ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
मिरर स्किन ट्रेंडची इतकी क्रेझ का, मग तुम्ही जाणूनच घ्या

मिरर स्किन ट्रेंडची इतकी क्रेझ का, मग तुम्ही जाणूनच घ्या

चमकदार चकचकीत त्वचेसाठी तुम्हाला काही करायला सांगितले आणि तुम्ही ते करणार नाही अस मुळीच होणार नाही. जगभरात कोरियन स्किनकेअर रुटीन या फारच प्रसिद्ध आहेत. कोरियन स्त्री- पुरुष दोघांची स्किन पाहिल्यानंतर अशी त्वचा आपल्याला मिळावी असे सगळ्यांनाच वाटते. सध्या कोरियन ट्रेंडमधला मिरर स्किन ट्रेंड खूपच ट्रेंडमध्ये आहे. प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर त्याची चर्चा होताना दिसत आहे. मिरर स्किन अर्थात काचेसारखी नितळ आणि एकदम पारदर्शक अशी त्वचा. ही त्वचा घरबसल्या तुम्हालाही मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टी करायच्या आहेत ज्या वेळकाढू वाटल्या तरी देखील फारच फायद्याच्या आहेत.

कोरियनमुलींसारखी नितळ त्वचा हवी असेल तर तुम्ही करायला हवे हे

मिरर स्किन ट्रेंड म्हणजे काय?

आता खूप जणांना मिरर स्किन ट्रेंड म्हणजे हा एक प्रकारचा फिल्टर आहे असे वाटेल. पण कोरियन स्किनकेअरची ही पद्धत इतकी चांगली आहे की, त्यामुळे तुमच्या त्वचेला आतून ग्लो मिळण्यास मदत मिळते. या स्टेप्स थोडया जास्त असल्या तरी कठीण नाहीत. यामध्ये कोणत्याही महागड्या प्रॉडक्टसचा उपयोग केला जात नाही. तर तुम्हाला यामध्ये घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींचाच वापर करायचा असतो.

अशी घ्याल त्वचेची काळजी तर त्वचा कायम दिसेल तुकतुकीत

ADVERTISEMENT

मिरर स्किन त्वचा बनवण्याच्या या महत्वाच्या स्टेप्स

मिरर स्किन मिळवण्याच्या चार महत्वाच्या स्टेप्स आता आपण जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला मिळेल सुंदर आणि स्वच्छ त्वचा 

  • उत्तम आहार: खानपान हे कधीही आरोग्यासाठी चांगलेच असते. कोरियन महिलांच्या त्वचेसाठी तुम्हालाही तुमच्या आहारात चांगल्या गोष्टी आणाव्या लागतील. फायबर, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. शक्य असल्यास तुम्ही जंक फुड टाळणे हे नेहमीच चांगले. त्यामुळे तुम्ही आहारात चांगले पदार्थ असू द्या. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. 
  • डबल क्लिन्झ पद्धत: तुम्ही घरी असा किंवा बाहेर पडा तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये घाण जाण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही दिवसातून दोन वेळा तुमची त्वचा स्वच्छ करायला हवी. त्यासाठी तुम्ही फेसवॉश लावण्याच्या आधी तुम्ही फेसऑईल लावून चेहरा स्वच्छ करा आणि त्यानंतरच तुम्ही फेसवॉशचा वापर करा. 
  • एक्सफोलिएशन: त्वचा स्वच्छ करण्यासाठी एक्सफोलिएशनही फार महत्वाचे आहे. आठवड्यातून फक्त एकदाच एक्सफोलिएशन करायला हवे. अगदी माईल्ड स्क्रबचा उपयोग करुन तुम्ही त्वचा स्क्रब करु शकता. कारण असे केल्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळू शकते.  असे करताना कधीही जाड किंवा कठीण स्क्रबचा उपयोग करु नका. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. 
  • रोज मॉश्चराईज करा: त्वचा मॉश्चराईज करणे हे देखील फार गरजेचे असते. जर तुम्ही मॉश्चराईजरचा उपयोग करत असाल तर त्यामुळे तुमची त्वचा नरीश राहण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही दररोज त्वचेला मॉश्चरायझर लावायला मुळीच विसरु नका. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळेल. 
    आता कोरियन मिरर स्किन रुटीन असे करा फॉलो आणि मिळवा तुमच्यासाठी सुंदर त्वचा

नाक आणि कपाळ होते तेलकट, करा हे सोपे उपाय

07 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT