Fitness

आरोग्यासंबंधित ‘हे’ 10 फॅक्ट्स माहीत आहेत का – Facts About Health

Dipali Naphade  |  Jul 22, 2019
आरोग्यासंबंधित ‘हे’ 10 फॅक्ट्स माहीत आहेत का – Facts About Health

आपल्या रोजच्या जीवनात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्याचे परिणाम आपल्याला माहीत असतात तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहीत आहे का या आपल्या लहानसहान चुका आपल्याला नंतर पुढे खूपच वाईट दुष्परिणाम दाखवतात. लहान छेदही मोठं जहाज बुडवायला कारणीभूत ठरतं असं म्हटलं जातं. तशीच प्रत्येक लहानसहान चूकही आपल्याला आयुष्यात खूप मोठे परिणाम भोगायला कारणीभूत ठरू शकते. त्यासाठी आरोग्यासंबंधित प्रत्येक लहानमोठी गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. वेळ असेपर्यंतच आपण आपल्या सवयी सुधारायला हव्यात, ज्यामुळे तुम्ही आयुष्यभरासाठी आरोग्याची काळजी व्यवस्थित घेऊ शकता. जाणून घेऊया काही फॅक्ट्स ज्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

जाणून घेऊया आरोग्यासंबंधित महत्त्वाच्या गोष्टी – Interesting Health Facts

1 – उभं राहून पाणी प्यायल्यास, लागणारा ठसका यावर कोणताही उपाय नाही. त्यामुळेच नेहमीच सांगितलं की, बसून पाणी प्यावं. घशात पाणी अडकल्यास, त्याचा दुष्परिणाम अतिशय वाईट होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिताना नेहमी काळजी घेणं आवश्यक आहे. भसाभस पाणी कधीही पिऊ नये. 

कुटुंबाची काळजी कशी घ्यावी हे देखील वाचा

Shutterstock

2 – जास्त वारा लागत असणाऱ्या पंख्याखाली अथवा ए. सी. जास्त वाढवून झोपल्यास, तुमचं वजन वाढतं. त्यामुळे नैसर्गिक वातावरण आणि वातावरणानुसार झोपायची सवय लावून घ्या. अन्यथा इतर ठिकाणी राहण्याचाही त्रास होऊ शकतो. 

Shutterstock

3 – कोणत्याही पेन किलरपेक्षा एक ग्लास गरम पाणी हे साधारणपणे तुमच्या 70 टक्के आजारांवर काम करतं. प्रत्येक लहानसहान गोष्टींवर औषधं आणि गोळ्या घेणं योग्य नाही. पुढे तुमच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे शक्यतो सतत औषधं घेणं टाळा. 

Shutterstock

4 – सरबत आणि नारळ पाणी या दोन्ही गोष्टी सकाळी 11 च्या आधी आपल्या पोटात जाणं हे नेहमी चांगलं. त्यानंतर तुम्ही दोन्ही गोष्टी प्यायलात तर ते तुमच्या शरीरासाठी एका विषापेक्षा कमी नाही. नारळ पाणी हे तुमच्या शरीरासाठी सकाळीच पिणं अतिशय चांगलं आहे. त्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. 

Shutterstock

5 – अल्युमिनियमच्या भांड्याचा वापर कमी करा. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर अल्युमिनिअममध्ये ठेवलेला पदार्थ थोड्यावेळाने रंग बदलतो. यामधील अॅसिड तुमच्या अन्नात उतरतं आणि नंतर ते पोटात. त्यामुळे हे तुमच्या शरीरावर हळूहळू विषाप्रमाणे काम करतं. त्यामुळे या भांड्याचा वापर करणं टाळा. शक्यतो अशा भांड्यामध्ये लिंबू, टॉमेटो असे पदार्थ ठेऊ नका. 

वाचा – नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय

Shutterstock

6 – पदार्थ खाताना नेहमी चावून खा. हे फक्त सांगण्यासाठी नक्कीच नाही. कारण न चावता पदार्थ खाल्ल्यास त्याचा तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होत असतो. आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये जितके दात आहे तितके वेळा आपण अन्न चावून खायला हवं. त्यामुळे पचायला सोपं जातं. 

Shutterstock

7 – इंग्लिश स्टाईलच्या टॉयलेट सीटवर बसून तुमचं पोट पूर्ण साफ होत नाही. कारण पोटावर योग्य दाब येत नाही. त्यामुळे पोटात घाण तशीच साचून राहते. याचा परिणाम तुमचं मेटाबॉलिजम कमी होऊन पोटात चरबी साठण्यावर जास्त होतो. तसंच यामुळे तुम्हाला जास्त आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे भारतीय स्टाईलच्या टॉयलेटचा वापर शक्यतो करावा. जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. 

Shutterstock

8 – रात्री उशीरापर्यंत जागत राहिल्यास, सकाळी झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला रात्री कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं काम नसेल तर शरीराला रोज वेळेवर झोपायची आणि लवकर उठायची सवय लावा. रात्री उशीरापर्यंत टीव्ही अथवा मोबाईल बघत बसण्याने तुमच्या आरोग्यासाठी, मुख्यत्वे डोळ्यासाठी चांगलं नाही. हे एखाद्या स्मोकिंगप्रमाणेच तुमच्या शरीरासाठी घातक आहे. 

Shutterstock

9 – धावपळीच्या आयुष्यात बरेच लोक सकाळी नाश्ता करत नाहीत. पण ही सर्वात मोठी चूक आहे. नाश्ता न केल्यास, तुम्हाला अधिक त्रास होतो. याबरोबरच एनिमिया, ऑस्टियोपोरोसिस, कॅल्शियमची कमतरतात, केसगळती, गॅस्ट्रिक, मधुमेह इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागतं. 

Shutterstock

10 – बरेच लोक शिंक येत असतील तर ती थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणं तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. असं केल्यामुळे तुमच्या रक्ताच्या नसा फाटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शिंक रोखण्याचा प्रयत्न करू नये. 

Shutterstock

हेदेखील वाचा 

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी

‘या’ गोष्टी ज्या वाढवतील तुमची प्रतिकारशक्ती आणि ठेवतील तुम्हाला एकदम फिट!

रोज ‘10’ टीप्स करा फॉलो आणि करा वजन कमी

 

Read More From Fitness