ्या आणि त्यात दोन चमचे मध घालून फेसमास्क तयार करा 
  • हा मास्क चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनिट्स तसंच ठेवा 
  • त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा 

  केळ्याचा फेसमास्क (Banana Mask)

  Shutterstock

  पिकलेल्या केळ्यात अनेक पोषक तत्व असतात. विटामिन सी आणि विटामिन ई चा यामध्ये भरणा  असतो. त्यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. त्वचा अधिक कसदार करण्यासाठी केळ्याचा उपयोग करून घ्या. 

  • केळं मॅश करून घ्या आणि त्वचेला लावा 
  • पंधरा मिनिट्स चेहऱ्यावर तसंच ठेवा 
  • त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा 

  मातीचा फेसमास्क (Soil Mask)

  Shutterstock

  अनादी काळापासून चेहऱ्यावर मातीचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये मिनरलचे प्रमाण चांगले असते आणि माती ही त्वचा पुनर्जीवित करण्याचे काम करते. याचा सकारात्मक प्रभाव त्वचेवर दिसून  येतो. म्हणूनच त्वचा टाईट करण्यासाठी  मातीचा वापर करता येतो. 

  • दोन चमचे चिकनी माती पावडर घ्या आणि त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर मिक्स करा 
  • पाणी घालून जाडसर पेस्ट बनवा 
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण 20 मिनिट्स तसंच राहू द्या 
  • नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा 

  त्वचा कसदार करण्यासाठी डाएट (Diet For Skin Tightening In Marathi)

  Shutterstock

  कोणत्याही गोष्टीसाठी आहार योग्य असणं गरजेचे आहे. त्वचा कसदार करण्यासाठी नक्की कोणता आहार घ्यायचा ते आपण जाणून घेऊया.  

  ग्रीन टी - ग्रीन टी रोज तुम्ही प्यायल्यास, सैलसर त्वचा कसदार होण्यासाठी मदत मिळते. तसंच तुम्हाला ताजेतवानेदेखील वाटते 

  केळं - केळ्यामध्ये विटामिन सी, ई आणि ए सारखे  पोषक तत्व आढळतात. त्यामुळे वाढत्या वयाचा  प्रभाव कमी करण्यासाठी केळ्याचा आपल्या आहारात समावेश करून घ्यायला हवा

  टॉमेटो - टॉमेटोमध्ये असणारे विटामिन सी स्किन टाईट करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच सुरकुत्या  घालविण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे आहारात टॉमेटो घ्यावा 

  अंडं आणि मांस - अंडे आणि मांस हे प्रोटीनयुक्त असतात. मांसपेशींसह त्वचा अधिक मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर होताना दिसतो. 

  हिरव्या भाजी - हिरव्या भाज्यांमध्ये मिनरल्स आणि विटामिन्स  भरपूर प्रमाणात आढळतात. यामध्ये विटामिन सी, ई आणि ए असून एजिंगचा प्रभाव कमी करण्यास उपयुक्त ठरते. तसंच त्वचा अधिक कसदार करण्यास उपयोगी ठरते. 

  प्रश्नोत्तरे (FAQs)

  1. स्किन टाईटनिंगसाठी सर्वात जास्त कोणते विटामिन उपयुक्त ठरते?

  स्किन टाईटनिंगसाठी विटामिन सी,  ए आणि डी हे उपयुक्त ठरते. मात्र सर्वात जास्त परिणामकारक ठरते ते म्हणजे विटामिन सी. त्वचा अधिक कसदार होण्यासाठी याचा तुम्हाला जास्त  वापर करून घेता येतो. म्हणूनच विटामिन सी युक्त  पदार्थ जास्त उपयोगी ठरतात. 

  2. त्वचा कसदार करण्यासाठी नारळाच्या तेलाचा उपयोग होतो का आणि कसा वापर करावा?

  हो त्वचा कसदार करण्यासाठी नारळाच्या  तेलाचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. याचा वापर करणंही सोपं आहे. नारळाच्या  तेलाने व्यवस्थित मालिश करून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा आंघोळीला जाण्याआधी  एक तास तुम्ही याचा वापर शरीरावर करा आणि तुम्हाला परिणाम दिसून येईल. 

  3. योगा केल्याने काय फरक पडतो?

  योगा केल्याने तुमची त्वचा अधिक कसदार राहाते आणि सैल पडत नाही. यासाठी तुम्ही भुजंगासन, धनुरासन आणि ब्रिदिंग पोझ याचा आधार घ्यावा. हे योग केल्याने तुमची त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत मिळते.

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक