चमकदार आणि उजळ त्वचा मिळविण्यासाठी महिला बरेचदा पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावर ब्लीच करून घेतात. कोणत्याही कार्याक्रमात जाण्यासाठी अथवा घरातील लग्न, मुंज अशा कार्यक्रमासाठी महिलांना चमकदार त्वचा हवी असते. बाजारामध्ये काही ब्लीच नक्कीच मिळतात. पण यामध्ये अनेक रसायनांचा उपयोग करण्यात आलेला असतो. ज्याचा वापर सतत झाला तर चेहरा खराबही होऊ शकतो. तसंच बाजारातील या ब्लीचमुळे अलर्जी येण्याची शक्यताही असते. ब्लीच करणं प्रत्येकाच्या त्वचेला चांगलं ठरतंच असं नाही. पण त्यामुळे चेहऱ्यावर ब्लीच करायचं नाही असं नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी घरगुती ब्लीचही तयार करून वापरू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवर अलर्जीही येत नाही आणि त्वचा अधिक उजळ आणि चमकदार दिसते. काही जणांना प्रश्न पडतो की ब्लीच नक्की का करायचे? ब्लीच केल्याने त्वचा अधिक उजळ होते आणि चेहरा अधिक ताजा आणि चमकदार दिसतो म्हणून सहसा ब्लीच केले जाते. पण घरी ब्लीच नक्की कसे बनवायचे हे तुम्हाला जर माहीत नसेल तर त्यासाठी हा लेख नक्की वाचा. जाणून घेऊया घरच्या घरी ब्लीच बनविण्याची पद्धत.
चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर
घरगुती ब्लीच बनविण्याची पद्धत
Freepik.com
एक चमचा कच्चे दूध, 2 चमचे बटाट्याचा रस, 1 चमचा लिंबाचा रस, एक चमचा तांदळाचे पीठ हे साहित्य तुम्ही तुमच्यासह ठेवा.
पहिली स्टेप – सर्वात पहिले तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कापसाच्या मदतीने आपला चेहरा पुन्हा एकदा स्वच्छ करा. चेहऱ्यावरील धूळ अथवा माती चिकटली असेल तर यामुळे ती निघून जाण्यास मदत मिळते
दुसरी स्टेप – बटाट्याचा रस, लिंबाचा रस आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि मसाज करा. त्यानंतर ही पेस्ट साधारण चेहऱ्यावर अर्धा तास तशीच ठेवा.
तिसरी स्टेप – चेहरा पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर लिंबाच्या सालीने चेहऱ्याला मसाज करा. पुन्हा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातील फरक नक्कीच जाणवेल. तुमचा चेहरा अधिक चमकदार झालेला तुम्हाला दिसून येईल
गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार
लक्षात ठेवा या गोष्टी
काही महिलांना लिंबाची अलर्जी असते. लिंबाचा वापर केल्याने चेहऱ्यावर लालिमा येते. जर तुम्हाला लिंबामुळे त्रास होत असेल तर तुम्ही लिंबाच्या जागी टॉमेटो वापरू शकता. या दोन्हीचे गुणधर्म समान असल्याने ब्लीच करताना तुम्हाला तसाच परिणाम मिळतो. तसंच याचा वापरही लिंबाप्रमाणेच करावा. पण या दोन्हीची अलर्जी असेल तर तुम्ही ब्लीच न करणेच चांगले.
चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार
घरगुती ब्लीचचे फायदे
कच्चे दूध चेहऱ्याला नैसर्गिकरित्या उजळपणा आणण्यासाठी मदत करते. तर बटाट्याचा रस चेहऱ्यावरील सुरुकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करायला मदत करतो. तसचं चेहऱ्यावरील डाग कमी करण्यसाठीही याची मदत मिळते. लिंबामध्ये असणारे विटामिन सी हे चेहऱ्याला ताजेतवाने आणि चमकदार लुक देते. या पदार्थांचा परिणाम चेहऱ्यावर अत्यंत लाभदायक होतो. त्यामुळे तुम्ही बाजारातील ब्लीचचा वापर करण्यापेक्षा घरातील या वस्तूंनी ब्लीच केल्यास, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी होणार नाही आणि तुम्हाला हवा तसा चेहऱ्यावर परिणाम मिळेल हे नक्की.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक