Care

हिवाळ्यात केसातील कोंडा घालवण्यासाठी करा सोपे उपाय

Dipali NaphadeDipali Naphade  |  Nov 25, 2019
हिवाळ्यात केसातील कोंडा घालवण्यासाठी करा सोपे उपाय

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी होणे, पायाला भेगा पडणे या समस्या जशा कॉमन आहेत तशीच अजून एक समस्या येते ती म्हणजे केसातील कोंडा. बऱ्याचदा हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा निर्माण होणं हे अतिशय कॉमन आहे. पूर्ण हिवाळ्यामध्ये अनेक जण या समस्येने त्रस्त असतात. त्यासाठी अनेकदा पार्लरला भेट देणं हेदेखील कॉमन असतं. पण पार्लपरमध्ये जाऊन भरपूर पैसै घालवण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी उपाय करून हिवाळ्यात केसांतील कोंडा घालवण्यासाठी सोपे उपाय करू शकता. फक्त तुम्हाला केसांची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही केसांची व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्हाला कोंड्याची समस्या नक्कीच निर्माण होणार नाही आणि जरी असेल तर त्यापासून सहज सुटका तुम्ही मिळवू शकता. आपण या लेखातून हिवाळ्यात कोंडा घालवण्यासाठी काय सोपे उपाय करायला हवेत हे जाणून घेऊया – 

कोंड्यापासून त्वरीत सुटका

Shutterstock

तुम्हाला जर कोंड्याचा त्रास हिवाळ्यात होत असेल आणि त्यापासून त्वरीत सुटका हवी असेल तर तुम्ही घरच्या घरी अनेक उपाय करू शकता. त्यापैकी एक सोपा उपाय म्हणजे दह्यामध्ये तुम्ही सफेद अंड आणि मध मिसळून घ्या. याची नीट पेस्ट करा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना लावा. साधारण अर्धा तास अर्थात 30 मिनिट्स तुम्ही हे मिश्रण तसंच केसांवर ठेवा. हे झाल्यावर थंड पाण्याने केस धुवा. तुम्हला पहिल्याच वॉशमध्ये केसांमध्ये फरक दिसून येईल. आठवड्यातून तुम्ही एक वेळा हा उपाय नक्की करून पाहू शकता. तसंच संपूर्ण हिवाळ्यात तुम्ही हा उपाय करून सुंदर केस नक्कीच मिळवू शकता. 

तुम्हाला असेल कोंडा तर हे त्रास तुम्हाला होणारच

करा ऑईल मसाज

Shutterstock

हा नक्कीच तुम्हाला माहिती असलेला उपाय आहे पण तो अंमलात आणण्याची गरज आहे. केसांना ऑईल मसाज करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला कोंड्यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही हे नक्की करा. कारण ऑईल मसाज हा केस आणि डोकं या दोन्हीसाठी परिणामकारक ठरतो. स्काल्पमध्ये हेअर मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि कोंडा जाऊन केसांची वाढही चांगली होते. तसंच डोकं शांत राहिल्याने तुम्हाला तणाव जास्त प्रमाणात येऊन कोंडा निर्माण होत नाही. हिवाळ्यात तुम्ही राईच्या तेलाचा वापर करून नक्की पाहा. राईचं तेल कोमट करून त्याने तुम्ही केसांना मसाज करा. तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं नेहमीचं नारळाचं तेलही वापरू शकता. यामुळे तुमच्या डोक्यालाही शांतता मिळते आणि कोंडाही निघून जातो. 

कोंडा असण्याची असतील 5 कारणं तर करा ‘हे’ सोपे उपाय

लिंबू आणि मधाची कमाल

Shutterstock

लिंबामध्ये विटामिन सी असल्याने तुमच्या केसांना चांगलं पोषण मिळतं. लिंबू आणि मध मिक्स करून केसांना लावल्याने कोंड्याची समस्या नष्ट होते. लिंबामध्ये असलेलं सायट्रिक अॅसिड कोणत्याही प्रकारे केसांमध्ये फंगस येऊ देत नाही आणि मध हे त्वचेतील मऊपणा जपून ठेवण्यासाठी अत्यंत उपायकारक ठरतं. त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुमच्या केसांच्या त्वचेला अतिशय मऊ ठेऊन त्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. तुम्ही हे मिश्रण तयार करून आठवड्यातून साधारण 2-3 वेळा लावा आणि लावल्यानंतर किमान 25 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर केसांना शँपू आणि कंडिशनर लावून नीट स्वच्छ धुवून घ्या. असं केल्याने तुम्हाल अजिबातच कोंंड्याची समस्या राहणार नाही. तसंच तुमचे केस अधिक चमकदार आणि मऊ, मुलायम बनतील. 

कोंडा का होतो आणि कशी सुटका मिळवावी

कोरड्या केसांमधील कोंड्याची समस्या

Shutterstock

खरं तर कोंंड्याची समस्या सर्वच प्रकारच्या केसांमध्ये होते पण हिवाळ्यात कोरड्या केसांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसते. पण यापासून वाचायचं असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलने केसांना मसाज करा. या तेलाने तुमचे केस चिकटही होत नाहीत आणि कोंडाही होत नाही. तसंच तुम्ही ऑलिव्ह ऑईल आणि मधाचं मिश्रण करून त्याचा हेअर मास्क तयार करून लावू शकता. हा मास्क लावल्यानंतर साधारण 30 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग शँंपूने हे धुवा. तुम्हाला त्याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येईल. आठवड्यातून किमान दोन वेळा तुम्ही असं केलंत तर तुमची कोरड्या केसांमधील कोंड्याची समस्या नष्ट होण्यास मदत मिळते.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Care