तुमचे बाळ 5 महिन्याचे झाले आहे का? तुम्हाला त्याला आहार सुरू करायचा आहे का? तुम्हाला यासाठी काही टिप्स आणि काळजी घ्यावी लागेल. कारण सहसा 6 महिन्यांपर्यंत बाळ हे आईच्या दुधावर असते. आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी गरजेचे ठरते. त्यामुळे 5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असावा अथवा 5 महिन्याच्या बाळाला आहार द्यावा की नाही याबाबत अनेक पालकांच्या मनात शंका असते. बरेच पालक अजून एक महिना थांबण्याचा सल्लाही देतात. तर काही जण तुम्हाला 5 व्या महिन्यापासून आहार द्यायला काहीच हरकत नसल्याचा सल्ला देतात. पण आहार दिला तरीही 6 महिन्याच्या बाळाला आईचे दूध हे द्यायलाच लागते. 5 महिन्याच्या बाळाचा आहार नक्की काय असावा आणि त्यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा, बाळाचा आहार तक्ता काय आहे याबाबत काही महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. पण त्याआधी तुम्ही तुमच्या बाळाच्या विकासासाठी त्याला आहार सुरू करणे योग्य आहे की नाही याची माहिती त्याच्या डॉक्टरांनाही विचारून घ्यावी. त्याआधी तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का? हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Table of Contents
तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का?
तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का? हे तुम्हाला कसं समजणार असाही प्रश्न तुमच्या डोक्यात येईल. पण काही लक्षणे आहेत, जी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सोपे करून देते. तुमचे बाळ पाचव्या महिन्यात आहार घ्यायला तयार झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही लक्षणे आम्ही सांगत आहोत ती तुम्ही नक्की जाणून घ्या –
- आईच्या अंगावरील दूध पिऊन झाल्यानंतरही तुमचे बाळ जर असमाधानकारक असेल आणि भूकेसाठी अधिक रडत असेल
- तुमच्या बाळाचे डोकं सावरले असेल आणि कोणाच्याही मदतशिवाय बसण्याचा प्रयत्न करत असेल अथवा बसू शकत असेल
- तुमच्या बाळाचे तोंड चमचा तोंडात घेण्याइतके जर मोठे उघडत असेल आणि जीभ बाहेर व्यवस्थित आपणहून बाळाला काढता येत असेल
- तुम्ही जेवत असताना तुमचे बाळ जर तुमच्या ताटातील पदार्थांकडे टक लाऊन पाहात असेल आणि त्यातील पदार्थ घेण्यासाठी पुढे येत असेल
ही लक्षणे जर तुमच्या 5 महिन्याच्या लहान बाळामध्ये दिसून येत असतील तर त्याला अधिक आहाराची गरज भासत आहे हे वेळीच लक्षात घ्या. पण आहाराच्या बदल्यात तुम्ही आईच्या अंगावरील दूध पाजणे मात्र बंद करू नका. आहार चालू केला तरीही तुम्ही किमान सहा महिने बाळाला दूध द्यायला हवे. तसंच बाळाला घरगुती खाणेच द्या. नैसर्गिक खाण्यामुळे बाळाचा आहार सकस होतो.
5 महिन्याच्या बाळासाठी कोणताही सेट आहार नाही. तुमच्या बाळाला कोणते अन्न पचते यावर तुम्हाला सतत चाचपणी करत राहावी लागते हे लक्षात ठेवा. पण तरीही साधारणतः आहारामध्ये काय असायला हवे हेदेखील आपण जाणून घेऊ शकतो.
5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा
5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा किंवा त्याला सुरूवातीला कोणते पदार्थ भरवायला हवेत हे पालकांना माहिती नसते. आम्ही तुम्हाला 5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा यासाठी एक यादी देत आहोत. ज्यामुळे बाळाला आहार देण्यासाठी पहिले तुम्ही कोणते पदार्थ वापरू शकता, बाळाचा आहार तक्ता बनविण्यासाठी हे नमूद करण्यात आले आहे.
- स्तनपान वा फॉर्म्युला दूध
- मॅश्ड केळे, मॅश्ड अव्हाकाडो, पेर सॉस आणि सफरचंदाची प्युरे (सफरचंदाचा जाड रस)
- शिजलेले अथवा उकडलेल्या गाजराचा गाळलेला रस, वाटण्याचा रस, रताळ्याचा वा भोपळ्याचा रस
- कडधान्याचे सूप अथवा डाळींचे पाणी, उकडलेल्या डाळींचे पाणी (प्राधान्याने मूगडाळीचे पाणी)
- तांदळाचे पाणी जे तांदूळ शिजल्यानंतर उरते
- साबुदाण्याचे पाणी
- धान्याचे (एका) सेरेलॅक, साधारणतः तांदूळ अथवा ओटमील या पदार्थांपासून सुरूवात केल्यास, बाळाला त्रास होत नाही
या पदार्थांनी बाळाला सहसा त्रास होत नाही. त्यामुळे आहाराच सुरू करायचा असेल तर तुम्ही या पदार्थांचा समावेश करून घ्यायला काहीच हरकत नाही. पण तत्पूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
वाचा – 6 महिन्याच्या बाळाचा आहार
5 महिन्यांच्या बाळाचा आहार असा असावा – 5 Mahinyachya Balacha Aahar Marathi
5 महिन्याच्या बाळाचा आहार काय हे आम्ही तुम्हाला सांगितला पण हा आहार नेमका कसा बनवायचा हेदेखील माहीत असायला हवे. 5 महिन्याच्या बाळाच्या आहारासाठी खास रेसिपी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्ही तुमच्या बाळासाठी अशा पद्धतीने आहार बनवा आणि सकस आहार द्या. आहार बनविण्याची सोपी पद्धत आम्ही येथे खाली देत आहोत.
सेरेलॅकची रेसिपी 5 महिन्यांच्या बाळासाठी उत्तम आहार असू शकतो
Cerelac Recipe – बाजारामध्ये तयार सेरेलॅक मिळते. मात्र त्यापेक्षा तुम्ही घरात बनविलेले सेरेलॅक बाळासाठी अधिक पौष्टिक ठरते.
- तांदूळ भाजून घ्या आणि नंतर मिक्सरमधून वाटून त्याचे पीठ तयार करा
- गायीचे दूध अथवा ब्रेस्टमिल्क घेऊन ते तापवा आणि त्यानंतर त्यात तांदळाची पावडर मिक्स करून व्यवस्थित मंद आचेवर घोटून घ्या
- हे पीठ व्यवस्थित शिजू द्या. ही पेस्ट अगदी पातळ वा अगदी घट्ट नसावी याची काळजी घ्या. त्यानंतर कोमट करून बाळाला हळूहळू भरवा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाऐवजी ओटमील्सचाही वापर करू शकता. यामध्ये अजिबात साखर घालू नका हे नेहमी लक्षात ठेवा
सफरचंदाचा वा पेरचा रस चे सेवन 5 महिन्यांच्या बाळासाठी पौष्टिक आहार असू शकतो
Apple Sauce or Pear Juice – सफरचंद अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच फायदेशीर ठरते. बाळासाठी आहार चालू करायचा असेल तर सफरचंदासारखा दुसरा उत्तम पदार्थ नाही
- सफरचंद वा पेराचे साल काढून व्यवस्थित फोडी कापून घ्या
- एका भांड्यात पाणी घ्या आणि शिजवा
- शिजवून झाल्यावर सफरचंद वा पेर व्यवस्थित मॅश करा आणि त्याचा रस गाळून घ्या. जेणेकरून बाळाच्या घशात काहीही अडकणार नाही
- त्यानंतरच आपल्या बाळाला हे भरवा
मॅश्ड केळे चे सेवन 5 महिन्यांच्या बाळासाठी पौष्टिक आहार असू शकतो
Mashed Banana – केळे हे पचनशक्तीसाठी चांगले समजण्यात येते. तसंच केळं पचायला सोपे असते. त्यामुळे 5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर केळं नक्कीच योग्य आहे Mashed Bananaकेळे हे पचनशक्तीसाठी चांगले समजण्यात येते. तसंच केळं पचायला सोपे असते. त्यामुळे 5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर केळं नक्कीच योग्य आहे
- केळ्याचे साल काढून घ्या. अजिबात शिजवू नका
- एका भांड्यात केळं कुस्करून घ्या अथवा ग्राईंडरमध्ये ब्लेंड करा
- थोडंसं दूध त्यात मिक्स करून 5 महिन्याच्या बाळाला भरवा
केळं देणार असलात तर तुम्ही सेरेलॅक नाही दिलंत तरी चालेल
उकडलेला वाटाणा 5 महिन्यांच्या बाळासाठी उत्तम आहार असू शकतो
वाटाणादेखील बाळाच्या आहारासाठी उत्तम मानला जातो. पण कच्चा वाटणा राहणार नाही याची काळजी घ्या.
