Eye Make Up

तुमच्यासाठी बेस्ट आहेत या 5 काजळ पेन्सिल (5 Best kajal pencil)

Leenal Gawade  |  Sep 23, 2019
तुमच्यासाठी बेस्ट आहेत या 5 काजळ पेन्सिल (5 Best kajal pencil)

‘कजरा मोहब्बतवाला अखियो मैं ऐसा डाला…’ काजळं लावायला अनेकांना आवडतं. पण काजळ डोळ्यात घालणं ही एक कला आहे. खूप जण डोळ्यांना इतकं सुंदर काजळ लावतात की काजळ लावण्याचा मोह आवरता येत नाही. आता काजळ कसं लावायचं हे शिकल्यानंतर महत्वाचा प्रश्न असतो तो कोणतं काजळ विकत घ्यायचं. कारण हल्ली बाजारात काजळच्या इतक्या व्हरायची आहेत की, कोणतं काजळ तुमच्यासाठी बेस्ट हे तुम्हाला कळायला हवं. आता तुम्हाला नेमकं कशापद्धतीने काजळ लावायचे आहे आणि तुम्हाला कोणता लुक अपेक्षित आहे या नुसार तुमच्यासाठी कोणत्या 5 काजळ पेन्सिल बेस्ट आहेत ते पाहुयात

स्मज फ्री लुक (smudge free eyes)

Instagram

आता काही जणांना काजळ लावायला आवडते. पण त्यांना काजळ अजिबात पसरलेले आवडत नाही. तुम्ही त्यातले एक असाल तर मग तुम्हाला काजळ पेन्सिल पाहताना ती स्मज फ्री आहे की नाही हे पाहणे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. हल्ली बाजारात अनेक स्मज फ्री काजळ पेन्सिल आहेत. पण तुम्हाला त्यातली बेस्ट हवी असेल तर  POPxo तुम्हाला ही काजळ पेन्सिल घेण्याचा सल्ला देईल. 

*फायदा: ही पेन्सिल पटकन लागते. जर तुम्हाला जाड काजळ लावायचे असेल तरी देखील या पेन्सिलने अगदी सहज लावता येते. किंमत देखील परवडणारी आहे. 

*तोटा: ही पेन्सिल अगदीच ओल्ड स्टाईल आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येकवेळी त्याचे टोक काढत बसावे लागते.  

काजळ लावण्याची योग्य पद्धत How to apply kajal in eyes

स्मोकी आय लुक (Smokey eye look)

Instagram

आता स्मज फ्री पेन्सिल काजळसोबत हल्ली जेल काजळ नावाचा प्रकार देखील मिळतो. तुम्हाला जाई काजळाची डबी आठवते का? कारण जेल लायनर अगदी तशाच प्रकारे येतं. पण आता नक्कीच ते जाई काजळपेक्षा अॅडव्हान्स आहे कारण ते तुम्हाला परफेक्ट मेकअप लुक देतं. जर तुम्हाला स्मोकी आईज वगैरे असा लुक आवडत असेल तर मग तुम्ही जेल काजळ देखील घेऊ शकता. जेल काजळ डबीत येतं आणि ते लावण्यासाठी सोबत ब्रश दिला जातो. तुम्ही जर क्रिएटिव्ह असाल तर मग तुम्हाला वेगळा लुक करता येऊ शकतो.

*फायदा: लावायला सोपे आहे.

*तोटा: तुम्ही ब्रश विसरलात तर याचा काहीही उपयोग नाही

काजळ लायनर ( kajal liner )

Instagram

जर तुम्ही काजळ रोजच्या रोज लावणारे असाल तुमच्यासाठी आयमेकअप हा महत्वाचा असेल तर मग तुम्ही काजळ लायनर नक्कीच ट्राय करुन पाहायला हवे. काजळ लायनर वेगवेगळ्या आकारामध्ये येते. बारीक स्टीकपासून ते जाड स्टीक अशा वेगवेगळ्या स्वरुपात त्या मिळतात. तुम्हाला काजळ आणि लायनर म्हणून याचा वापर करता येतो. हल्ली अनेक पेन्सिल या काजळ लायनर अशाच स्वरुपात मिळतात

फायदा: एकाच पेन्सिलमध्ये दोन गोष्टी मिळतात. शिवाय यामध्ये तुम्हाला हवे तसे रंग मिळतात. ड्राय पेन्सिल फॉर्ममध्ये असल्यामुळे लावायला सोप्या पडतात. 

तोटा: स्मज फ्री असलण्याचा दावा सगळ्याच पेन्सिल करत नाहीत. त्यामुळे ते पसरु शकते. 

आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Eye Make Up