पालकत्व

2 वर्षाच्या बाळाचा आहार | 2 Varshachya Balacha Aahar

Leenal Gawade  |  May 22, 2022
2 Varshachya balacha aahar

घरात बाळ असेल तर त्याच्या खाण्यापिण्यापासून त्याच्या वाढीवर घरातील सगळ्यांचेच लक्ष असते. बाळ अगदी जन्माला आल्यापासून त्याच्या वाढीच्या पुढील टप्प्यात बाळाची काळजी घ्यावी लागते. बाळाला सरसकट असे काहीही देऊन चालत नाही. या आधी आपण 5 महिन्याच्या बाळाचा आहार, 7 महिन्याच्या बाळाचा आहार, 9 महिन्याच्या बाळाचा आहार, 1 वर्षाच्या बाळाचा आहार  पाहिले आहे. बाळाची वाढ थोडी झाली की, म्हणजेच बाळाला दात आले ते व्यवस्थित खाऊ लागले. बाळ 2 वर्षांचे झाले की, बाळाच्या आहारात नेमके काय असायला हवे ते देखील माहीत असायला हवे. 2 वर्षाच्या बाळाची वाढ ही बऱ्यापैकी झालेली असते. साधारण दीड वर्षाचे बाळ हात धरुन जिना चढू लागते. मोडके तोडके बोलणे, उचलून खाणे, काय हवे नको ते सांगणे, शी-सू झाल्याची सूचना देणे असेे सगळे बाळाला सांगता येते. दोन वर्षाच्या बाळाचा  आहार (2 varshachya balacha aahar) कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट करायला हव्यात याची योग्य माहिती आपण आज घेणार आहोत. चला घेऊया या संदर्भातील माहिती 

2 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता | 2 Year Old Baby Diet Chart In Marathi

2 Year Old Baby Diet Chart In Marathi

2 वर्षाच्या बाळांची वाढ पाहता त्यांना बऱ्यापैकी सगळे दात आलेले असतात. दात आल्यामुळे त्यांना व्यवस्थित चावून खाता येते. त्यामुळे त्यांना आपण खातो तो आहार बऱ्यापैकी देता येतो. इतक्या वयात तुम्ही बाळाला घरी तुम्ही जे खाता ते पदार्थ खाण्याची सवय लावू शकता. पण असे करताना तुम्हाला मुलांना योग्य असा आहार देणे गरजेचे असते. मुलांना योग्य प्रमाणात पोषण या वयात मिळाले तर बाळांची वाढ चांगली होण्यास मदत मिळते. या वयात मुलांच्या आहारात चढ -उतार सुरु असतो. कधी बाळ जास्त खाते. कधी कमी खाते. हे अगदी सर्वसामान्य आहे. बाळ जेवढं खात असेल तेवढंच त्याला द्या. बाळांना जबरदस्ती खायला देऊ नका. दूध, फळं, दही, चीझ, ब्रेड असे पदार्थ देऊ शकतात. या वयातील बाळांची पचनशक्ती चांगली असते. त्यांना बेताने आणि योग्य असा आहार द्या. 2 varshachya balacha aahar कसा असावा ते जाणून घेऊया

 वारसकाळचा नाश्तामिड मॉर्निंगदुपारचे जेवणसंध्याकाळचा नाश्तारात्रीचे जेवण
सोमवारशीरा/ उपमाफळांचा रसपुलावथालिपीठडाळ- भात
मंगळवार चोकोस/ दूधव्हेजिटेबल स्टॉकपालक पनीर आणि चपातीफळांच्या फोडीभाजी भात
बुधवार ईडली चटणी आणि सांबारचिकूच्या फोडी / पपईच्या फोडीदाल खिचडीदूधसोयाबीन चंक्स आणि भात
गुरुवारपुरी बटाट्याची भाजीसीझनल फळ
( आंबा, द्राक्षे)
डाळ भातउकडलेली कडधान्यपालेभाजी आणि चपाती
शुक्रवार आम्लेटतांदळाची पेजउकडलेले चिकन आणि चपातीतांदळाची पेजभाज्यांचा पराठा
शनिवार भाजी रोलमटणाचे सूपपातळ भाजी आणि चपातीपपई  किंवा उकडलेला बटाटामिश्र डाळींची खिचडी आणि तूप
रविवारब्रेड बटरउकडलेली अंडी किंवा अंड्याचे आम्लेटतळलेला मासा आणि डाळ भातदूध/ सँडवीचपुलाव
2 Year Old Baby Diet Chart In Marathi

2 वर्षाच्या बाळासाठी सर्वोत्तम आहार | Best Food For 2 Year Old Baby In Marathi

Best Food For 2 Year Old Baby In Marathi

2 वर्षाच्या बाळाला अनेक गोष्टी कळतात. त्याला चांगली वाईट चव कळत असते. त्यामुळे त्याला थोडे चवीचे असे खायला द्यावे लागते. पण असे करताना त्यामध्ये अनेक पोषकत्व देखील असावे लागतात. यात काय काय समाविष्ट करायला हवे ते जाणून घेऊया.

दूध आणि दुधाचे पदार्थ

बाळांसाठी आणि कोणत्याही वयातील मुलांसाठी दूध हे फारच चांगले असते. दूधामध्ये असलेले कॅल्शिअम बाळांना मिळाले की, त्यांच्या हाडांना बळकटी मिळण्यास मदत मिळते. जर बाळ दूध पिण्यासाठी नखरे करत असेल तर हल्ली दूधात घालण्यासाठी चॉकलेट पावडर मिळते. ते घातले तरी बाळ दूध पिते. दुधासोबत दही, चीझ, पनीर असे पदार्थ बाळांना दिले तरी चालेल. पण हे पदार्थ मुलांना जास्त ही देऊ नका. त्यांना प्रमाणात या गोष्टी द्यायला हव्यात. 

तूपातील शीरा, लापशी 

 दोन वर्षांच्या मुलांच्या शरीरात तूप देखील जायला हवे. आता नुसते तूप देण्यापेक्षा त्यांच्या पोटत काही चांगले जात असेल तर ते अधिक चांगले. म्हणूनच तुम्ही बाळांना तुपातील शीरा, लापशी असे करुन देऊ शकता. बाळांना गोड खायला आवडत असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी काहीतरी नाश्ता द्यायचा असेल अशावेळी तुम्ही त्यांना तुपातील शीरा, लापशी देऊ शकता. लापशी, शीरा हा पोटभरीचा आहे. बाळासाठी त्याचे प्रमाण योग्य असू द्या. खूप वेळा बाळाला आवडते म्हणून किंवा ते खाते म्हणून त्याला एखादा पदार्थ जास्त भरवला जातो. असे अजिबात करु नका.

सूप्स

खरंतर दोन वर्षाची मुलं छान चावून खाऊ शकतात. पण काही बाळ ही भाज्या खाण्यासाठी कुरकुर करतात. त्यांना भाज्या दिसल्या की, ते खायला बघत नाहीत. अशावेळी तुम्ही काही भाज्या एकत्र करुन त्यांना सूप्स बनवून देऊ शकता. भाज्यांचे सूप्स बनवताना त्याची चव चांगली करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडा खडा मसाला जसे की मिरी, थोडासा चाट मसाला असे घालून ते चविष्ट करु शकता.
उदा. खूप जण भाज्या खात नाहीत असे म्हणतात. पण त्यांना पावभाजी आवडते. अगदी त्याचप्रमाणे भाज्या न खाणाऱ्या बाळांसाठी सूप्स हा एक चांगला पर्याय आहे. 

