ADVERTISEMENT
home / Festival
Chhatrapati Shivaji Maharaj Powada

शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडा | Shivaji Maharaj Marathi Songs And Powada

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली जुन्नर येथील शिवनेरी किल्लावर झाला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ठरवल्याप्रमाणे या दिवशी मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली जाते. या वर्षी कोरोनामुळे जरी या उत्सवावर काही नियमांचे बंधन असले तरी छोट्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करण्याची परवानगी आहे. त्यामुळे यंदाही घरोघरी, सोसायटीमध्ये अथवा सार्वजनिक चौकांमध्ये कमी लोकांच्या उपस्थितीच शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार. या दिवशी शिवाजी महाराजांच्यावर नितांत प्रेम करणारे शिवराजाचे मावळे एकमेकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा पाठवतात तसंच छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकेही भेट देतात. शिवाजी महाराजांचे शेरही या  निमित्ताने एकमेकांना सांगितले जातात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शिवाजी महाराज गाणी (Shivaji Maharaj Marathi Songs), शिवाजी महाराज पाळणा आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा (Chhatrapati Shivaji Maharaj Powada) शेअर करत आहोत. ही गाणी ऐकून सर्वच शिवभक्तांच्या मनात नक्कीच विजयाची वीरश्री संचारेल.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती (मराठा तितुका मेळवावा)

मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे गाणं महाराष्ट्रातील इतिहासात कोरून ठेवावं असं आहे. ज्यामुळे प्रत्येक शिवजयंतीला अनेक सार्वजनिक कार्यक्रमात या गाण्याला मानाचं स्थान आहे. हे गाणं एक स्फुर्ती गीत असल्यामुळे त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या मनातील भावना उत्कंटपणे मांडलेल्या आहेत.

गीतकार – शांता शेळके
संगीतकार – आनंदघन
गायक – पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर
चित्रपट – मराठा तितका मेळवावा

जाणून घ्या मराठी भाषा दिन कोट्स

ADVERTISEMENT

मराठी पाऊल पडते पुढे (मराठा तितुका मेळवावा)

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या काही मोजक्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली होती. बालपासूनच त्यांच्या मनात असलेल्या या स्वराजनिर्मितीच्या भावना या  गीतात उत्तम रित्या मांडलेल्या आहेत. शिवजयंती आणि हे गाणं म्हणजे जणू एक समीकरणच झालं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या दिव्य कार्याचा प्रवास या गाण्यातून आजही अनेकांना जगता येऊ शकतो.

गीतकार – शांता शेळके
संगीतकार – आनंदघन
गायक आणि गायिका – उषा मंगेशकर, पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, हेमंत कुमार, मीना खडीकर

ओ राजे ( मी शिवाजी राजे भोसले बोलतोय)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट आजवर निर्माण झाले आहेत. मात्र त्यापैकी सर्वसामान्यांच्या  सहज लक्षात राहील असा एक चित्रपट होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. सचिन खेडेकर,महेश मांजरेकर, प्रिया बापट, मकरंद अनासपूरे, सिद्धार्थ जाधव अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या  त्यामध्ये मुख्य भूमिका होत्या. सर्व सामान्यांना समजलेले शिवाजी महाराज या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. मात्र त्यापैकी ‘ओ राजे’ हे शिवाजी महाराज गाणे (Shivaji Maharaj Marathi Songs) ऐकताच अनेकांच्या अंगात वीरश्री संचारू लागते. 

गायक – सुखविंदर सिंग
संगीतकार – अतुल-अजय
गीतकार – गुरू ठाकूर, अजीत परब, प्रकाश सावंत

ADVERTISEMENT

जाणून घ्याशिवराजमुद्रेचा इतिहास

शीर्षक गीत (राजा शिवछत्रपती मालिका)

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जसे अनेक चित्रपट लोकप्रिय आहेत तशाच अनेक टेलिव्हिजन मालिकाही प्रसिद्ध झाल्या. त्यातील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे राजा शिवछत्रपती. या मालिकेचं शीर्षक गीतही खूपच लोकप्रिय झालं होतं. ही मालिका 2008 ते 2009 साली प्रसारित झाली होती. राजा शिवछत्रपती या बाबासाहेब पुरंदरेच्या कांदबरीवर आधारित ही मालिका होती. या मालिकेतून अभिनेता अमोल कोल्हे यांना घराघरात महाराजांची प्रतिमा साकारल्यामुळे एक आदरयुक्त ओळख प्राप्त झाली. पुढे यामुळे स्वराजरक्षक संभाजी या मालिकेतही त्यांना संभआजी राजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेचं शीर्षक गीत आजही तितक्याच आवडीने ऐकलं जातं. 

