‘होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबाच्या खिशात बंदुकीची गोळी’ हे गाणं अगदी लहानपणापासून प्रत्येकाने म्हटलं असेल आणि होळीच्या दिवशी घरात आवडीने पुरणपोळी खाल्ली असेल. अगदी आजही होळी म्हटली की घरात पुरणपोळी ही व्हायलाच हवी. होळीच्या दिवशी महाराष्ट्रीय घरामध्ये पुरणपोळी केली नाही असं सहसा होत नाही. अगदी करायला वेळ नसला तरीही बाजारातून तरी किमान चार पुरणपोळ्या विकत आणल्या जातातच. काही जणांना पुरणपोळी घरी बनवणे सोपे नसते असे वाटते, तर काहींना खूप पसारा घालावा लागतो असं वाटतं. पण होळीसाठी तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी घरात बनवू शकता. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य महत्त्वाचा मानला जातो. पुरणपोळीची रेसिपी (puran poli recipe in marathi) खास आम्ही तुमच्यासाठी या होळीला घेऊन आलो आहोत. तुम्हीही घरात वेळ काढून हमखास अशा पद्धतीचा वापर करून पुरणपोळी बनवू शकता. मग वाट कसली पाहताय लागा तयारीला आणि करा ही होळी पुरणपोळीसोबत साजरी!
मैद्याची पारंपरिक पुरणपोळी (Maida Puran Poli Recipe In Marathi)
Maida Puran Poli Recipe In Marathi
अगदी पूर्वीपासून मैद्याची पुरणपोळी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कारण ही पोळी अत्यंत लुसलुशीत होते आणि चवीला खूपच छान लागते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीची मैद्याची पुरणपोळी कशी करायची त्याची रेसिपी.
लागणारे साहित्य:
- 200 ग्राम चणाडाळ
- 200 ग्रॅम गूळ
- 150 ग्रॅम मैदा
- 1/4 टीस्पून हळद
- चवीपुरते मीठ
- 2 टेबलस्पून तेल
- 3 टेबलस्पून मैदा (पोळी लाटण्यासाठी) अथवा कणीक
- 1/2 टीस्पून वेलची पावडर
- 1/2 कप दूध
- पुरणपोळीसाठी तूप
कृती:
- चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. गूळ किसून घ्या. शिजलेल्या चणाडाळीमध्ये गूळ आणि साखर मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात वेलची पावडर घाला. पुरण तयार आहे. नंतर पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्या
- जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या हव्या असतील तर तुम्ही मैद्याची पुरणपोळी करु शकता. याशिवाय मैदा आणि गव्हाची कणिक असे दोन्ही मिसळूनही खुसखुशीत पुरणपोळी करता येते.
- मैदा घेत असाल तर तो अगदी हलक्या हाताने मळा. यासाठी थोडा वेळ लागेल. पण हरकत नाही. पण चांगली पुरणपोळी करण्यासाठी थोडासा वेळ घ्या.
- आता पुरणाचा एक गोळा आणि पिठाचा गोळा घ्या. ज्यापद्धतीने पराठा लाटतो. अगदी तशाच हलक्या हाताने पुरळपोळ्या लाटायला घ्या. पुरण सगळीकडे पसरण्यासाठी त्या फार प्रेमाने आणि सावकाश लाटाव्या लागतात. एका बाजूने पुरणपोळ्या लाटू नका.सगळीकडे समान दाब देऊन पुरणपोळ्या लाटा.
- आता कोणत्याही पोळीप्रमाणे छान शेकून घ्या. जर पुरणपोळ्या छान लाटल्या असतील तर त्या टुम्म फुगतात.
पुरणपोळी झाल्यानंतर त्या तशाच नरम राहाव्यात म्हणून त्यावर तुपाची धार सोडा.