स्टर फ्राईड भाज्या

भाज्या मुलांना द्यायच्या असतील आणि त्यांना आवडत असतील तर तुम्ही स्टर फ्राईड भाज्या देखील देऊ शकता. हे करणे फारच सोपे आहे. फ्लॉवर, गाजर, बटाटा, ब्रोकोली अशा भाज्या तुम्ही त्यांना नुसत्या तेलात किंवा तुपात परतून देऊ शकता. या भाज्यांमध्ये थोडेसे मीठ घातले आणि त्यांच्या आवडीचे एखादे सीझनिंग की ते आवडीने खातात.

मासे, चिकन आणि अंडी

जर तुम्ही मासांहार करणारे असाल तर बाळाच्या आहारात मासे, चिकन, अंडी हे अगदी हमखास असायला हवे. त्यामुळेही मुलांना चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. मासे, चिकन आणि अंडी देताना ती जास्त तिखट असणार नाही याची काळजी घ्या. कारण मुलांना कोणताही पदार्थ वाढताना जर ते अति प्रमाणात तिखट असेल तर त्यांना हगवण, पोटदुखी, जळजळ असा त्रास होऊ शकतो. यावयातील मुलांना असे त्रास होणे हे स्वाभाविक असते.  यासोबतच काही बाहेरचे पदार्थ तुम्ही त्यांना दिले तर ते देखील चालू शकते. 

2 वर्षाच्या बाळाने किती खायला हवं | How Much A Baby Should Eat At This Age Marathi

How Much A Baby Should Eat At This Age Marathi

दोन वर्षाचे बाळ हे अगदी व्यवस्थित जेवते. त्यामुळे त्याला व्यवस्थित आहार देण्यास काहीच हरकत नाही. पण बाळाने किती खायला हवे याचेही एक प्रमाण असते. 2 वर्षाचे बाळ हे आईच्या दुधावर अजिबात अवलंबून नसते. पण तरीदेखील स्तनपान शक्य असेल तर लहान बाळाला स्तनपान करण्यास काहीच हरकत नाही. पण स्तनपान खूपवेळा केलं तर मुलं बाहेरच दुध प्यायला बघत नाही. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या चवीचे जेवण दिवसातून तीन वेळा तरी द्या. जेवणासोबतच बाळाला पाणी देणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. बाळाला जितके पाणी द्याल तितके चांगले. फळांचा रस देताना तो अर्धा कपाच्या वर नसावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाचा आहार हा वेळेत द्यायला हवा. तुम्ही वेळेत बाळाला जेवण दिले तर त्यांना चांगल्या सवयी लागतात. शिवाय मुलांना जेवू घालताना त्यांना बसून जेवण्याची सवय लावावी. म्हणजे त्यांना जेवण भरवताना बरेच काही शिकवता येते.

2 वर्षाच्या बाळासाठी मुख्य पोषक तत्वे कोणती आहेत?

2 वर्षाच्या बाळासाठी नेमकी कोणती मुख्य पोषकत्वे असायला हवीत असा प्रश्न पडला असेल तर याची माहिती देखील तुम्हाला असायला हवी.
बाळाच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, आर्यन यांची गरज असते. त्यानुसार तुम्ही बाळांच्या आहारात समाविष्ट करायला हव्यात.  त्यामुळे मुलांची वाढ होण्यास मदत मिळते.

2 वर्षाच्या बाळासाठी सोप्या रेसिपीज  | Homemade Baby Food Recipes For 2 Year Old Baby

तुमच्या बाळाने कोणतेही नखरे न करता खावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही सोप्या पण बाळांना अशा आवडणाऱ्या रेसिपीज देखील ट्राय करु शकता. 

लापशी

साहित्य : लापशीचा रवा, तूप, दूध, वेलची पूड, गूळ
कृती: 

पिवळ्या बटाट्याची भाजी

बटाटा हा लहान बाळांना खूपच जास्त आवडतो. बटाटा आणि भात असा आहार देखील तुम्ही मुलांना देऊ शकता.

