Fitness

या’ 5 गोष्टींनी सुरु करा दिवस, तुम्हालाही जाणवेल फरक

Dipali Naphade  |  Jun 13, 2019
या’ 5 गोष्टींनी सुरु करा दिवस, तुम्हालाही जाणवेल फरक

सकाळी उठल्यावर तुमचं मन प्रसन्न असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो असं म्हटलं जातं. पण जर तुमची सकाळ चिडचिडेपणाने सुरु झाली तर पूर्ण दिवस तुमचा राग मनात धुमसत राहतो आणि मग दिवस खराब होतो. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला अतिशय चांगलं वाटायला हवं. त्यासाठी तुम्हाला जास्त काहीच करायचं नाहीये. तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या, केवळ 5 सोप्या स्पेप्स करायच्या आहेत आणि बघा जादू, तुमचा दिवस कसा जातो. तुमचं मन नेहमी ताजंतवानं राहील आणि तुमची चिडचिडही होणार नाही. यासाठी नक्की काय करायचं आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही रोज उठल्या उठल्या या पाच स्टेप्स करून बघा आणि काय फरक पडतोय तुमच्या आयुष्यात हे तुम्हाला स्वतःला कळेल.

Shutterstock

# स्टेप 1 – सकाळी उठण्यासाठी तुम्हाला घड्याळाचा गजर तर नक्कीच लावावा लागतो. बऱ्याचदा गजर वाजल्यावर तो बंद करण्यासाठी तुम्ही चिडचिड करतच उठता. तर गजर वाजल्यानंतर अजिबात चिडचिड करत उठू नका. अतिशय हळू उठून बसा आणि गजर बंद करा. त्यानंतर तुम्ही तुमची उशी ठेऊन त्यावर पाठ टेकवून बसा. हे सर्व करत असताना तुमचे डोळे बंदच ठेवा आणि किमान एक मिनिट उठल्यानंतर त्या सगळ्या सकारात्मक गोष्टींचा विचार तुमच्या डोक्यामध्ये आणा ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो अथवा तुम्हाला त्या गोष्टींमुळे जास्त समाधान मिळतं.

उदाहरणार्थ – सकाळी उठल्यानंतर तुमच्या बॉयफ्रेंड वा नवऱ्याबरोबर घालवलेले महत्त्वाचे क्षण, लहानपणीची तुम्हाला हसवणारी आठवण, तुमच्या पहिल्या पगाराची आठवण, तुमच्या आयुष्यात घालवलेले मस्तीचे क्षण

# स्टेप 2 – दुसरी स्टेप म्हणजे झोपेतून उठल्यावर तुम्ही तुमचं शरीर अतिशय फ्री ठेवा आणि मनापासून हसून आपल्या अंगावरचा आळस झटकून टाका. आता कमीत कमी एक मिनिटांपर्यंत सरळ बसून प्राणायाम करा. तुम्हाला स्वतःला माहीत आहे की आपल्याकडे 99 टक्के लोकांचं पोट मोठं असतं आणि रोज नियमित प्राणायाम केल्यास, तुमचं पोट तर कमी होतंच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचनशक्ती चांगली होते. प्राणायाम जे करत नाही त्यांच्या तुलनेत कितीतरी पट पचनशक्ती सुधारते. तसंच तणावही कमी होतो.

# स्टेप 3 – आता तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही तुमच्या कपाळ, आयब्रो यावर हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर आपल्या दोन्ही हातांनी हा भाग थोडासा रगडा. असं कमीत कमी 1 मिनिटांपर्यंत तुम्ही करत राहा. यामुळे तुमच्या डोक्यातील ब्लड सर्क्युलेशनची क्रिया चांगली राहाते आणि तुमचं शरीरही तंदुरुस्त राहातं.

# स्टेप 4 – चौथी स्टेप म्हणजे आता तुम्ही तुमचे डोळे उघडा आणि उठून 2 ग्लास पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास, शरीरातील टॉक्सिन बाहेर निघून जातं आणि तुम्हाला चांगली आणि चमकदार, डागविरहित त्वचा मिळते. हेच नाही तर तुम्ही असं रोज केल्यास, मासिक पाळी, पोट आणि किडनीसंबंधित तुम्हाला कोणतेही विकार उद्भवत नाहीत. शिवाय तुम्हाला मासिक पाळीचा त्रास होत असल्यास, हा त्रास निघून जातो.

# स्टेप 5 – आता सर्वात शेवटची म्हणजे पाचवी स्टेप. यामध्ये तुम्ही शेवटी एक मिनिट आपला दिवस अप्रतिम बनवण्यासाठी उठल्या उठल्या सकाळी आनंदी करा. त्यासाठी तुम्हाला जी गोष्ट सर्वात जास्त आवडते ती करा. खिडकी अथवा बाल्कनीमध्ये जाऊन ताजी हवा घ्या अथवा घराच्या बाल्कनीत झाडं लावली असल्यास, त्यांना पाणी घाला. तुम्हाला आवडतील अशी गाणी लावा आणि हवं तर त्यावर डान्स करा अथवा नुसतं संगीत ऐका. सकाळी तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारा, त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे हे दाखवून द्या.

विश्वास ठेवा तुम्ही रोज सकाळी उठल्यावर जर या 5 स्टेप्स केल्या तर तुमचा संपूर्ण दिवस खूपच आनंदी आणि तजेलदार जाईल आणि तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूच्यांनाही आनंद मिळेल. नक्की प्रयत्न करून बघा आणि आम्हाला सांगा तुमची सकाळ आणि पूर्ण दिवस आता नक्की कसा जातोय.

हेदेखील वाचा – 

लांब केसांना नुकसान पोहचवतात तुमच्या ‘या’ 5 चुका!

फिट राहण्यासाठी करिना करते ‘ही’ कठीण योगासने

चेहरा धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का

पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका

Good Morning Thoughts In Marathi

Read More From Fitness