खापर पुरणपोळी (Khapar Puran Poli Recipe In Marathi)
Khapar Puran Poli Recipe In Marathi
खापर पुरणपोळी हा खरा तर खानदेशी (Khandeshi Puran Poli recipe in Marathi) प्रकार आहे. खापर पुरणपोळी बनविण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ही पुरणपोळी मातीच्या खापरावर बनवली जाते. काही ठिकाणी याला मांडे असे म्हणतात. पण खानदेशात याला पुरणपोळी असेच म्हणतात. खापराची पुरणपोळी हा एक प्रसिद्ध पुरणपोळीचा प्रकार आहे. याची रेसिपी जाणून घेऊ
लागणारे साहित्य:
- 200 ग्राम चणाडाळ
- 200 ग्रॅम गूळ
- 150 ग्रॅम गव्हाचे पीठ
- चवीपुरते मीठ
- 2 टेबलस्पून तेल
- 3 टेबलस्पून कणीक (पोळी लाटण्यासाठी) अथवा कणीक
- 1/2 टीस्पून वेलची पावडर
- 1/2 कप दूध
कृती:
- चणाडाळ धुवुन चुलीवर शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतून पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत चुलीवर चढवून तिच्यात गूळ घालुन गूळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर वाटायचे. मिक्सरवर वाटले तरी चालते
- लोकवण गहू स्वच्छ धुऊन उन्हात वाळवायचा आणि जात्यावर अगदी बारीक पिठ दळायचे. नंतर चाळणीने चाळण्याऐवजी वस्त्रगाळ करुन घ्यायचे. पिठ वस्त्रगाळ करुन घेतले नाही तर पुरणपोळी बनवताना कडेला जाड राहते, भाजताना कडा निट भाजल्या जात नाहीत आणि मग तेवढी गोल कड काढून टाकावी लागते
- मग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालून पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर पुरणपोळी लाटताना ती मोडते. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नी मग त्याला तासभर तरी तेल लावा आणि उलटेसुलटे फिरवत तिंबत बसायचे. तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला.
- प्रथम आपली मोठी पोळी असते त्या आकाराच्या दोन पोळ्या करुन घेतात. मग साधारण नारळाच्या आकाराचा सारणाचा गोळा घेऊन त्याला या दोन पोळ्यांच्या मधे ठेवतात. बाजू हळू बंद करुन घेतात आणि मग हळूवारपणे लाटायचं. लाटताना पोळपाट न वापरता मोठे ताट उपडे घालून त्यावर लाटतात म्हणजे मोठा पृष्ठभाग लाटायला मिळतो आणि ते सोपे होते. लाटत लाटत ताट भरले की पोळी हळूच उचलून हाताने फिरवायची. फिरवत फिरवत अलगद दोन्ही हात आडवे घेऊन कोपरांचा आधार द्यायचा आणि कोपराकोपरांनी मांड्याला फिरवायचे. हे काम जलद करावे लागते त्याचबरोबर जपूनही करावे लागते.
- तयार झालेली ही पुरणपोळी अर्थात मांडा खापरावर टाकायचा. ही टाकण्याचीही एक कला आहे. घसरू नये म्हणून त्यावर जड कापडही ठेवले जाते. एका बाजूने भाजले की पटकन दुसऱ्या बाजूला पलटायची. खाली काढल्यावर याची आयताकृती घडी करायची. पुरणपोळी तयार. ही पोळी तुपासह खात नाहीत. तर दूध अथवा कटाच्या आमटीसह खातात.
वाचा – चमचमीत पास्ता रेसिपी मराठीत
कणकेची पुरणपोळी (Kankechi Puranpoli)
Kankechi Puranpoli
काही जणांना मैद्याच्या पुरणपोळ्या आवडत नाहीत. कारण मैदा पचायला जड जातो. मग अशावेळी काही घरांमध्ये कणकेच्या पुरणपोळ्या केल्या जातात. कणकेची पुरणपोळी (Gulachi puran poli recipe in marathi) रेसिपी जाणून घेऊ.
लागणारे साहित्य:
- 1 कप चणा डाळ
- 1/2 कप गूळ
- 1/2 कप साखर
- 1/2 टीस्पून वेलची पूड
- 1/2 टीस्पून सुंठपुड
पुरणपोळी चे कणकेचे साहित्य:
- 1 कप गव्हाचे पीठ
- 1 कप मैदा
- 1/4 हळद
- चिमुटभर मीठ
- 2 टेबलस्पून तेल
- पोळी भाजण्यासाठी तेल
कृती:
- चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्या. गव्हाच्या पिठामध्ये मैदा हळद, मीठ, तेल एकत्र करून पाण्याने व्यवस्थित भिजवून तिंबवून ठेवणे
- डाळ शिजल्यावर बाहेर काढून पाणी काढून टाकणे आणि त्यात गूळ, सुंठपूड, गूळ, साखर, वेलची पूड घालून व्यवस्थित घोटून घेणे
- हे शिजलेले पीठ पुरणयंत्रातून काढून घेणे
- पिठाचा गोळा करून त्यामध्ये पुरण भरणे आणि अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्या. तव्यावर खरपूस भाजा आणि गरमागरम पोळी तुपाची धार सोडून खायला द्या. हीदेखील मैद्याप्रमाणे लुसलुशीत होते. मात्र कणीक असल्याने याचा रंग दिसायला थोडा वेगळा दिसतो
तेलावरची पुरणपोळी (Tel Puran Poli Recipe In Marathi)
Tel Puran Poli Recipe In Marathi
तेलावरची पुरणपोळीदेखील (Telpoli recipe in Marathi) बऱ्याच जणांना आवडते. काही जणांना याचा कडकपणा आणि चव खूपच आवडते. हीदेखील तुम्हाला घरात करता येते.
लागणारे साहित्य पुरणासाठी:
- 2 कप चण्याची डाळ
- 2 कप गूळ (चिरुन)
- 1 टेबलस्पून वेलचीपूड
- 1/2 चमचा जायफळाची पूड
- चिमूटभर मीठ
आवरणासाठी:
- 1 कप बारीक रवा
- 1 कप मैदा
- चवीनुसार मीठ
- 2 टेबलस्पून केशराने तयार केलेले पाणी
- 1/2 कप तेल
कृती:
- सर्वात आधी रवा, मैदा, मीठ, तेल आणि केशराचे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या. केशराच्या पाण्यामुळे पोळीला सुंदर रंग येतो आणि स्वादही. साधारण दीड तास हे भिजलेले पीठ तिंबत ठेवा
- नंतर फूड प्रोसेसरमध्ये पीठ आणि तेल घालून हे पीठ अधिक नरम करून घ्या आणि पुन्हा तेलात तिंबून घ्या
- चण्याची डाळ शिजवून त्यातील पाणी काढून गूळ, वेलची पूड, जायफळ पूड आणि मीठ घालून मिक्सर अथवा पुरणयंत्रातून काढून घ्यावे
- गोळे करून लाटून घ्या आणि त्यात पुरण भरा. आधी थोडं हाताने थापा आणि मग हलक्या हाताने लाटून घ्या. मग तव्यावर खरपूस भाजा आणि खाली उतरवताना फडक्याचा अथवा कागदाचा वापर करावा
साखर गुळाची पुरणपोळी (Sugar Jaggery Puranpoli Recipe In Marathi)
Sugar Jaggery Puranpoli Recipe In Marathi
काही जणांना नुसत्या गुळाची पुरणपोळी आवडत नाही. मग अशावेळी साखरेचा आणि गुळाचा गोडवा एकत्र असलेली पुरणपोळी बनवली जाते. याची खास रेसिपी.
लागणारे साहित्य:
- 200 ग्राम चणाडाळ
- 100 ग्रॅम गूळ
- 100 ग्रॅम साखर
- 150 ग्रॅम गव्हाचे पीठ
- 1/4 टीस्पून हळद
- चवीपुरते मीठ
- 2 टेबलस्पून तेल
- 3 टेबलस्पून (पोळी लाटण्यासाठी) गव्हाचे पीठ
- 1/2 टीस्पून वेलची पावडर
- 1/2 कप दूध
- पुरणपोळीसाठी तूप
कृती:
- चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. गूळ किसून घ्या. शिजलेल्या चणाडाळीमध्ये गूळ आणि साखर मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात वेलची पावडर घाला. पुरण तयार आहे. नंतर पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्या.
- मैदा आणि गव्हाची कणिक असे दोन्ही मिसळूनही खुसखुशीत पुरणपोळी करता येते.
- दोन्ही पीठ घेत असाल तर ते अगदी हलक्या हाताने मळा. यासाठी थोडा वेळ लागेल. पण हरकत नाही. पण चांगली पुरणपोळी करण्यासाठी थोडासा वेळ घ्या.
- आता पुरणाचा एक गोळा आणि पिठाचा गोळा घ्या. ज्यापद्धतीने पराठा लाटतो. अगदी तशाच हलक्या हाताने पुरळपोळ्या लाटायला घ्या. पुरण सगळीकडे पसरण्यासाठी त्या फार प्रेमाने आणि सावकाश लाटाव्या लागतात. एका बाजूने पुरणपोळ्या लाटू नका.सगळीकडे समान दाब देऊन पुरणपोळ्या लाटा.