गीतकार – कवी भूषण, शिरिष गोपाळ देशपांडे
संगीतकार – अजय- अतुल
गायक – अतुल गोगावले

शिवाजी महाराज पाळणा ( राजा शिवछत्रपती मालिका)

शिवाजी महाराज गाणी (Shivaji Maharaj Marathi Songs) याप्रमाणेच शिवाजी महाराजांचा पाळणा (Shivaji Maharaj Palna) ही खूप लोकप्रिय आहे. राजा शिवछत्रपती या मालिकेत महाराजांच्या जन्मानंतर त्यांच्या नामकरण विधीच्या प्रसंगी हा पाळणा दाखवण्यात आला होता. मालिकेप्रमाणेच हा पाळणा लोकांना इतका आवडला होता की घरातील नामकरण विधींनाही हा पाळणा आवर्जून लावला जात असे. आजही शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करताना शिवजयंतीला अनेक कार्यक्रमात हा पाळणा ऐकला जातो.

ADVERTISEMENT

आई अंबे जगदंबे गोंधळ (फर्जंद)

आई अंबे जगदंबे हे गाणं फर्जंद चित्रपटातील  एक लोकप्रिय गीत आहे. या गाण्याचा प्रकार हा गोंधळ या लोकगीताचा आहे. पूर्वी देवीचा जागर करत गोंधळी गोंधळ घालत असत. आजही अनेक ठिकाणी असे गोंधळ आयोजित केले जातात. मात्र या गाण्यातून स्वराज्याबाबत असलेल्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. स्वराज्य रक्षणाच्या काही कठीण प्रसंगी आई अंबेची आराधना करत तिच्याकडे लढण्याचं बळ मागणारा हा गीतप्रकार आहे. 

चित्रपट – फर्जंद
गायक – आदर्श शिंदे
संगीतकार – अमित राज
गीतकार – दिगपाल लांजेकर

शिवाजी महाराज पोवाडा (मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)

पोवाडा हा महाराष्ट्रातील लोकगीतातील आणखी एक लोकप्रिय असा गायनाचा प्रकार आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक पोवाडे आहेत. ज्यातून त्यांच्या पराक्रमाचे, बुद्धीकौशल्याचे गुणवर्णन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या भुमीत असे अनेक शाहीर आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र या पोवाड्यातून जगासमोर मांडले आहे. पोवाड्यात एखादी खास ऐतिहासिक घटना जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी करण्याची ताकद असते. वाणगीदाखल मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील एक पोवाडा आम्ही तुमच्यासोबक शेअर करत आहोत.

चित्रपट – मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
संगीतकार – अजय- अतुल
गायक – नंदेश उमप

ADVERTISEMENT

शिवराज्याभिषेक गीत (हिरकणी)

प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला हिरकणी या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हिरकणीची भूमिका  साकारली होती. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभिषेकाचा प्रसंग रेखाटण्यात आला होता. ज्यामध्ये शिवराज्याभिषेकावर आधारित हे गाणं दाखवण्यात आलं होतं.  

चित्रपट – हिरकणी
गायक आणि गायिका – निलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दीपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव, संतोष बोटे
गीतकार – कवी भूषण आणि संदीप खरे

ती तलवार पोवाडा ( बघतोस काय मुजरा कर)

पोवाडा हा गीतप्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास जगासमोर मांडण्यासाठी अतिशय सार्थ आहे. त्यामुळे चित्रपटात शिवाजी महाराजांचा  पोवाडा आवर्जून दाखवण्यात येतो. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात शिवाजी महाराजांबद्दत तरूणांच्या मनात नेमकी काय भावना असावी यावर प्रकाश टाकण्यात आला होता. ज्यामध्ये श्रेयस तळपदेवर हा पोवाडा चित्रित करण्यात आला होता.

चित्रपट- बघतोस काय मुजरा कर
गायक- आदर्श शिंदे
संगीतकार- अमित राज 

ADVERTISEMENT

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना आणि तो साजरा करतानाही अनेक कार्यक्रमात छत्रपतींची गाणी आणि पोवाडे आवर्जून लावले जातात. आम्ही शेअर केलेली शिवाजी महाराजांची गाणी (Shivaji Maharaj Marathi Songs), शिवाजी महाराज पाळणा आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा (Chhatrapati Shivaji Maharaj Powada) तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसंच तुम्ही संभाजी महाराज स्टेटस मराठी ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता.

हेही वाचा :

Womens Day Quotes in Hindi

Hindi Sexy Song

ADVERTISEMENT

Maharana Pratap ki Kahani

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि युट्यूब

15 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT