भविष्य

या 5 राशीच्या व्यक्ती असतात प्रचंड मेहनती, घडवतात स्वतःचं नशीब

Dipali Naphade  |  May 20, 2019
या 5 राशीच्या व्यक्ती असतात प्रचंड मेहनती, घडवतात स्वतःचं नशीब

मेहनतीला कुठेच तोड नाही असं म्हटलं जातं. पण काही लोकांचं नशीब अगदी मेहनतीशिवायही झळकतं. तर काही जणांच्या नशीबात कितीही मेहनत केली तरी यश येत नाही. अशावेळी नशीबाची साथ नाही असं म्हटलं जातं. पण मेहनत करून नशीब पालटण्याची हिंमत काही व्यक्तींमध्ये असते आणि अशा 5 राशी आहेत, ज्या कधीही मेहनत करण्यापासून मागे हटत नाहीत. इतकंच नाही तर या राशीच्या व्यक्ती स्वतःचं नशीब स्वतःच घडवतात असं म्हटलं जातं. तुमचीदेखील रास यापैकी एक आहे का पाहा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती आहेत का याच राशीप्रमाणे हे जाणून घ्या.

मेष (21 मार्च – 21 एप्रिल)

मेष ही अग्नी तत्वाची रास असून कोणत्याही कामापासून या व्यक्ती मागे हटत नाहीत आणि कोणत्याही कामाला या व्यक्ती ओझं समजत नाही. काम कोणतंही असो या व्यक्ती कामाचा आनंद घेतात. आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्यात या व्यक्ती विश्वास ठेवतात. जसा विचार आयुष्याचा केला आहे त्याचप्रमाणे मेहनत करून ठरवलेल्या गोष्टी पार पाडण्यावर या व्यक्तींचा कल असतो. आपली मेहनत आणि विश्वासाने आपली सर्व स्वप्नं पूर्ण करण्याकडे यांचा कल असतो. हेच कारण आहे, ज्यामुळे या व्यक्तींची लाईफस्टाईल अधिक चांगली जगण्याची उमेद असते आणि ती पूर्ण करण्याची ताकदही या व्यक्तींमध्ये असते.

वृश्चिक ( 23 ऑक्टोबर – 22 नोव्हेंबर)


या राशीच्या व्यक्ती प्रचंड जिद्दी असतात आणि एखादी गोष्ट मिळवेपर्यंत या राशीच्या लोकांमध्ये संयम असतो. या दोन्ही विरोधाभासाच्या गोष्टीच या व्यक्तींना खास बनवतात. असं मिश्रण फारच कमी दिसतं. जल तत्वाची रास असल्यामुळे कायम नम्र राहण्याची या व्यक्तींची वृत्ती असते. कामामध्ये समाधान मिळणं हेच या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी या व्यक्ती कितीही मेहनत करू शकतात. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी जिद्दीने कसं काम करावं हे या राशीच्या व्यक्तींकडून शिकावं. असं असलं तरीही ती गोष्ट मिळेपर्यंत या राशीच्या व्यक्ती संयम सोडून देत नाहीत. शेवटपर्यंत लढत राहतात. जी गोष्ट मिळवायची आहे, त्यात या व्यक्ती इतिहास रचतात. पण या व्यक्तींच्या मूडबाबत काहीही सांगता येत नाही. शिवाय फटकळ स्वभाव असल्यामुळे त्याचा तोटाही या व्यक्तींना सहन करावा लागतो.

मकर (22 डिसेंबर – 20 जानेवारी)

या राशीच्या व्यक्ती अतिशय बुद्धीमान आणि क्रिएटिव्ह असतात. या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं काम दिलं तर ते परफेक्ट करण्यासाठी आपलं तन – मन पूर्ण त्या कामात एकवटतात. या व्यक्तींना कामाची एक प्रकारची नशा असते. मकर राशीचं प्रतीक हे बकरी आहे, बकरी कधीही आराम करताना तुम्हाला दिसणार नाही. त्याचप्रमाणे या राशीच्या व्यक्ती असतात. या राशीच्या व्यक्ती बऱ्याच अंशी तुम्हाला मेहनती दिसतात. कधीतरीच एखादा आळशी व्यक्ती या राशीमध्ये सापडेल. सर्व बारा राशींमध्ये मेहनती रास म्हणून या राशींच्या व्यक्तींकडे पाहिलं जातं. तसंच या राशीच्या व्यक्ती सिव्हिल सर्व्हिसमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात.

कुंभ (21 जनवरी – 19 फेब्रुवारी)

मेहनतीच्या बाबतीत ही रास दुसऱ्या स्थानावर आहे. जल तत्वाच्या या राशीच्या व्यक्ती या प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात. स्वप्नं पाहणं आणि ती स्वप्नं कशी पूर्ण करायची हे या राशीच्या व्यक्तींना अतिशय योग्य प्रकारे माहीत असतं. रेसमध्ये उतरल्यास, या व्यक्ती फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच उतरतात. इतकंच नाही तर कोणाचंही मन न दुखवता या व्यक्ती रेसमध्येही जिंकतात. या व्यक्ती कर्मावर जास्त विश्वास ठेवातात, नशीबावर विश्वास ठेवण्यावर यांचा कमी कल असतो. कोणत्याही परिस्थितीत लढा देण्याची या राशीच्या व्यक्तींची वृत्ती असते. कोणताही बदल या राशीच्या व्यक्तींना बेचैन करत नाही. याच त्यांच्या स्वभावामुळे या राशीच्या व्यक्ती बऱ्याच लोकांना आवडतात.

मीन (20 फेब्रुवारी – 20 मार्च)

या राशीच्या व्यक्ती कोणतंही काम इतकं मन लाऊन करतात की, समोरच्या व्यक्ती यांची प्रशंसा केल्याशिवाय राहूच शकत नाहीत. या राशीच्या व्यक्तींचा एक सरळ साधा फंडा आहे, ‘आपलं काम करत राहणं, बाकी कशाचीही पर्वा न करणं’. या राशीच्या व्यक्ती दिलेल्या वेळेत सर्व काम पूर्ण करतात. जिथे इतरांचा विचार येऊन थांबतो, तिथे या राशीच्या व्यक्ती विचार करणं सुरू करतात. जेव्हा इतर व्यक्ती परिस्थितीपुढे हार मानतात तेव्हा या व्यक्ती त्यातून योग्यरित्या मार्ग काढतात. या व्यक्तींच्या स्वभावामुळे कदाचित काही व्यक्तींना त्रास असू शकतो. पण कामाच्या बाबतीत कधीही या व्यक्ती त्रास देत नाहीत. मेहनत, प्रयत्न या दोन्ही गोष्टी या व्यक्तींमध्ये खूपच अधिक प्रमाणात असतात. यांची जिद्द हेच या व्यक्तींचं वैशिष्ट्य आहे. जे काम मनाशी ठरवतात ते काम या व्यक्ती पूर्ण करतातच.

हेदेखील वाचा –

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

 

Read More From भविष्य