- आता कोणत्याही पोळीप्रमाणे छान शेकून घ्या. जर पुरणपोळ्या छान लाटल्या असतील तर त्या टुम्म फुगतात.
- पुरणपोळी झाल्यानंतर त्या तशाच नरम राहाव्यात म्हणून त्यावर तुपाची धार सोडा.
विदर्भ स्टाईल पुरणपोळी (Vidarbha Style Puranpoli)
Vidarbha Style Puranpoli
विदर्भातील पुरणपोळी ही जरा कमी गोड असते. तसंच या तव्यावर नाही तर मातीच्या खापरावर केल्या जातात. याला काही ठिकाणी मांडे असंही म्हणतात. वैदर्भीय पुरणपोळी ही जरा वेगळी असते. यामध्ये पुरणाचा भरणा जास्त असतो. बऱ्याच ठिकाणी पुरणात चणाडाळ न वापरता यामध्ये तुरीच्या डाळीचा उपयोग केला जातो.
लागणारे साहित्य:
- 2 वाट्या चणा डाळ अथवा तूरडाळ
- 2 ते अडीच वाटी साखर
- 3-4 चमचे तांदूळ
- वेलची अथवा जायफळ पावडर
- चिमूटभर मीठ
- गव्हाचे पीठ
- तेल
कृती:
- गव्हाचे पीठ भिजवून तिंबवून ठेवावे
- चणाडाळ अथवा तूरडाळ आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुऊन शिजवावे. नंतर डाळ शिजल्यावर त्यात साखर घालून पुरण तयार करायला ठेवा. शिजल्यावर पुरणयंत्रातून पुरण बारीक करून घ्यावे
- कणकेचा गोळा करून त्यात पुरण भरावे आणि पोळ्या लाटून तव्यावर खरपूस भाजाव्या. वैदर्भीय पुरणपोळी तयार
सत्तू पुरणपोळी (Sattu Puranpoli)
Sattu Puranpoli
काही जण डाएट फॉलो करतात. मग साखर आणि गूळ खाऊन वजन वाढेल किंवा मधुमेही व्यक्तींसाठी काही खास पद्धतीची पुरणपोळीही तुम्ही बनवू शकता. सत्तूमध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे तुम्ही सत्तूच्या पिठाचीही पुरणपोळी बनवू शकता. सत्तू पुरणपोळीची रेसिपी
लागणारे साहित्य:
- 150 ग्रॅम सत्तू पीठ
- 125 ग्रॅम गुळ
- 2 वाटी गव्हांचे पीठ
- 3 टेबलस्पून मैदा
- 4 टेबलस्पून तूप
- 1 टेबलस्पून वेलचीपूड
- चवीनुसार मीठ
- 3 टेबलस्पून तेल
कृती:
- सत्तूचे पीठ थोडेसे भाजून घ्या. त्यामध्ये किसलेला गूळ आणि वेलची पावडर मिक्स करा
- त्यानंतर मीठ, तेल घालून पाणी घालून मीठ मळून घ्या
- याचे गोळे करा आणि लाटा. खमंग भाजलेली ही पोळी वरून साजूक तुपाची धार सोडून खायला द्यावी
बदाम काजू पुरणपोळी (Almond Cashew Puranpoli)
Almond Cashew Puranpoli
पुरणपोळीमध्ये बदाम काजू असं वाचल्यावर थोडं विचित्र वाटतं ना? पण हो बदाम काजूची पुरणपोळीही करता येते. काही ठिकाणी याची रेसिपी करण्यात येते.
लागणारे साहित्य:
- 1/4 किलो चण्याची डाळ
- 1/4 किलो गूळ
- 1 आणि 1/2 कप मैदा
- 1/4 कप गव्हाचे पीठ
- 2 टेबलस्पून बदाम पावडर
- 2 टेबलस्पून काजू पावडर
- 3 टेबलस्पून तूप
- 1 टेबलस्पून जायफळ- वेलची पावडर
- 1/2 टीस्पून हळद
कृती:
- चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. गूळ किसून घ्या. शिजलेल्या चणाडाळीमध्ये गूळ आणि साखर मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात वेलची पावडर घाला. पुरण तयार आहे. नंतर पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्या
- यामध्येच बदाम पावडर आणि काजू पावडरही घालून मिक्स करावी आणि तुम्ही काजूचे अथवा बदामचे बारीक तुकडे करून त्यात मिक्स करू शकता
- मैदा आणि गव्हाचे पीठ, मीठ, हळद घालून नीट पाण्याने भिजवा आणि तेलात तिंबत ठेवा
- नंतर गोळे करून पुरण भरा आणि मग हलक्या हाताने पोळ्या लाटून तव्यावर खरपूस भाजून घ्या
मूगडाळ पुरणपोळी (Moogdal Puranpoli)
Moogdal Puranpoli
मूगडाळ पुरणपोळी थोडी चवीला वेगळी लागते. पण पचायला अतिशय हलकी असते. काय आहे याची रेसिपी जाणून घेऊया.
