ADVERTISEMENT
home / Fitness
Pranayam Benefits In Marathi

जाणून घ्या प्राणायामाचे फायदे मराठीमध्ये (Pranayam Benefits In Marathi)

सुदृढ शरीरासाठी ‘योग’ महत्वाचा आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वेगवेगळ्या फायद्यांसाठी वेगवेगळी योगासनं केली जातात. पण श्वसनासाठी केला जाणारा योग म्हणजे ‘प्राणायाम’. श्वास हा प्रत्येक मानवी शरीरासाठी महत्वाचा घटक आहे.श्वासामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत मिळते. पण शरीरासाठी श्वास हा महत्वाचा असताना तो सरसकट शरीरात नुसता भरुन चालत नाही. तो शरीरात घेतानाही योग्य पद्धतीने घेणे गरजेचे असते. श्वासाचे कार्य नीट असेल तर सगळे आजार दूर राहतात. प्राणायाम म्हणजे श्वासावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवण्याचा योग. तुमचे शरीर व मन संतुलित करण्यासाठी तु्म्ही योग करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्राणायाम नक्कीच करायला हवा. प्राणायामची माहिती घेताना त्याचे प्रकार, फायदे आणि करण्याची योग्य पद्धतही जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया प्राणायामाचे फायदे आणि अत्यंत महत्वाची माहिती.

प्राणायाम म्हणजे काय ? (What Is Pranayam In Marathi)

प्राणायाम म्हणजे काय?

Instagram

योगाचे एकूण आठ अंग आहेत. त्यापैकी आठवे अंग म्हणजे ‘प्राणा + आयाम’.शरीर व मनाच्या शुद्धीचे साधन म्हणजे ‘प्राणायाम’. ही श्वास लांबण्याची प्रक्रिया असून श्वासावर नियंत्रण आणण्यासाठी हा व्यायामप्रकार केला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर प्राणायम म्हणजे लयबद्ध पद्धतीने केलेले श्वसन होय. प्राणायाम केल्यामुळे आपले आपल्या श्वासावर नियंत्रण राहते. श्वासोच्छवास सुरु असेल तर माणूस जीवंत आहे असे आपण म्हणतो. श्वास घेण्याची क्रिया थांबली की मात्र माणूस मरण पावला असे आपण म्हणतो. असं म्हणतात श्वास जास्त घेतला की, माणसाचे आयुष्य कमी होते. पण जर श्वास योग्य पद्धतीने आणि शरीराच्या आवश्यकतेनुसार घेतला तर आयुष्य वाढते. आपल्या श्वासावर आपले नियंत्रण असायला हवे. जर आपले आपल्या श्वासावर नियंत्रण नसेल तर त्यासाठी प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो. प्राणायामाचे प्रकार ही आहेत जे तुम्ही वेगवेगळ्या फायद्यांसाठी करु शकता.

प्राणायाम फायदे मराठी (Pranayam Benefits In Marathi)

जाणून घ्या प्राणायामाचे फायदे

ADVERTISEMENT

Instagram

प्राणायाम म्हणजे काय ते जाणून घेतल्यानंतर प्राणायम केल्यामुळे नेमके काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

वजन कमी करण्यास मदत (Weight Loss)

वजन कमी करण्यासाठीही प्राणायाम केला जातो. सतत एका जागी बसणे, चुकीचे खाणे यामुळे पोटाचा घेर वाढू लागतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाकी नऊ येतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम हा फारच महत्वाचा आहे. या शिवाय वजन कमी करण्यासाठी योगासनं आहेत. प्राणायामामधील कपालभाती हा प्रकार वजन कमी करण्यासाठी मदत करतो. व्यायामाने पोटाचा घेर कमी करून शरीराचा बांधा कमनीय करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर तुम्ही प्राणायाम करायला हवा. जर तुम्ही तो नियमित केला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळेल. तुमचे वजन कमी होईल. तसंच बॉडी पॉश्चर सुधारण्यासाठी गोमुखासन माहिती नक्की घ्या. 

सुंदर त्वचा (Skin Health)

श्वासोच्छवास उत्तम असेल तर त्याचा फायदा तुमच्या त्वचेलाही मिळतो. शरीरातून विषारी घटक काढून टाकण्याचे काम प्राणायम करते. प्रणायाम करताना श्वास हा योग्य पद्धतीने शरीरात घेतला जातो आणि शरीराबाहेर टाकला जातो. असे केल्यामुळे त्वचेखाली असलेल्या कोलॅजनला वाढण्यास मदत मिळते. प्रदूषण, धूळ, माती, घाण या खाली दडलेली त्वचा मोकळा श्वास घेते. त्वचेला असणारे पिंपल्स, तेलकट त्वचेचे त्रास यामुळे दूर होण्यास मदत मिळते. या शिवाय त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी योगासनं ही केली जातात.

ADVERTISEMENT

पचनशक्ती सुधारते (Improves Digestion)

कसेही आणि कोणत्याही वेळी खाणे आरोग्यासाठी नेहमीच हानिकारक असते. जर तुमचेही लाईफस्टाईल असेच झाले असेल ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला होऊ लागला असेल तर तुमच्यासाठी प्राणायाम फारच उत्तम आहे. प्राणायाम केल्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. पचनासाठी योग्य आहार ही आवश्यक आहे. पोटावर ताण पडल्यामुळे पोटाची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पाईल्स किंवा पोट साफ होण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही हमखास प्राणायम करायला हवा.

नाकाचे विचार (Nasal Problem )

नाक चोंदणे, सतत सर्दी होणे, डोकेदुखी असे त्रास अनेकांना असतात. नस्यसंदर्भातील विकार तुम्हाला असतील तर तुम्ही प्राणायाम करायला हवा. प्राणायाम करताना नाकावाटे श्वास घेतला जातो. तो श्वास घेण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे नाकाचे विकार दूर होतात. काही जणांना श्वास घेताना अडथळा येतो अशांना श्वास घेण्यास त्रास होत नाही. नाकाच्या विकारांनी त्रस्त असणाऱ्यांनी वेळ मिळेल तेव्हा प्राणायाम करावा.

फुफ्फुसांचे आजार (Healthy Lungs)

फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही प्राणायाम हा फार महत्वाचा असतो. श्वास घेण्याची प्रक्रिया योग्य आणि सुरळीत झाल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. सध्याचा कोरोना काळ पाहता फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखणे फारच गरजेचे आहे. जर तुम्ही प्राणायाम केले तर अनेक आजारांपासून दूर राहता येेते.

ह्रदयाचे आजार (Cardiovascular Health)

उच्च रक्तदाब, हार्निया असे ज्यांना त्रास असतील अशांसाठी प्राणायाम हा फारच फायद्याचा आहे. कपालभाती, भस्त्रिका असे काही प्राणायामाचे प्रकार केल्यामुळे ह्रदयांच्या आजारांपासूनही मुक्तता मिळते. शरीराला आवश्यक असा रक्त पुरवठा मिळाल्यामुळे ह्रदय निरोगी राहण्यास मदत मिळते. जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुम्ही दररोज प्राणायाम करा. तुम्हाला नक्की बरे वाटेल.

ADVERTISEMENT

मेंदूचे आरोग्य (Brain Health)

मेंदूचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी उत्तम रक्त पुरवठा होणे गरजेचे असते. प्राणायाम केल्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत राहतो. याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. मेंदूचे कार्य व्यवस्थित सुरु राहते. मेंदूला योग्य रक्त पुरवठा झाला की मेंदूचे कार्य सुरळीत राहते. शरीरावर असलेला ताण कमी करण्यासाठी प्राणायाम मदत करते. प्राणायाम केल्यामुळे एकाग्रवृत्ती वाढते. त्यामुळे जाणीव आणि शरीराचे कार्य योग्य सुरु राहते.

दररोज शीर्षासन करा आणि मिळवा फायदे (Benefits Of Sirsasana In Marathi)

शरीर शुद्धीकरण (Detoxification)

प्राणायामामध्ये श्वास आत घेऊन तो बाहेर सोडला जातो. ज्यावेळी आपण श्वास आत घेतो त्यावेळी आपण शरीरात ऑक्सिजन घेतो आणि जो बाहेर सोडतो तो कार्बन डायऑक्साईड सोडतो. शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडून जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्राणायाम मदत करते. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी शरीरात ऑक्सिजन जाते आणि ज्यावेळी आपण श्वास सोडतो त्यावेळी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. म्हणजे शरीराचे शुद्धीकरणे होते. ज्याचा फायदा आपल्याला त्वचा आणि उत्तम केसांसाठी होतो.

