बारीक असो अथवा जाडसर फिगर असो प्रत्येक महिला अथवा अगदी प्रत्येक पुरूषही आपल्या फॅशन सेन्सबाबत नक्कीच सजग असतो. अनेक सेलिब्सचे ट्रेंड्समध्ये असणारे फॅशन आपण आजूबाजूला फॉलो होताना बघतो. फॅशन ट्रेंड्ससह (Fashion Trends) नियमित कॅज्युअल फॅशन ट्रेंडमध्येदेखील (casual fashion trends) अनेक बदल दिसून येतात. विविध ठिकाणी जाताना जर तुम्हाला स्वतःला अधिक बारीक दिसायचे असेल तर तुम्ही काही हॅक्सचा वापर करायला हवा. आम्ही दिलेल्या या हॅक्सचा तुम्ही वापर केलात तुम्ही नक्कीच स्टायलिश दिसाल आणि अधिक बारीकदेखील दिसाल. आम्ही दिलेले हॅक्स तुम्हाला अधिक सुंदर आणि आकर्षक दिसायला नक्कीच मदत करेल. खास डेट नाईट असो अथवा ऑफिसमध्ये काही मोठे प्रेझेंटेशन असो तुम्हाला बारीक दिसायचे असेल तर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधील कपड्यांचा वापर करून दिसा अधिक आकर्षक!
1. प्रिंट्सच्या जागी करा पॅटर्न्सचा वापर
सर्वात पहिली आणि सोपी टिप अर्थात हॅक म्हणजे तुम्ही प्रिंट्स अथवा फ्लोरल कपड्यांच्या ऐवजी पॅटर्न्ससारख्या स्ट्राईप्स इत्यादीचा वापर तुम्ही फॅशनमध्ये करावा. तुम्हाला जर बेली फॅट समस्या असतील अर्थात तुमचे पोट अधिक मोठे असेल तर तुम्ही वर्टिकल नाही तर होरिझोंटल स्ट्राईप्स अथवा पॅटर्नचा वापर करावा. यामध्ये तुम्ही अधिक बारीक दिसता आणि अधिक आकर्षकही. यामध्ये तुम्ही अधिक बारीक दिसाल आणि वेगवेगळ्या स्टाईल करणेही तुम्हाला अधिक सोपे जाईल. प्रिंट आणि पॅटर्नच्या बाबतीत लक्षात ठेवा की, जितकी लहान प्रिंट असेल तितके लहान तुम्ही दिसाल. अर्थात तुम्ही अधिक बारीक दिसाल.
2. काळ्या रंगाची उत्तम साथ
काळ्या रंगामध्ये जाडसर माणसे अधिक बारीक दिसतात. तुम्हाला एखाद्या डेट नाईटवर जायचं असेल अथवा तुम्ही ऑफिसमध्ये एखाद्या प्रेझेंटेशनसाठी जाणार असाल तर तुम्हाला काळ्या रंगाचा वापर करणे अधिक सोपे होते. काळा रंग तुम्हाला बारीक दाखविण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे काळ्या रंगाचा वापर जाडसर दिसणाऱ्या मुली अधिक करतात आणि नसतील करत तर त्यांनी नक्कीच करावा.
तुम्ही जर काळ्या रंगाचे आऊटफिट्स घालणार असाल तर तुम्हाला अधिक बारीक दिसायला मदत मिळते. केवळ काळा रंगच नाही तर कोणतेही गडद रंग हे तुम्हाला बारीक दिसण्यासाठी मदत करतात. त्यामुळे बारीक दिसण्यासाठी तुम्ही सहसा काळ्या अथवा गडद रंगाचा वापर करावा.
3. घट्ट भारतीय आऊटफिट्सचा नका करू वापर
तुम्हाला भारतीय कपड्यांमध्ये जर आरामदायी वाटत असेल आणि तुम्ही याचा अधिक वापर करत असाल तर तुम्ही भारतीय कपड्यांचा वापर करताना लक्षात ठेवा की, भारतीय कपड्यांचे फिटिंग नक्कीच चांगले वाटते, मात्र घट्ट भारतीय आऊटफिट अजिबातच चांगले वाटत नाही. सैलसर कुर्ती, ब्लाऊजचे योग्य फिटींग, थोडीशी सैलसर सलवार हे तुम्हाला नक्कीच आरामदायी ठरते आणि तुमच्या शरीराचा समतोलही अत्यंत उत्तम राहातो. अधिक घट्ट कपडे हे तुमच्या शरीराचा आकार अर्थात शरीरावरील फॅट्स अधिक दाखवतात. भारतीय कपड्यांमध्ये जाडी अधिक दिसून येते. त्यामुळे फिट आणि घट्ट कपडे घालणे सहसा टाळा. जेणेकरून तुम्ही अजिबातच जाडसर दिसून येणार नाही.
4. अॅक्सेसरीजचा वापर करावा
बेल्ट, बॅग, हेडगिअर, स्कार्फ इत्यादी अॅक्सेसरीज तुमचा लुक अधिक तपशीलवार करण्यास मदत करते. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला जात आहात त्यानुसार तुम्ही अॅक्सेसरीजचा वापर करावा. तुम्ही नेकलाईनपासून थोडेसे लक्ष काढले तर तुम्ही हातातील अॅक्सेसरीजचा वापर केला तर तुमच्या जाडीवरून लक्ष बाजूला हटते. तसंच तुम्हाला स्वतःला बारीक दर्शवियाचे असेल तर तुम्ही नेहमी लेदरचा वापर करावा आणि तुम्ही वनपिस अथवा वेस्टर्न कपडे घातले असतील तर वेस्ट बेल्टचा वापर करा. हे तुम्हाल अधिक बारीक दर्शविण्यासाठी मदत करते.
डेट नाईट असेल तर यासाठी थोडेसे ब्लिंगही तुम्ही घालू शकता. तसंच तुम्ही नेकलेस अथवा ब्रेसलेटचीही निवड करू शकता. तसंच अशी अॅक्सेसरीज तुम्ही वापरा जो अत्यंत लाईट असेल अथवा दुसऱ्याचे लक्ष वेधून घेण्यास सक्षम असतील.
5. फॅब्रिक अर्थात कपड्यांवर लक्ष द्या
तुम्ही बारीक असा अथवा जाडसर असाल तुमच्यासाठी फॅब्रिक अथवा कपड्यांवर अधिक लक्ष द्या. कपडे तुम्हाला अधिक बारीक अथवा अधिक जाडसर दर्शवू शकतात. कॉटन, डेनिम, सिल्क अथवा लोकरीच्या कपड्यांचा वापर बारीक दिसण्यासाठी अधिक करता येतो. कॉटनच्या कपड्यांसह तुम्ही स्पेंडेक्स जर्सी इत्यादी फॅब्रिकचाही तुम्ही वापर करू शकता.
वेलवेट, मेटालिक, लेदर, ब्रोकेड, अंगोरा, टफेटा, सॅटिन, टिश्यू इत्यादी कपडेदेखील तुम्हाला अधिक बारीक दर्शविण्यासाठी मदत करतात. तुमचा हिप पोर्शन अथवा मांड्या अधिक जाडसर असतील तर तुम्ही ए – लाईन ड्रेसेससह काळ्या टाईट्स घालण्याचाही प्रयत्न करा.
हे सर्व हॅक्स तुम्हाला नक्कीच बारीक दर्शविण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि तुम्हाला अधिक आकर्षक दिसण्यासाठी मदत करतात.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक