Table of Contents
अयोग्य आणि असंतुलित आहार हा आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असतो. शरीराचे कार्य योग्य कार्यरत राहण्यासाठी शरीराला प्रथिने,कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, कार्बोदके, फॅट्स अशा अनेक घटकांची आवश्यकता असते. शरीरात यांच्यापैकी कोणत्याही घटकांची कमतरता झाली की, शरीर संकेत द्यायला सुरुवात करते.खूप जण चुकीच्या पद्धतीने बारीक होण्यासाठी किंवा शरीराला फिट ठेवण्यासाठी आहारातून अशा काही गोष्टी काढून टाकतात की, ज्याचा परिणाम हा शरीरावर अशक्तपणा येण्याची वेळ येते. अनेकदा शरीराला अशक्तपणा आला हे देखील खूप जणांना कळत नाही. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे आणखी विपरीत परिणाम शरीरावर होऊ लागतात. सतत चक्कर येणे, काहीही करण्याची इच्छा नसणे, कामांमध्ये लक्ष न लागणे,सतत अस्वस्थता जाणवत राणे असे काहीसे होऊ लागते. तुम्हालाही असा थकवा आणि अस्वस्थपणा जाणवत असेल तर तुम्हाला अशक्तपणा आला आहे. हा थकवा येण्याची नेमकी कारणे, अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय याबाबत आपण अधिक माहिती घेऊया.
अशक्तपणा येण्याची कारणे (Causes Of Weakness In Marathi)
अशक्तरणाची विविध कारणे आहेत. ही कारणे नेमकी कोणती ती आता आपण जाणून घेऊया.
अॅनेमिया (Anemia)
रक्ताची कमतरता असलेला आजार म्हणजे ‘अॅनेमिया’. रक्तातील लोहाचे प्रमण कमी झाले की, अॅनेमिया हा आजार बळावतो. यालाच ‘पंडुरोग’ असे म्हणतात. शरीरात रक्ताची कमतरता झाल्यामुळे शरीर हे पांढरे पडू लागते. अॅनेमिया हा आजार वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतो. रक्तपेशींच्या कमतरतेमुळे, शरीरातील लोहयुक्त पदार्थांचे सेवन कमी झाल्यामुळे,जुन्या आजारांमुळे अॅनेमिया बळावण्याची शक्यता असते. या सगळ्या त्रासामुळे शरीरात एक प्रकारचा थकवा जाणवू लागतो. हा थकवा अशक्तपणामध्ये बदलू लागतो. अॅनेमिया हे देखील अशक्तपणाचे एक कारण आहे.
आजारी पडणे (Illness)
प्रतिकारशक्ती कमी झाली की, आजारांना आमंत्रण मिळते. कोणतेही साथीचे आजार होण्याची शक्यता असते. सतत येणारी आजारपणं ही अशक्तपणाला आमंत्रण देतात. जर तुमची लाईफस्टाईल योग्य नसेल तर सतत आजारी पडण्याची शक्यता ही जास्त असते. सतत आजारी पडल्यामुळे अवयवांवर ताण पडतो. काहीही करण्याची इच्छा होत नाही. जेवण जात नाही. कोणत्याही कार्यात मन लागत नाही.त्यामुळे अशक्तपणा हा येतो. वरच्यावर आजारी पडत असाल तर तुम्ही आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे.
वाचा – ब्लड कॅन्सरची कारणे
झोपेची कमतरता (A Lack Of Sleep)
प्रत्येकाला 7 ते 8 तासांच्या झोपेची गरज असते. झोप पूर्ण झाली की, शरीर फ्रेश होते. पण जर झोप पूर्ण झाली नाही. तर शरीराची मरगळ जात नाही. हल्लीचे लाईफस्टाईल पाहता सततचे काम, कामाचे प्रेशर आणि कामाचे स्वरुप या सगळ्याचा परिणाम हा झोपेवर होतो. शिवाय हातात फोन आल्यापासून त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवला जातो. फोनमुळे निद्रानाशाचा त्रास हा देखील अनेकांना होऊ लागला आहे. पण जर तुमच्या शरीराला आवश्यक असलेली झोप तुम्हाला मिळाली नाही तर मात्र कालांतराने तुम्हाला थकवा जाणवू लागतो. या थकव्यातून बाहेर आला नाहीत तर मात्र अशक्तपणा जाणवू लागतो. अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय करणं आवश्यक आहे.
अस्वस्थपणा (Anxiety)
मन स्वस्थ नसेल तर शरीराचे कार्य योग्यपद्धतीने चालत नाही. झोप आणि मन:शांती मिळत नाहीत. जर तुम्ही मनातून समाधानी नसाल तर तुम्हाला सतत अस्वस्थपणा जाणवत राहतो. हा अस्वस्थपणा प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतो. जर तुम्ही अस्वस्थ असाल आणि त्यातून तुम्ही योग्य मार्ग काढू शकला नाही तर तुम्हाला अशक्तपणा येण्याची शक्यता असते. तुम्ाला आलेला अस्वस्थपणा हा नेमका कशामुळे आला आहे. याचाही विचार करा म्हणजे तुम्हाला अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय योग्य काय आहे ते कळू शकेल.
व्हिटॅमिन्सची कमतरता (Vitamin 12 Deficiency)
शरीराला व्हिटॅमिन्सची गरज असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्स 12 ची कमतरता असेल तर असा अशक्तपणा तुम्हाला नक्कीच येऊ शकतो. व्हिटॅमिन 12 ला कोबालॅमिन असे देखील म्हटले जाते. शरीरातील पेशींना चांगले ठेवण्याचे काम व्हिटॅमिन 12 करते. व्हिटॅमिन 12 हे सोल्युएबल असते. पाण्यामध्ये ते विरघळून जाते. व्हिटॅमिन B चा हा आठवा भाग आहे. शरीरातील रक्ताची कमतरता कमी करण्याचे काम हे व्हिटॅमिन करते.
स्नायू दुखापत (Some Muscle Diseases)
जर तुमच्या स्नायूंना दुखापत होत असेल तरी देखील अशक्तपणा येण्याची शक्यता असते. जर तुमच्या स्नायूंना अशा प्रकारने काही दुखापत झाली असेल तरी देखील तुम्हाला अशक्तपणा होऊ शकतो. स्नायूंना दुखापत ही खूप प्रवासामुळे किंवा व्यायामामुळे देखील होऊ शकते. त्यामुळे अशापद्धतीनेही तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होऊ शखतो.
व्हिटॅमिनचा अतिरिक्तपणा (Vitamin Overdose)
शरीरासाठी व्हिटॅमिन जितके गरजेचे असतात. तितकाच त्यांचा ओव्हरडोस हा शरीरासाठी घातक ही ठरु शकतो. अनेक अभ्यासांती असे सिद्ध झाले आहे की, जर तुम्ही खूप व्हिटॅमिन्सच्या अधीन असाल तरी देखील तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. व्हिटॅमिन C किवा झिंकच्या अति सेवनामुळे अस्वस्थपणा, हगवण, उलट्या, पोटदुखी असे त्रास होऊ लागतात. या आजारपणांमुळे अशक्तपणा येणे अगदी स्वाभाविक आहे.
थायरॉईड (Thyroid)
फुलपाखराच्या आकाराचे शरीरातील अवयव जे थायरॉईड नावाने ओळखले जाते. थायरॉईड ग्लँड हे अशा हार्मोन्सची निर्मिती करते जे तुमच्या शरीरातील उर्जा नियंत्रित करण्यात मदत करते. थायरॉईड मेटाबॉलिझमही नियंत्रित ठेवण्याचे काम करते. याशिवाय तुमचे ह्रदय, हाड, स्नायू यांना बळकटी देण्याचे काम करते. आपण घेत असलेल्या आहाराला उर्जेमध्ये बदलण्याचे काम थायरॉईज ग्लँड करते. जर त्याचे कार्य बिघडले की, शरीराला थकवा येण्याची शक्यता असते. थायरॉईड विषयी माहिती जाणून घेणे हे फारच गरजेचे आहे
न कळलेला डाएटबिटीझ (Undiagnosed Diabetes)
डाएबिटीझ अर्थात मधुमेह हा असा आजार आहे जो शरीरात अनेक बदल आणतो. बरेचदा डाएबिटीझ झाला आहे की नाही याची शहानिशा केली नसेल तर अशावेळी शरीरात अशक्तपणा येण्याची शक्यता असते. शरीरात साखर वाढणे आणि साखर कमी होणे या दोन्ही वेळा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला डाएबिटीझशी निगडीत काही त्रास होत असतील तर तुम्ही आताच तपासणी करुन घ्या.
ह्रदयासंदर्भातील विकार (Heart Problem)
ह्रदयरोग हा देखील तुम्हाला थकवा आणू शकतो. ज्यांना ह्रदयासंदर्भातील काही त्रास असतील अशांना त्यांच्या ट्रिटमेंट्समुळे किंवा औषधांमुळे त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे अशक्तपणा येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला असे त्रास असतील तर तुम्ही तुमच्या अशक्तपणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्ही घेत असलेल्या ट्रिटमेंट्सचा फायदा तुम्हाला होणार नाही.
अशक्तपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Weakness In Marathi)
अशक्तपणा घालवण्यासाठी तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. ही काळजी घेतली तर तुमच्या शरीराला आवश्यक अशी उर्जा मिळेल.
सुकामेवा (Handful Nuts)
सुकामेवा हा एनर्जीचा भंडार आहे. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही मूठभर सुकामेवा खाण्यास काहीच हरकत सुकामेवा खाल्ल्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळण्यास मदत मिळते. काजू,बदाम, पिस्ता, मनुके, अंजीर या प्रकारातील सुकामेवा तुम्ही आवर्जून खायला हवा. सुकामेव्यामध्ये व्हिटॅमिन E, ओमेगा 3, डाएबिटीझ, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, नॅचरल शुगर असल्यामुळे एनर्जी मिळण्यास मदत मिळते.
पाण्याचे सेवन (Water Intake)
पाणी हे जीवन आहे. जर शरीरात योग्य प्रमाणात पाणी असेल तर शरीर हायड्रेट राहते. कधी कधी शरीरात पाण्याची कमतरता झाली की, अशा प्रकारे अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा पाण्याचे सेवन करत राहा. तासा तासाला जर तुम्ही पाणी पित राहाल तर तुमचा पोटाचा कोटाही चांगला राहतो. भूक लागण्यास मदत होते. भूक ही संवेदना अशक्तपणा असताना फारशी जाणवत नाही. कारण अशावेळी काहीही खाण्याची इच्छा होत नाही. पण पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला भुकेची संवेदना नक्कीच होऊ लागेल. पाण्याचे सेवन करा.
ताजी फळं (Fresh Fruits)
फळं ही कोणत्याही वेळी खाण्यासाठी चांगली असतात. फळांचा रस हा अशक्तपणावर फारच फायदेशीर ठरतो. जर तुम्ही अशक्त असाल आणि तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा नसेल अशावेळी ताजी फळ तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात फायबर देण्याचे काम करतात. फळांचे सेवन हे फायबर शरीराला मिळवण्यासाठी केले जाते. जर तुमचे वजन कमी झाले असेल किंवा शरीरात त्राण नाही असे तुम्हाला वाटत असेल तर अशावेळी ताज्या फळांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरते.
ताज्या भाज्या (Fresh Vegetable)
भाज्या या कधीही आरोग्यासाठी चांगल्याच असतात. आहारात भाज्या असतील तर आजार हे चार हात दूरच राहतात. भाज्यांमध्ये कॅल्शिअम,आर्यन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन A,C,K,E, फॉलिक अॅसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. जर रक्ताची कमतरता किंवा इतर काही शारिरीक व्याधी तुम्हाला असतील तर तुम्ही आहारात वेगवेगळ्या भाज्या खायला हव्यात.
कार्बोहायड्रेटचा साठा (Complete Carbohydrates)
कार्बोहायड्रेट शरीरासाठी फारच गरजेचे असतात.शरीरात कार्बोदकाची मात्रा पूर्ण झाली तर शरीराला उर्जा मिळते. जर तुम्हाला कार्बोदकाचे योग्य प्रमाण घेता आले तर तुम्हाल थकवा जाणवत नाही. बटाटा, रताळी, पाव,दूध अशा काही पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात हे पदार्थ आहारात आणले की, लगेचच पोट भरते शिवाय एनर्जी मिळते. असे पदार्थ तुम्ही आहारात नेहमी आणले तर तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही.
प्रथिनं (Proteins)
शरीराला प्रथिनांची गरज असते. शरीरात योग्य प्रमाणात प्रथिने असतील तर इन्स्टंट एनर्जी मिळते. प्रथिन ही चिकन, पनीर, मासे, भाज्या यांमधून आपल्याला सकस आणि शरीराला पोषक असे घटक मिळतात. शरीरासाठी प्रोटीन्स हे फारच गरजेचे असतात. त्यामुळे शक्य असेल तेव्हा आहारात जास्तीत जास्त प्रथिनं असून द्या. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. प्रथिनांचा विचार केला तर प्रथिनं ही शरीराला नुसती जडत्व आणत नाहीत. तर शरीराला आवश्यक असलेली उर्जा पुरवण्यास मदत करतात.जर तुम्ही अशक्त झाला असाल तुमचे वजन हे तुमच्या उंचीच्या तुलनेत कमी झाले असेल तर तुम्ही आहारात प्रथिनांचा समावेश करायला हवा.
मशरुम्स (Mushrooms)
मशरुम्स हे अनेकांच्या खाद्यपदार्थाचा भाग असतील. पण काही जणांना मशरुम्स खायला आवडत नाही. पण मशरुम्समध्ये व्हिटॅमिन B, निनॅसिन असे काही अन्य घटक असतात. मशरुम्स खाल्ल्यामुळे लाल पेशी वाढण्यास मदत मिळते. या लालपेशी शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात. त्यामुळे शरीराला आपसुकच एनर्जी मिळते. मशरुम्स खाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. तुम्ही अगदी भाजी किंवा कोणत्याही वेगळ्या रुपात मशरुम्स खाऊ शकता. तुम्हाला नक्कीच अशक्तपणातून सुटका मिळेल.
केळी (Banana)
स्वस्तात मस्त आणि बारमाही फळ म्हणजे केळी. केळी ही इन्स्टंट एनर्जी देणारी असतात. त्यामुळे तुम्ही आहारात केळ्यांचा समावेश करावा. बरेचदा मेहनतीचे काम केल्यानंतर ज्यावेळी एनर्जी कमी होते त्यावेळी झटपट एनर्जी वाढवण्यासाठी केळी खाल्ली जातात. मोलमजूरी करणारी मंडळीसुद्धा केळी खातात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केळींचे सेवन करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल.
ग्रीन टी (Green Tea)
अशक्तपणामध्ये मेंदूचे कार्य मंदावते. ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीराला कार्य करण्यासाठी आदेश देणाऱ्या मेंदूला चालना देते. ग्रीन टी मध्ये फारच कमी प्रमाणात कॅफेन असते. जे शरीरासाठी चांगले असते. कॅफेनमुळे शरीराला किक मिळत असली तरी जास्त कॅफेन असलेली कॉफी शरीराला डिहायड्रेट करु शकते. त्यामुळे ग्रीन टी ही कॉफीपेक्षा सरस ठरते.
रताळी (Sweet Potatoes)
रताळी हा फायबरचा पुरेपूर साठा असलेला पदार्थ आहे. रताळी उकडून किंवा भाजून खाल्ली जातात. जर तुम्ही रताळी खाल्ली तर तुमच्या शरीरात पिष्टमय पदार्थ जातात. पिष्टमय पदार्थ हे शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर असे पदार्थ पटकन पोट भरण्यास मदत करते. जर तुम्हाला योग्य उर्जा हवी असेल तुम्ही रताळी खा. रताळीमुळे तुमचे वजनही वाढत नाही आणि शरीरालाही योग्य पद्धतीने उर्जा मिळण्याचे काम करते.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)
अपुरी झोप, अपुरा आहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष या तीन कारणांमुळे अशक्तपणा येतो. या व्यतिरिक्त अन्य काही कारणे आहेत ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. पण सर्वसाधारणपणे या तीन कारणांमुळे अशक्तपणा जाणवू लागतो.
झोपेची कमतरता, अॅनेमिया आणि सतत विचार करणाच्या सवयीमुळे येणारा मानसिक थकवा हे काही अशक्तपणाचे प्रकार आहेत. ज्यांच्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका.
शरीराला इन्स्टंट उर्जा मिळावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी एनर्जी पावडर, फळांचे सेवन करु शकता. फळांमध्ये असलेला रस हा शरीराला पटकन तरीतरी देण्याचे काम करतो. याशिवाय कधी कधी लिंबू सरबत किंवा फळांच्या रसामुळेही शरीराला उर्जा मिळते.