Recipes

रात्रीच्या जेवणानंतर बनवा झटपट ‘मीठा पान’, सोपी रेसिपी

Dipali Naphade  |  Oct 29, 2020
रात्रीच्या जेवणानंतर बनवा झटपट ‘मीठा पान’, सोपी रेसिपी

आपल्याकडे बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर ‘मीठा पान’ अर्थात गोड पान खाल्ले जाते. नेहमी गोड खाणं शरीरासाठीही चांगलं नाही. मात्र पान खाणं हे नक्कीच शरीरासाठी फायदेशीर ठरतं. तुम्हाला जेवल्यानंतर काही गोड खाण्याची क्रेव्हिंग अर्थात इच्छा होत असेल तर तुम्ही अशावेळी हे गोड पान खाऊ शकता. मग अशावेळी पानवाल्याचा ठेला शोधला जातो. कारण घरच्या घरी मीठा पान तयार करता येतं याची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसते. तर हो आपणही घरच्या घरी आता चविष्ट मीठा पान तयार करू शकतो. पान हे एक पारंपरिक माऊथ फ्रेशनर आहे. उत्तम स्वाद आणि त्यासह शरीराला पोषकही असते. इतकंच नाही तर गोड खाण्याची इच्छाही या पानामुळे पूर्ण होते आणि शरीरासाठीही फायदेशीर ठरते. पान खाल्ल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी घरात कायम ठेवा MyGlamm चे वाईपआऊट

दिवाळीचा खास फराळ, मराठमोळ्या फक्कड रेसिपीज (Diwali Faral Recipes In Marathi)

शरीरासाठी उत्तम

 

पान हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. हे खाण्यासाठी कोणत्याही स्पेशल दिवसाची गरज नाही. तुम्ही घरच्या घरीही आता आरामात हे पान बनवू शकता. जेवण पचविण्यासाठी पान खाल्ल्याने उपयोग होतो. पानामध्ये औषधीय गुण असून आयुर्वेदातही याला महत्त्व दिले गेले आहे. बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्येही जेवल्यानंतर पान दिले जाते.  पानामध्ये आढळणारे तत्व शरीरातील विषारी द्रव्य मारून टाकण्यासाठी उपयोगी ठरते. तसंच यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी, अँटिडायबिटीक आणि अँटिऑक्सिडंट्स घटक भरपूर प्रमाणात आढळतात. जेवल्यानंतर पान खाण्याचे बरेच फायदे आहेत. त्यामुळे घरगुती मीठा पान कसं बनवायचं याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही मस्त चविष्ट मीठा पान घरच्या घरी बनवून त्याचा आस्वाद घ्या. 

रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

मीठा पान बनविण्यासाठी लागणारे साहित्य

 

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

बनविण्याची पद्धत

 

स्टेप 1 – सर्वात पहिल्यांदा पानं पाण्याने स्वच्छ करून धुऊन घ्या आणि सुकवून घ्या 

स्टेप 2 – वर दिलेले सर्व साहित्य तुम्हाला बाजारात मिळेल. तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर कातरलेली सुपारी पण घालू शकता.  हे सर्व साहित्य  एकत्र करून घ्या 

स्टेप 3 – पानं लावा आणि त्यावर पहिले गुलकंद लावा 

स्टेप 4 – गुलकंद लावल्यावर बाकी साहित्य पानावर घालत जा. पान व्यवस्थित बंद होईल इतक्यात हिशेबाने  बाकीचे साहित्य त्यावर ठेवत जा

स्टेप 5 – पान फोल्ड करून त्यावर आवळा कँडी, चेरी अथवा लवंगही लाऊ शकता. तुमचे मीठा पान तयार आहे. हे चवीला अत्यंत चवदार लागते आणि खायलाही सोपे. 

टीप – पान जास्त मोठे घेऊ नका. खाताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पान मध्यम आकाराचे वापरा आणि गुलकंददेखील प्रमाणात वापरा. अति गोड पान खाऊ नका. तसंच नियमित पान खाण्याची  सवय लाऊन घेऊ नका.  तुम्ही आठवड्यातून एक अथवा दोन वेळा सर्वांसाठी हे पान तयार करून खाऊ शकता. तसंच यामुळे कोणतीही हानी होत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

 

 

Read More From Recipes