Care

केसगळती रोखण्यासाठी वापरा घरगुती 5 सोपे हेअर मास्क

Dipali Naphade  |  Oct 18, 2019
केसगळती रोखण्यासाठी वापरा घरगुती 5 सोपे हेअर मास्क

घनदाट, सुंदर आणि काळे केस असणं हे एक स्वप्नं असतं. तुम्ही जेव्हा केस विंचरता तेव्हा त्याचा गुच्छा होतो आणि ते तुटण्याची आणि केसगळती होण्याची शक्यता असते. ही अर्थात एक कॉमन समस्या आहे. या समस्येपासून कोणाचीही सुटका झालेली नही. तुमचे केस पातळ होतात त्यामुळे वेळीच तुम्ही याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लक्ष न दिल्यास, खाज येण्याची, टक्कल पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. केसगळती ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण जुने केस गळून त्याठिकाणी नवे आणि मजबूत केस येत असतात. पण जर ही समस्या अधिक प्रमाणात असेल तर त्याचा नक्कीच विचार करावा लागतो. त्यासाठी तुम्ही वेळीच उपचार करायला हवेत. तुम्ही त्याचे उपचार करण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क तयार करून यावर योग्य उपचार करू शकता. हे अतिशय सोपं असून तुमच्यासाठी खर्चिकदेखील नाही. 

1. अप्रतिम आवळा आणि नारळाच्या तेलाचं मिश्रण

Shutterstock

आवळ्यामध्ये विटामिन-C चं प्रमाण अधिक असतं आणि त्वचा आणि केसांसाठी तर आवळा वरदानच आहे. आवळ्यामुळे केस घनदाट, काळे आणि निरोगी राहतात. तसंच नारळाच्या तेलाने केसांचा कोरडेपणा दूर व्हायला मदत होते आणि केस अधिक मऊ आणि मुलायम होतात. 

स्टेप 1: एका भांड्यात नारळाचं तेल घ्या. तुमचे केस किती मोठे आहेत याचा अंदाज घेऊन तेलाचं प्रमाण ठरवा

स्टेप 2: तेलामध्ये 1-2 चमचे (तेलाचं प्रमाण असेल त्याप्रमाणे) आवळा पावडर घाला आणि व्यवस्थित फेटून घ्या

स्टेप 3: हा मास्क तुम्ही केसांच्या मुळापासून लावा आणि व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करा आणि मसाज झाल्यानंतर किमान 1 तास तसंच राहू द्या. तुम्ही जितका जास्त वेळा ठेवाल त्याचा तुम्हाला अधिक फायदा मिळेल. स्टेप 4: त्यानंतर तुम्ही शँपूने केस धुवा 

आवळा पावडरऐवजी तुम्ही ताजा आवळ्याचा रसदेखील वापरू शकता आणि आवळा कोमट तेलातदेखील तुम्ही मिक्स करू शकता. जेव्हा तुम्हाला केस धुवायचे असतील तेव्हा तुम्ही या मास्कचा वापर करा आणि काही दिवसातच तुम्हाला तुमच्या केसांमधील फरक दिसून येईल. 

2. मध आणि ऑलिव्ह तेलाची (olive oil) कमाल

Shutterstock

ऑलिव्ह ऑईल केस निरोगी राखण्यास फायदेशीर ठरतं आणि मध केसांना अधिक चांगल्या रितीने माईस्चराईज करतं. 

स्टेप 1: थोडसं ऑलिव्ह ऑईल घ्या आणि ते गरम करा. तुमच्या स्काल्पला लागणार असेल इतकंच तेल गरम करा 

स्टेप 2: तेलामध्ये 1 मोठा चमचा मध आणि  1 चमचा दालचिनी पावडर घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या

स्टेप 3: हा मास्क स्काल्पला व्यवस्थित लावा आणि हलक्या हाताने मसाज करा

स्टेप 4: 30 मिनिट्सनंतर पाणी अथवा माईल्ड शँपूने केस धुवा

3. नारळाचं दूध आणि लिंबाचा चमत्कार

Shutterstock

नारळाचं दूध (coconut milk) केसांना अधिक रेशमी आणि मुलायम बनवतं आणि लिंबू केसांतील कोंडा आणि दुसऱ्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त असून यामुळे केसांना अधिक चांगली चमक येते. यामुळेच केसांसाठी हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. 

स्टेप 1: 2 चमचे नारळाचं दूध घ्या

स्टेप 2: एक लिंबाचा रस काढा आणि त्या नारळाच्या दुधामध्ये मिक्स करा

स्टेप 3: हा मास्क नीट हातावर घेऊन स्काल्पवर मसाज करा

स्टेप 4: एक तासानंतर माईल्ड शँंपूने धुवा

याचा वापर तुम्ही आठवड्यातून एक वेळच करा. पातळ केस आणि केसगळतीसाठी हा अप्रतिम उपाय आहे. 

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

4. कांद्याच्या रसाची जादू

Shutterstock

होय! तुम्ही एकदम योग्य वाचलं आहे. कांद्याचा रस हा केवळ केसगळती थांबवत नाही तर केसांची वाढ होण्यासदेखील याची मदत होते. 

स्टेप 1: एक छोटा अथवा मध्यम आकाराचा कांदा किसून घ्या आणि मग तो पिळून त्याचा रस काढा

स्टेप 2: हा रस कापसाच्या मदतीने तुम्ही केसांच्या मुळांना आणि स्काल्पला लावा

स्टेप 3: 15-20 मिनिट्सनंतर शँपूचा वापर करून केस धुवा. याच्या वासामुळे तुम्हाला 1-2 वेळा जास्त शँपूचा वापर करावा लागेल. 

याचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा की, याचा वापर केसांवर केल्यावर जास्त वेळ ठेवू नका. अन्यथा याचा वास केसातून काढणं कठीण होईल. 

केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर आहेत ‘हे’ अँटी हेअर फॉल शॅम्पू

5. अप्रतिम कॅस्टर ऑईल आणि अंडं

Shutterstock

कॅस्टर ऑईल (Castor oil) मुळे केसांची वाढ होते. तसंच तुमच्या केसांना  दुहेरी फाटे फुटले असते तर यामुळे पोषण मिळतं. यामध्ये प्रोटीन, ओमेगा-6-फॅटी अॅसिड्स आणि विटामिन-E चं प्रमाण अधिक प्रमाणात असतं. अंड्याचा पिवळा भाग अर्थात egg yolk केसांना मॉईस्चराईज करून कोरडे होण्यापासून वाचवतो. 

स्टेप 1: एक अंड्याचं yolk वेगळं काढून ठेवा

स्टेप 2: आपल्या केसांच्या गरजेनुसार कॅस्टर ऑईल घ्या आणि त्यामध्ये अंड्याचा yolk व्यवस्थित फेटून घ्या

स्टेप 3: हे तुम्ही केसांना मुळांपासून लावा आणि मसाज करा. त्यानंतर केसांना नीट लावा आणि केसांच्या अगदी खालच्या टोकांपर्यंत हे पोहचू द्या

स्टेप 4: दोन तासांनी माईल्ड शँपूने धुवा

हा हेअर मास्क nourishing साठी अर्थात केसांचं पोषण करण्यासाठी चांगला आहे. आठवड्यातून एक वेळा याचा वापर कराच. 

केसगळती कशी रोखावी

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Care