लागणारे साहित्य:
- 1/4 किलो मूग डाळ
- 1/4 किलो गूळ
- 1 आणि 1/2 कप मैदा
- 1/4 कप गव्हाचे पीठ
- 3 टेबलस्पून तूप
- 1 टेबलस्पून जायफळ- वेलची पावडर
- 1/2 टीस्पून हळद
कृती:
- मूगडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. गूळ किसून घ्या. शिजलेल्या मूगडाळीमध्ये गूळ मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात वेलची पावडर घाला. पुरण तयार आहे. नंतर पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्या
- मैदा आणि गव्हाचे पीठ, मीठ, हळद घालून नीट पाण्याने भिजवा आणि तेलात तिंबत ठेवा
- नंतर गोळे करून पुरण भरा आणि मग हलक्या हाताने पोळ्या लाटून तव्यावर खरपूस भाजून घ्या
साखरेची पुरणपोळी (Sugar Puranpoli Recipe In Marathi)
Sugar Puranpoli Recipe In Marathi
गुळाप्रमाणेच नुसत्या साखरेची पुरणपोळीही करता येते. तुम्हाला जर गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही गुळाऐवजी साखर वापरा.
लागणारे साहित्य:
- 200 ग्राम चणाडाळ
- 200 ग्रॅम साखर
- 150 ग्रॅम मैदा
- 1/4 टीस्पून हळद
- चवीपुरते मीठ
- 2 टेबलस्पून तेल
- 3 टेबलस्पून मैदा (पोळी लाटण्यासाठी) अथवा कणीक
- 1/2 टीस्पून वेलची पावडर
- 1/2 कप दूध
- पुरणपोळीसाठी तूप
कृती:
- चणाडाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजलेल्या चणाडाळीमध्ये साखर मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात वेलची पावडर घाला. पुरण तयार आहे. नंतर पुरण यंत्रातून पुरण वाटून घ्या
- मैदा आणि गव्हाची कणिक असे दोन्ही मिसळूनही पुरणपोळी करता येते.
- यासाठी थोडा वेळ लागेल. चांगली पुरणपोळी करण्यासाठी थोडासा वेळ घ्या.
- आता पुरणाचा एक गोळा आणि पिठाचा गोळा घ्या. अगदी तशाच हलक्या हाताने पुरळपोळ्या लाटायला घ्या. पुरण सगळीकडे पसरण्यासाठी त्या फार प्रेमाने आणि सावकाश लाटाव्या लागतात. एका बाजूने पुरणपोळ्या लाटू नका.सगळीकडे समान दाब देऊन पुरणपोळ्या लाटा.
- आता कोणत्याही पोळीप्रमाणे छान शेकून घ्या. जर पुरणपोळ्या छान लाटल्या असतील तर त्या फुगतात.
- पुरणपोळी झाल्यानंतर त्या तशाच नरम राहाव्यात म्हणून त्यावर तुपाची धार सोडा.
इन्स्टंट पुरणपोळी (Instant Puranpoli)
Instant Puranpoli
पुरणपोळी करायला जास्त वेळ नको असेल तर तुम्हाला अगदी इन्स्टंट पुरणपोळीही करता येते. थोडक्यात आवरायचं असेल आणि पुरणपोळीही खायची असेल तर ही रेसिपी येईल तुमच्या मदतीला.
लागणारे साहित्य:
- इन्स्टंट पुरणपोळी रेडिमिक्स
- पाणी
- कणीक
कृती:
- गव्हाच्या पीठाची कणीक भिजवून घ्या
- बाजारात मिळणारे इन्स्टंट पुरणपोळी पाकिट घेऊन या. ती पुरण पावडर घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून पुरण तयार करा
- कणकेचे गोळे करून त्यात पुरण भरा आणि मग हलक्या हाताने पोळ्या लाटून तव्यावर खरपूस भाजून तूप घालून पोळी खायला द्या