झोपेचे आजार (Sleep Disorder)

निद्रानाशाचा त्रास हल्ली सगळ्यांनाच असतो. सतत मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करत राहिल्यामुळे झोपेचा त्रास अनेकांना होऊ लागला आहे. अपुऱ्या झोेपेमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतात. शरीराला होणारा हा त्रास टाळायचा असेल तर प्राणायाम हे फार महत्वाचे आहे. प्राणायाम केल्यामुळे शरीर आणि मन शांत होते. मन शांत असेल तर झोप शांत लागण्यास मदत होते. जर तुम्हाला झोपेचा त्रास असेल तर हळुहळू प्राणायाम करायला घ्या. झोपेसाठी उपयुक्त टीप्सने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

ADVERTISEMENT

ताण तणाव करते दूर (Stress Reliever)

प्राणायाम हा तणावमुक्ती करणारा असा योगाचा प्रकार आहे. मन अस्थिर असेल अशांनी जर प्राणायाम केला तर त्यांचे मन शांत राहण्यास मदत मिळते. काही जणांना सतत बैचन असणे, कोणत्याही गोष्टीकडे मन एकाग्र करता येत नाही. अशांना जर तणावातून मुक्तता हवी असेल तर तुम्ही प्राणायाम करायला हवा. प्राणायाम केल्यामुळे मनाला शांती मिळते. ताण-तणावातून मुक्त व्हायचं असेल तर प्राणायाम करा.

प्राणायाम प्रकार मराठी (Types Of Pranayam In Marathi)

सर्वसाधारणपणे प्राणायामाचे आठ वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. हे प्राणायाम करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. जाणून घेऊया प्राणायामाचे प्रकार आणि प्राणायामाचे फायदे

कपालभाती

कपालभाती

Instagram

ADVERTISEMENT

कपालभाती या प्राणायामाच्या तंत्रामुळे शरीरातून उच्छवासाद्वारे विषारी वायू बाहेर जाण्यास मदत मिळते. कपालभातीच्या नियमित सरावामुळे बुद्धी तल्लख राहते. चयापचय क्रिया चांगली राहण्यासाठी कपालभाती मदत करते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. या शिवाय रक्ताभिसरण सुधारल्यामुळेही शरीराचे कार्य चांगले राहण्यास मदत मिळते. त्यामुळे चेहऱ्यावर तेजही येते. सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही हा प्राणायाम नक्की करा.

भस्त्रिका

भस्त्रिका

Instagram

भस्त्रिका या व्यायाम प्रकारामध्ये श्वास आत घेतला जातो आणि एकदम जलद गतीने बाहेर सोडला जातो. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत मिळते. प्राणायामाच्या या प्रकारामुळे शरीराला उर्जा मिळते. यामुळे नाक, घसा आणि सायनस संदर्भात असलेल्या तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, पोटातील हवा बाहेर पडण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम मदत करतो.

ADVERTISEMENT

शितली

शितली प्राणायाम

Instagram

शरीराला थंडावा देणारा व्यायाम प्रकार म्हणजे शितली प्राणायाम. शितली या व्यायामप्रकारामध्ये श्वास हा तोंडावाटे घेतला जातो आणि नाकातून हवा सोडली जाते. जीभेवाटे श्वास आतल्यामळे थंडावा शरीराला मिळतो. प्राणायामाच्या या प्रकारामुळे पोटाचे प्रकार,ताप, पिक्त, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

नाडी शोधन प्राणायाम

नाडी शोधन प्राणायाम

ADVERTISEMENT

Instagram

डाव्या आणि उजव्या नासिकेतून श्वास आत घेत आणि बाहेर सोडण्याचे काम नाडी शोधन प्राणायामामध्ये केले जाते. या प्राणायामामुळे डाव्या आणि उजव्या मेंदूच्या कार्यात समतोल राखण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे श्वसनाचा मार्ग मोकळा होतो. शिवाय रक्ताभिसरण सुधारते.शरीरामधील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण योग्य होते.

उज्जायी प्राणायाम

उज्जायी प्राणायाम

Instagram

ADVERTISEMENT

चिंता, ताणतणाव आणि विचारांनी तुम्ही ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी उज्जायी व्यायामप्रकार हा फार महत्वाचा आहे. यामध्ये श्वासोच्छवास अत्यंत मंद असा करण्यात येतो. मन शांत करुन आरामात श्वास घेतला जातो. प्राणायामाच्या या प्रकारामुळे पिट्युटरी आणि लिम्बिक प्रक्रिया योग्यपद्धतीने चालते.

अनुलोम-विलोम

अनुलोम- विलोम

Instagram

अनुलोम विलोम हा प्राणायामाचा प्रकार खूप जणांना माहीत असलेला असा असेल अनेक ठिकाणी याचे बरेच अनुलोम विलोमचे फायदे सांगितले जातात. अनुलोम- विलोम या प्राणायामामुळे मन शुद्ध होते, ताणतणावतून त्वरीत आराम मिळतो,निरोगी फुफ्फुसे व शरीराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे आंतरिक थंडावा मिळतो. नियमित व्यायाम केल्यामुळे मज्जासंस्थेलाही चालना मिळते.

ADVERTISEMENT

भामरी प्राणायाम

भामरी प्राणायाम

Instagram

भ्रामरी म्हणजे भुंगा. प्राणायामाचा हा प्रकार करताना भुग्यांचा भुणभुण केल्याचा आवाज होतो. म्हणून याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी हा प्राणायाम खूपच चांगला आहे. मायग्रेनसारखी डोकेदुखी असणाऱ्यांनी हा प्रकार नक्की करायला हवा. त्यामुळे शरीराला शांती मिळण्यास मदत मिळेल.चिंता, काळजी दूर करण्याचे काम हा प्रकार करतो.

सूर्यभेदन प्राणायाम

सूर्यभेदन प्राणायाम

ADVERTISEMENT

Instagram

प्राणायामाच्या या व्यायामप्रकारात उजव्या नासिकेतून हवा आत घेतली जाते आणि डाव्या नासिकेतून हवा बाहेर सोडली जाते.  या प्रकारामुळे संपूर्ण शरीर सक्रिय आणि कार्यक्षम होते. शरीराला अपुरा ऑक्सिजनचा पुरवठा होत असेल तर तो ही सुरळीत होण्यास मदत मिळते. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1- आठ प्रकारचे प्राणायाम कोणते ?

सर्वसाधारणपणे प्राणायामाचे 8 प्रकार आहेत. कपालभाती, भस्त्रिका, शितली, नाडी शोधन प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, अनुलोम- विलोम, भामरी प्राणायम, सूर्यभेदन प्राणायाम असे प्राणायाचे आठ प्रकार आहेत.

2- सगळ्यात महत्वाचे प्राणायम कोणते ?

‘कपालभाती’ हा प्राणायामामधील सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. बुद्धीला तेज आणणारे असे हे प्राणायामाचे तंत्र आहे. हे तंत्र शरीर व मन दोन्ही संतुलित ठेवण्यास मदत करते. या प्राणायामाच्या मदतीने शरीरातून 80 टक्क्यांहून अधिक विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर शुद्धीसाठी प्राणायामाचा हा प्रकार फारच महत्वाचा आहे. कपालभाती केल्यामुळे चयापचय क्रियाही सुधारते. रक्ताभिसरण क्रिया सुधारल्यामुळे चेहऱ्यावर तेज येते.

3- कोणते प्राणायाम सगळ्यात आधी करायला हवे ?

प्राणायामाचा कोणता प्रकार पहिला करायचा याही पेक्षा महत्वाचे आहे प्राणायाम कधी करायला हवे. प्राणायाम हा उपाशी पोटी आणि कोणत्याही वेळी करु शकता. तो योग्य पद्धतीने आणि त्याचे फायदे जाणून घेत करणे हे फार महत्वाचे असते.

23 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT