ADVERTISEMENT
home / आरोग्य
सैंधवने करा वजन कमी, जाणून घ्या काळ्या मिठाच्या पाण्याचे फायदे

सैंधवने करा वजन कमी, जाणून घ्या काळ्या मिठाच्या पाण्याचे फायदे

आर्युर्वेदानुसार काळं मीठ म्हणजेच सैंधव आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतं. खाद्यपदार्थ स्वादिष्ट करण्यासोबतच सैंधवमुळे तुमच्या अनेक आरोग्यसमस्या कमी होतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आजवर अनेक प्रयत्न केलेले असतील. पण आहारात फक्त सैंधवचा समावेश केल्यामुळेही तुमचे वजन कमी होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? यासाठीच जाणून घ्या काळं मीठ अथवा सैंधव वापरून तुम्ही तुमचे वजन झटपट कसे कमी करू शकता.

पोटाची चरबी कमी होते

आयुर्वेद सकाळी उपाशीपोटी काळं मीठ कोमट पाण्यातून घेण्याचा उपचार सांगितलेला आहे. कारण यामुळे तुमचे पोट चांगले स्वच्छ होते. संशोधनानुसार हा उपाय तुमच्या पोटातील चरबी कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. कारण आहारात सोडियमचे  प्रमाण वाढल्यास तुमचा लठ्ठपणा वाढू लागतो. मात्र काळ्या मिठाचे सोडिअमचे प्रमाण कमी असते. शिवाय सैंधव मध्ये अॅंटि ओबेसिटी गुणधर्म असतात. ज्याचा तुमच्या लठ्ठपणा आणि वजनावर परिणाम होतो. जेवल्यावर तुम्हाला पोट जड वाटत असेल तर तुम्ही जेवल्यावरही मुखवासामधून सैंधव अथवा काळ्या मिठाचे पाणी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे अन्न चांगले पचते आणि पोटातील चरबी कमी होते.

शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते

काळ्या मिठाचं पाणी हे तुमच्या शरीरासाठी एका डिटॉक्स वॉटरप्रमाणे काम करते. पोट स्वच्छ होण्यासाठी आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून काळे मीठ घेऊ शकता. यासोबतच लिंबू पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत, जलजिरा अशा पेयांमध्येही काळ्या मीठाचा समावेश करा.

बद्धकोष्ठता कमी होते

घरात बसून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बद्धकोष्ठतेचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काळ्या मिठात लैक्सेटिव घटक असतात. ज्यामुळे तुमच्या पोटातील गॅसेस, बद्धकोष्ठता, अपचन, अॅसिडिटीचे त्रास कमी होतात.ज्यांना या प्रकारचे त्रास आहेत त्यांनी आहारातून नियमित काळे मीठ घेण्यास सुरुवात करावी. लवकरच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम झालेला दिसून येईल.

ADVERTISEMENT

काही किलोंनी होईल वजन कमी

काळे मीठ आणि लिंबू पाणी पिण्याने तुमची पचन संस्था सुधारते. या पाण्यामुळे तुमच आतड्यांचे कार्य सुरळीत होते ज्याचा चांगला परिणाम पचन संस्थेवर होतो. या दोन्ही गोष्टींचा परिणाम तुमच्या वजनावर होऊन तुमचे वजन काही किलोंनी कमी  होते.  जर तुमच्या आतड्यांचे कार्य सुरळीत नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होऊ शकत नाही. पण काळ्या मिठाच्या पाण्यामुळे तुमच्या वजन कमी  करण्याच्या प्रयत्नांना चांगली साथ मिळते आणि तुमचे वजन काही किलोंनी कमी होते.

लिंबू पाणी आणि काळ्या मीठाचा असा करा वापर

दररोज सकाळी हे पेय तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त लिंबू, पाणी आणि काळे मीठ लागेल. एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. चिमूटभर सैंधव टाकल्याने या डिटॉक्स ड्रिंकची चव आणि फायदे दोन्ही अफलातून होतील. मिश्रण चांगले मिक्स करा आणि सकाळी अनोशीपोटी म्हणजे उपाशी पोटी प्या. तुम्ही सकाळी उठल्यावर अथवा जेवल्यानंतरही हे पेय पिऊ शकता. तुमच्या वजन कमी  करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी आणि काही  किलोमध्ये झटपट वजन कमी करण्यासाठी याचा नक्कीच चांगला फायदा होईल. पण  लक्षात ठेवा तुमचे वजन कमी करण्याचे स्वप्न फक्त या पेयाने पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्हाला योग्य  आहार आणि नियमित व्यायाम करायलाच हवा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

दह्यात मीठ घालून खाणं योग्य की अयोग्य

ADVERTISEMENT

तुम्हालाही सवय आहे का जेवताना कच्चं मीठ खाण्याची

आहारात मीठाचा वापर कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

01 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT