Recipes

मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज (5 Delicious Indian Microwave Recipes)

Aaditi Datar  |  Apr 24, 2019
मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज (5 Delicious Indian Microwave Recipes)

आपण सगळ्यांनीच आई आणि आजीला तासनंतास किचनमध्ये आपल्या आवडीच्या डीशेश बनवताना पाहिलं आहे. खरंतर भारतीय पाककला ही सोपी नाही. योग्य प्रमाणात मसाले टाकणं, योग्य वेळ ती डीश शिजवणं आणि मग तयार होते चविष्ट डीश. तेव्हा आपल्याला त्या चविष्ट डीशमागील मेहनत कळते. कारण कधी कधी काही रेसिपीज बनवायला फारच वेळ लागतो. पण आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे इतका कमी वेळ असतो की, तासनंतास आपण किचनमध्ये उभं राहून काम करणं शक्यच नाही. त्यामुळे मायक्रोवेव्ह आजच्या गृहीणींसाठी वरदानच आहे.

तुम्ही जर मायक्रोवेव्हचा वापर फक्त जेवण गरम करण्यासाठी करत असाल तर एवढ्यावरच थांबू नका. तुम्ही याचा वापर करून अनेक डीशही बनवू शकता तेही कमी वेळात. हलवा, टिक्का, स्वादिष्ट करीपासून ते अगदी ढोकळ्यापर्यंत तुम्ही अनेक डीश मायक्रोवेव्हमध्ये तयार करू शकता. आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत कमी वेळात बनवता येणाऱ्या 5 मायक्रोवेव्ह रेसिपीज.

लो कॅलरी मायक्रोवेव्ह ढोकळा

ढोकळा एक लोकप्रिय गुजराती स्नॅक्स आहे जे चवीला फारच स्वादिष्ट आणि पौष्टीकही असतं. आतापर्यंत तुम्ही वाफवलेला ढोकळा खाल्ला असेल, पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही मायक्रोवेव्हमध्येही ढोकळा तयार करू शकता. लो कॅलरी असल्यामुळे ढोकळा हे एक खूप पौष्टीक स्नॅक्स आहे. तुम्ही ढोकळा हा ब्रेकफास्ट किंवा संधाकाळी चहाच्या वेळी खाऊ शकता.

मायक्रोवेव्ह बेसन भजी कढी

कढी ही प्रत्येकालाच आवडणारा पदार्थ आहे. मसाले आणि दही व्यवस्थित मिक्स करून तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये ही डीश अगदी 30 मिनिटांच्या आत बनवू शकता. ही एक खूपच सोपी मायक्रोवेव्ह रेसिपी आहे. ज्यामध्ये मेथीच्या बिया, तेल, कोथिंबीर आणि बेसन घालून ही डीश तयार केली जाते. ही स्वादिष्ट भजी कढी तुम्ही गरगागरम भाताबरोबर सर्व्ह करू शकता.

मँगो ड्रींक्सच्या या सोप्या रेसिपीज करा आणि मिळवा वाहवा

मायक्रोवेव्ह खीर

तांदूळाची खीर चवीवा एकदम स्वादिष्ट असते आणि कधीही पटकन करता येते. आत्तापर्यंत तुम्हीही खीर चुलीवर किंवा गॅसवर बनवताना पाहिली असेल. पण आज आम्ही याची मायक्रोवेव्हमध्ये बनवता येणारी सोपी रेसिपी दाखवत आहोत. ही खीर बनवायला अंदाजे 25 मिनिटं एवढा वेळ लागेल. पण मायक्रोवेव्हमध्ये बनवताना याची कृती थोडी वेगळी आहे.

मायक्रोवेव्ह पनीर टीक्का

पनीर टीक्का हे खूपच लोकप्रिय स्टार्टर आहे, जे प्रत्येक पार्टीच्या मेन्यूत हमखास असतंच. पनीर टीक्का हा फक्तच व्हेजिटेरियन्समध्येच नाहीतर नॉनव्हेजिटेरियन्समध्येही आवडीने खाल्लं जातो. पण तुम्ही कधी मायक्रोवेव्हमध्ये बनवलेला पनीर टीक्का खाल्ला आहे का? जर नाही तर आता करून पाहा.

वाचा – मालवणी मसाला रेसिपी मराठी

तुमच्यासाठी कच्च्या कैरीच्या स्वादिष्ट रेसिपीज

मायक्रोवेव्ह तंदूरी फ्लॉवर

पनीर टीक्काप्रमाणेच हीसुद्धा एक चांगली स्टार्टर डीश आहे. ही डीश पौष्टीकही आहे आणि नेहमीच्या स्टार्टर मेन्यूपासून वेगळी आहे.

मग तुम्हीही नक्की करून पाहा या झटपट मायक्रोवेव्ह रेसिपीज. 

देखील वाचा

उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज

रोज नाश्ता काय बनवायचा प्रश्न असल्यास, जाणून घ्या झटपट नाश्ता रेसिपी

खमंग चिवडा रेसिपी, बनवा घरच्या घरी (Chivda Recipe In Marathi)

Read More From Recipes