आजकाल सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळवणं हा तर आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यातही जर साडी नेसली असेल तर फोटो तर पोस्ट करायलाच हवा. साडी ही तर भारतीय महिलांची ओळख आहे. पण हा फोटो पोस्ट करताना त्याखाली नक्की काय कोट्स (marathi saree quotes) लिहायचे जेणेकरून आपला फोटो अधिक सुंदर दिसेल आणि कमेंट्सही जास्त मिळतील याचा आपल्याला बरेचदा विचार करावा लागतो. पण तुम्हाला काही सुचत नसेल तर अस्सल मराठमोळा साज केल्यावर, अस्सल मराठमोळे साडी कोट्स (aaree quotes in marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हालाही साडी नेसल्यावर आता फोटो पोस्ट करताना जास्त विचार करावा लागणार नाही. पाचवारी साडी असो वा नऊवारी साडीचा साज असो (nauvari saree quotes in marathi) तुम्हाला नक्कीच हे कोट्स वापरता येतील. तुमच्या स्टेटससाठीही (status on saree in marathi) तुम्हाला या कोट्सचा वापर करून घेता येईल.
Table of Contents
- साडी कोट्स (Traditional Saree Quotes In Marathi)
- साडीमधील फोटोसाठी मराठीतून कॅप्शन (Caption For Saree Pic In Marathi)
- नऊवारी साडी कोट्स मराठीमध्ये (Nauvari Saree Quotes In Marathi)
- मराठी साडी कोट्स (Marathi Saree Quotes)
- साडीवरील मराठी स्टेटस (Status On Saree In Marathi)
- पैठणी साडी कोट्स मराठीतून (Paithani Saree Quotes In Marathi)
साडी कोट्स (Traditional Saree Quotes In Marathi)
साडी ही खरं तर आपल्याकडे सर्वात सुंदर पोशाख म्हणून ओळखली जाते. साडी नेसल्यानंतर प्रत्येक मुलगी ही सुंदरच दिसते. असेच साडी काढल्यानंतर तुम्ही साडी कोट्स वापरू शकता.
1. जरीच्या साडीत सजून धजून
येई सौंदर्य अधिक खुलून
2. कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी
3. मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा
4. साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा
अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा
5. मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं
6. साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही
7. पारंपरिक ते अधिक सुंदर!
8. साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना
सौंदर्य खुलविते खास
9. आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार
10. साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा
मुलींसाठी इन्स्टाग्रामसाठी झक्कास बायो मराठीमध्ये
साडीमधील फोटोसाठी मराठीतून कॅप्शन (Caption For Saree Pic In Marathi)
साडीमधले फोटो कितीही काढले तरीही समाधानच होत नाही. आपल्याकडे प्रत्येक मुलीला साडीची फॅशन ही कायम भुरळ घालत आली आहे. साड्यांचेही अनेकविध ट्रेंड येत असतात आणि आपल्याकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांना साडी नेसून फोटो काढणं हा तर अविभाज्य भाग आहे. अशाच साडीमधील काही फोटोंसाठी लागणाऱ्या मराठी कॅप्शन
1. साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा
2. साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
3. महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं
4. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं
5. ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल
6. आयुष्य लहान असलं तरी चालेल, पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा!
7. आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही
साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं!
8. मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….
9. साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याच कपड्यांमध्ये दिसून येत नाही
10. जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम!
वाचा – जुन्या साडीपासून नवीन ड्रेस बनवण्यासाठी खास आयडियाज
नऊवारी साडी कोट्स मराठीमध्ये (Nauvari Saree Quotes In Marathi)
अस्सल मराठमोळं सौंदर्य म्हटलं की, समोर येते ती नऊवारी साडीतील छबी. नऊवारी साडीचा साजच काही वेगळा आहे. नऊवारी साडी नेसल्यानंतर खुलून दिसणारं सौंदर्य हे अफलातून! अशाच नऊवारी साडीसाठी काही साडी कोट्स खास तुमच्यासाठी
1. मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!
2. नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!
3. एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं
4. अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…
रत्नप्रभा तनु ल्याली
5. छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार
6. नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू काळजात घुसलेली कट्यार…
7. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा
8. नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!
9. नाद करायचा नाय! मराठमोळा साज, आहे आमची वेगळीच बात!
10. नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज
बाई नजर ना लागो कुणाची आज!
मराठी साडी कोट्स (Marathi Saree Quotes)
सोशल साईट्सवर अनेकदा आपण इंग्रजीतून फोटोला कॅप्शन दिलेल्या अथवा कोट्स दिलेले पाहतो. पण मराठी भाषा इतकी सुंदर असताना आणि आपल्याला मराठीतून व्यक्त व्हायचे असताना आपण मागे राहून कसं चालेल? खास तुमच्यासाठी मराठी साडी कोट्स
1. साडी नेसा आणि त्यांना तुमच्याकडे पाहण्यासाठी एक कारण नक्की द्या!
2. साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते
3. साडी म्हणजे एक वेगळी ओळख, साडी म्हणजे आत्मविश्वास आणि साडी हीच आहे एक वेगळी भाषा
4. सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी
5. लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी
6. तुमच्या रोजच्या आयुष्यात हवा असेल ग्लॅमरचा तडका तर
निवडा साडीचा योग्य पर्याय!
7. वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय!
8. आजन्म प्रेम म्हणजे साडी!
9. साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा नेहमीच तोकडी पडते
10. जेव्हा स्त्री साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना तोंड थकत नाही
साडीवरील मराठी स्टेटस (Status On Saree In Marathi)
केवळ सोशल मीडियावरच नाही तर तुमच्या स्टेटसवरही तुम्ही जेव्हा साडीमधील फोटो पोस्ट करता तेव्हा तुम्हाला काही मस्त स्टेटस ठेवायचे असतात. असे काही मराठमोळे स्टेटस खास तुमच्यासाठी.
1. मुलींसाठी सर्वात मादक अशी फॅशन म्हणजे साडी
2. साधेपणातच आहे सौंदर्य!
3. मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी
4. लावण्य म्हणजे साडी!
5. साडीतील लावण्य हे कधीच जुनं होत नाही
6. कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा
पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही
7. साधेपणा आणि मादकता याचा सुंदर मेळ घडवून आणते ती साडी!
8. प्रत्येक साडीची एक कहाणी असते….तुम्हाला माझी कहाणी कळतेय का?
9. साडीला नकार देणं कधीच शक्य नाही
10. माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी
पैठणी साडी कोट्स मराठीतून (Paithani Saree Quotes In Marathi)
पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान आहे. पैठणी म्हटलं की महाराष्ट्रीयन महिलांच्या डोळ्यात एक चमक दिसून येते. आपल्या कपाटामध्ये एक तरी पैठणी असावीच असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. पैठणी साडी नेसल्यानंतर आपण काय कोट्स ठेऊ शकतो ते जाणून घ्या. या मदर्स डे ला आईला शुभेच्छांसह पैठणीही द्या भेट.
1. गोष्ट एका पैठणीची!
2. पैठणीइतकं सुंदर काहीच नाही
3. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…पैठणी आहे साड्यांची शान
4. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत सुंदर…म्हणून दिसतो सुंदर
त्यावर पैठणीचा कहर
5. पैठणीचा साज…मराठी मुलींचे सौंदर्य भन्नाट
6. नवरीचा माज येतो असेल जर पैठणीचा साज!
7. पैठणी आहे साड्यांची राणी…प्रत्येक महाराष्ट्रीन मुलीसाठी सखीसाजणी
8. आभाळ फिरून येईल
ढग दाटून येतील ग
मनातल्या हुंद्क्याचा
डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं…तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं
9. अस्सल मराठमोळं सौंदर्य… पैठणी
10. साड्यांची आन, बान आणि शान…पैठणी आहे आमचा मान!
You May Also Like,
Saree captions for instagrqam
Traditional Caption for instagram