- वाटाणा व्यवस्थित निवडून घ्या. त्यात कीड नाही ना हे तपासून घ्या
- एका भांड्यात पाणी घ्या त्यात वाटाणा उकडू द्या
- वाटाणा पूर्ण शिजल्यावर त्याची प्युरे करा ज्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही हे तपासून घ्या
- हे मिश्रण बाळाला भरवा
हे चार सोपे आणि घरगुती पदार्थ तुम्ही 5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर नक्कीच ट्राय करू शकता.
वाचा – 9 महिन्याच्या बाळाचा आहार
5 महिन्याच्या बाळाला आहार कसा भरवावा
5 महिन्याच्या बाळाला कसा आहार भरवायचा याच्या पण काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही पहिल्यांदाच आई – बाबा झाले असाल तर तुम्हाला या टिप्स नक्कीच कामाला येतील.
- आपल्या बाळाला कोणत्याही पदार्थाची अलर्जी तर होत नाही ना हे आधी तपासून पाहा. त्यासाठी कमी प्रमाणात आहार घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
- पहिला घास संपल्याशिवाय बाळाला भरविण्याची घाई करू नका. बाळाच्या कलाकलाने भरवा. बाळाला अन्नाची व्यवस्थित चव घेऊ द्या
- बाळाला भरविण्यासाठी बेबी कटलरीचाच वापर करा. तसंच तुम्ही तुमच्या बोटांचा वापर करा. बाळाला त्रास होत नाही ना याची काळजी घ्या
- आहार चालू करताना बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. कारण बाळाला बोलता येत नाही त्यामुळे त्याला काही होत असेल तर त्याला सांगता येणार नाही. एकाच दिवशी जास्त प्रमाणात खायला देऊ नका. प्रमाण समजून घेऊन मगच द्या
FAQ’s – 5 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता
प्रश्न – बाळाला अचानक आहार द्यायला सुरूवात केल्यावर काही त्रास होतो का?
उत्तर – काही बाळांना शी चा त्रास होऊ शकतो. पण तुम्ही प्रमाणात खाणं सुरू केल्यास, बाळांना त्रास होत नाही. तसंच या पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले, मीठ मिक्स करू नये अन्यथा बाळाला त्रास होऊ शकतो.
प्रश्न – 5 महिन्याच्या बाळाला आहार देणे योग्य की अयोग्य?
उत्तर – समाजात वेगवेगळे समज आहेत. पण बाळाला आईचे दूध पुरत नसेल तर तुम्ही अत्यंत सौम्य आहार बाळाला सुरू करू शकता.
प्रश्न – 5 महिन्याच्या बाळाला आहार नको आहे हे कसे समजावे?
उत्तर – तुम्ही तयार केलेला आहार बाळ जिभेवरून फेकून देत असेल अथवा तोंड फिरवत असेल अथवा आहार घेतल्यानंतर उलटी करत असेल तर बाळाला अजूनही केवळ दुधावरच ठेवणे योग्य आहे समजावे. असे झाल्यास बाळाला आहार देऊ नये.
Disclaimer –
5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर नक्की कोणते पदार्थ हवेत अथवा कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत आम्ही तुम्हाला योग्य माहिती दिली आहे. मात्र लगेच पदार्थ देणे सुरू करू नका. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुमचे बाळ सुदृढ राहावे आणि व्यवस्थित राहावे यासाठी योग्य सल्ला घ्या.