ADVERTISEMENT
home / Fitness
अचानक वाढणारे वजन देत आहे या आजारांचे संकेत

अचानक वाढणारे वजन देत आहे या आजारांचे संकेत

चुकीच्या खाण्याच्या सवयी, सतत बसून राहणे यामुळे वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वजन वाढण्याची प्रक्रियाही एका दिवसात होत नाही. तर त्यासाठीही काही कालावधी लागतो. जर तुम्ही वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष केले तर तुमचे वजन हळुहळू कधी वाढेल याचा अंदाजही अनेकांना येत नाही. पण काहीही कारण नसताना आणि योग्य व्यायाम सुरु असूनही वजन कमी न होता जर दिवसागणिक वाढत असेल तर तुमच्या वाढत्या वजनाकडे लक्ष देणे हे तुमच्यासाठी फारच गरजेचे आहे. आरोग्यासंदर्भात काही तक्रारी सुरु झाल्या तरी देखील वजन वाढण्याची शक्यता असते. तुमचेही वजन अचानक वाढत असेल तर जाणून घेऊया अचानक वाढणारे वजन नेमकं कोणत्या आजाराचे संकेत देत आहे.

थायरॉईड

थायरॉईड

Instagram

 महिलांना होणारा सर्वसाधारण त्रास म्हणजे थायरॉईड. गळ्याखाली असणाऱ्या या ग्रंथीची वाढ झाली की, थॉयराईडचा त्रास होतो. हा आजार महिलांशी निगडीत असतो. वयाच्या तिशीनंतर हा आजार महिलांना होण्याची शक्यता असते. या आजारात वजन अचानक कमी होणे जसे असते. अगदी त्याच प्रमाणे याचे प्रमुख लक्षण आहे ते म्हणजे अचानक वजन वाढायला लागणे. जर तुमचे वजन तुमच्या रोजच्या वजनापेक्षा जास्त वाढू लागले असेल. सगळे काही सुरळीत असताना वजन वाढीचा असा त्रास होत असेल तर तुम्हाला थायरॉईड झाल्याची शक्यता आहे. जर तुम्हाला थायरॉईड असेल तर तुम्ही योग्यवेळी तपासणी करायला हवी नाहीतर तुमचे वजन वाढेल.

ADVERTISEMENT

तुम्हालाही आहे थायरॉईडचा त्रास, जाणून घ्या थायरॉईडविषयी सगळे काही (Thyroid Symptoms In Marathi)

पिरेड्स अनियमतता

काही महिलांना पिरेड्सही योग्य वेळी आणि नियमित येत नाहीत. अचानक वजन वाढण्यामागे हे एक कारण देखील असते.महिलांच्या शरीरात कार्यरत असलेले हार्मोन्स आणि तुमच्या मनाची घासमेल सुरु असते. कारी महिलांना नियमित पाळी येते तर काही जणींना दोन दोन  महिन्यांच्या अंतराने किंवा त्याहून अधिक काळानंतर मासिक पाळी येते. पिरेड्सच्या अशा अनियमितपणाचा परिणाम हा हार्मोन्सवर सतत होत राहतो. परिणामी  वजन वाढते. शरीर सतत भरलेले आणि जड वाटू लागले. इतरवेळीही मासिक पाळीच्या काळाच वजनामध्ये नक्कीच फरक पडतो.अशी अनियमितता यासाठी अधिक कारणीभूत ठरते. 

प्रवासातील बद्धकोष्ठता टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

मेनोपॉझ

मेनोपॉझ

ADVERTISEMENT

Instagram

ज्याप्रमाणे मासिक पाळीही महिलांसाठी फारच महत्वाची असते. तसाच पाळी जाण्याचा काळातही वजन वाढीचा त्रास अनेकांना जाणवतो. तुमचे वय 40 च्या पुढे असेल आणि तुम्हाला पाळी येणे बंद झाले असेल तर अशावेळीही शरीरातील घाण शरीराबाहेर पिरेड्सच्या माध्यमातून न गेल्यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असो. जर तुम्हालाही पिरेड्स जाण्याची भीती असेल तर तुम्ही  वजनाकडे अखिल लक्ष द्यायला हवे.

 

तुमचेही वजन येत्या  दिवसांमध्ये काहीही न करता वाढत असेल तर तुम्हाला यापैकी काही झाले असे वाट असेल तर तुम्ही योग्य काळजी द्या

ADVERTISEMENT

 नितंबाचा आकार वाढू द्यायचा नसेल तर आहारातून वगळा हे पदार्थ

11 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT