तुम्हालाही येते का पहाटे जाग, मग वाचाच

तुम्हालाही येते का पहाटे जाग, मग वाचाच

झोप ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक मानवी शरीराला गरजेची आहे. काही जणांची झोप ही खूप असते. तर काही जणांची झोप ही अगदी प्रमाणात असते. कोणताही गजर न लावता त्यांना अगदी सहज जाग ठरलेल्या वेळी जाग येते. खूप जण सकाळी उठण्याचा खूप प्रयत्न करतात. पण सगळ्यांनाच सकाळी उठणे जमते असे नाही. तुम्हालाही पहाटे एखाद्या ठराविक वेळी जाग येते का? जर तुम्हाला पहाटे एका ठराविक वेळी जाग येत असेल तर अशी जाग येणे फारच शुभ आहे असे म्हटले जाते. पहाटे 4 ते 5 दरम्यान जर तुम्हाला जाग येत असेल तर त्याला ब्रम्ह मुहूर्त’ असे म्हटले जाते. अशावेळी जाग येणे हे का शुभ आहे ते जाणून घेऊया.

दिवसाची सुरुवात करा सूर्योदय कोट्सपासून (Sunrise Quotes In Marathi)

ब्रम्ह मुहूर्त म्हणजे काय?

Instagram

रात्रीचा शेवटचा प्रहर  म्हणजे प्रहार 4 ते 5.30 वाजताचा काळ हा ब्रम्ह मुहूर्त मानला जातो. उत्तम स्वास्थ्य आणि देव-देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर अंथरुणाचा त्याग करावा असे म्हणतात.  असे केल्यामुळे दिनचर्या लवकरात लवकर सुरु होते. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ हा चांगला कामांसाठी मिळतो.  एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात ही पहाटे उठून करावी असे म्हटले जाते. ब्रम्ह मुहूर्तावर उठून  अशी काम केल्यास तुम्हाला त्याचे फायदेच फायदे मिळतात. 

ब्रम्ह मुहूर्ताला जाग येण्याचे फायदे

जर तुम्हाला अशा वेळांमध्ये जाग येत असेल तर तुम्हाला त्याचे फायदेही माहीत असायला हवेत. जाणून घेऊयात या वेळेत जाग येण्याचे फायदे 

  • ब्रम्ह मुहूर्तावर जाग येण्याचा सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे उत्तम आरोग्य.सकाळी उठल्यामुळे वातावरणात असलेला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. जो शरीरासाठी फारच फायदेशीर असतो. जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळाल्यामुळे शरीर निरोगी राहते. 
  • पहाटे लवकर उठल्यामुळे काम करण्यास पुरेसा वेळ मिळतो. कामांची मांडणी करण्यास आणि त्याचे नियोजन आखण्यास पुरेसा वेळही मिळतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वरुपात स्वस्थ राहण्यास मदत मिळते. 
  • पहाटे लवकर उठल्यामुळे त्वचा आणि केस सुंदर राहते.  कारण शरीरावरील ताण कमी होतो. जर तुम्हाला चांगली त्वचा आणि केस हवे असेल तर तुम्ही या वेळात उठल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. 
  • ब्रम्ह मुहूर्तावर उठल्यामुळे मेंदूलाही चांगली चालना मिळते.  खूप वेळ मिळाल्यामुळे खूप काही काम करण्यासाठी शरीर आणि मनाची तयारी होते.  जी उशीरा उठल्यामुळे मुळीच होत नाही. 
  •  जर तुम्हाला अश मुहूर्तावर जाग येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. यावेळी उठून तुम्ही बाहेर चालायला गेलात किंवा व्यायाम केलास तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा मिळतो.

नियमित करा प्राणायाम आणि मिळवा अफलातून फायदे (Pranayam Benefits In Marathi)

या मुहूर्तावर जाग येण्यासाठी

जर तुम्हाला या वेळेवर जाग यावे असे वाटत असेल तर तुम्ही रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे. आदल्या रात्री तुम्ही लवकर झोपलात तर तुम्हाला जाग येण्यास मदत होऊ शकते. सुरुवातीला तुम्ही अलार्म लावून उठा आणि त्यानंतर तुम्हाला आपोआपच या वेळात जाग येईल आणि लवकर झोपही येईल. 


आता ब्रम्ह मुहूर्त म्हणजे काय ते कळले असेल तर तुम्ही नक्कीच या वेळेवर उठून आपली रोजची काम करा. तुम्हाला नक्कीच तुमच्यामध्ये बदल जाणवेल. 

सकाळी उठल्यावर बघत असाल मोबाईल, तर वेळीच व्हा सावध!