साहित्य: उकडलेले बटाटे, आलं-लसूण-मिरची पेस्ट( मुलांच्या तिखटेच्या क्षमतेनुसार), बारीक चिरलेली कोथिंबीर, मऊ भात, मोहरी,हळद तेल
कृती:

भाजणीचे थालिपीठ

 भाजणीचे थालिपीठ हे खमंग असते. मुलांच्या तोडांची चव वाढवतील. शिवाय मिश्र डाळी लहान मुलांच्या पोटातही जातील. 

साहित्य:  थालिपीठाची भाजणी, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, आवडीच्या भाज्या, मीठ, कोथिंबीर, तूप किंवा पांढरे लोणी
कृती:

2 वर्षाच्या बाळाला कुठले पदार्थ देऊ नये | Which Food To Avoid For Baby In Marathi

बाळांना काय द्यायला हवे हे आपण जाणून घेतले. पण दोन वर्षाचा बाळाचा आहारात काय नसावे हे देखील माहीत असायला हवे. हल्लीच्या लाईफस्टाईल बदलामुळे अनेक खाद्यपदार्थ सहज उपलब्ध झालेले आहेत. जे बाळांच्या जीभेचे चोचले पुरवतात. पण ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.

  1.  मैदा युक्त पदार्थ- पिझ्झा, पास्ता 
  2.  केक पेस्ट्री सारखे अति गोड पदार्थ 
  3. तिखट पदार्थ 
  4. खूप मीठ असलेले पदार्थ- चिप्स किंवा अन्य पदार्थ ज्यामध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. 
  5. कोल्डड्रिंक्स

2 वर्षाच्या बाळाच्या आहारासंबंधी पडणारे सामान्य प्रश्न । FAQ 

प्रश्न : 2 वर्षाच्या बाळाला दररोज किती कॅलरी लागतात?
उत्तर :  2 वर्षाच्या बाळाला संपूर्ण दिवसभरात 1,000 ते 1,400 कॅलरीज या पुरेशा असतात. त्यांचे वजन आणि आकार याच्यानुसार पालकांनी मुलांना आहार द्यावा. या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणे हे कधीही चांगले. कारण तेच तुम्हाला बाळाच्या आहारबद्दल योग्य सल्ला देऊ शकतात.

प्रश्न: 2 वर्षाच्या बाळाने दिवसातून किती वेळा खावे?
उत्तर: सर्वसाधारणपणे बाळाने दिवसातून तीन वेळा खाणे तरी गरजेचे असते. तुम्ही वेळा पाळून त्यांना वेगवेगळे पदार्थ द्यायला हवेत. तुम्ही बाळाला तीन ते चारवेळा देखील जेवण देऊ शकता. बाळांना थोडे थोडे खायला दिले तर त्यांना

प्रश्न : दोन वर्षाच्या मुलाला मैद्याचे पदार्थ चालतील का?
उत्तर:  काही प्रमाणात मुलांना काही पदार्थांची सवय करणे हे चांगले असते. पण असे असले तरी देखील मुलांना मैदा युक्त पदार्थांची जास्त सवय लागते. मग त्यांना इतर जेवणाचे पदार्थ अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांना या पदार्थांची सवय खूप लहान वयात लावू नका. त्यामुळे त्यांचे वजन वाढण्याची शक्यता असते.

प्रश्न: या वयात कोल्ड्रिंक देणे योग्य आहे का?
उत्तर : कोल्ड्रिंक हे तसे कोणाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. लहान मुलांना कोल्ड्रिंकची सवय लागली की ते सोडता सोडवता येत नाही. हे असे थंड आहे ज्यामुळे मुलांना शौचाला त्रास होऊ शकतो. इतकेच नाही तर त्यामुळे बाळांची भूकही कमी होऊ शकते. त्यामुळे बाळांना या सवयीपासून दूर ठेवलेलेच बरे.

Read More From पालकत्व