DIY फॅशन

बॅकलेस ड्रेससाठी कोणत्या ब्रा वापराव्या, 5 प्रकार

Dipali Naphade  |  Aug 31, 2020
बॅकलेस ड्रेससाठी कोणत्या ब्रा वापराव्या, 5 प्रकार

कोणत्याही पार्टीमध्ये जायचं असेल आणि तुम्हाला बॅकलेस ड्रेस घालायचा असेल अथवा हल्ली साड्यांबरोबर बॅकलेस ब्लाऊजची फॅशन आली आहे. तर तुम्हाला हा हॉट बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर तुम्ही बिनधास्त घालू शकता. कारण तुम्हाला अशावेळी योग्य ब्रा कोणती हा विचार जास्त करण्याची गरज नाही. कारण असे ड्रेस अथवा ब्लाऊज घालायचा म्हटला की आपल्याला कोणती ब्रा घालायची याची माहिती नसते आणि त्यामुळे बऱ्याचदा ब्रा दिसते की काय असाही मनात विचार येत राहातो. पण तुम्हाला अशा Oops moment पासून दूर राहायचं असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ब्रा कोणती त्याची माहिती या लेखाद्वारे देत आहोत. यामुळे तुम्हाला योग्य फिटिंगची चिंता सतावणार नाही आणि तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात अगदी मनसोक्त बॅकलेस ड्रेस घालून मिरवू शकाल. जाणून घेऊया अशा कोणत्या प्रकारच्या ब्रा आहेत ज्या तुम्हाला मदत करू शकतील.

बॅकलेस अॅडहेसिव्ह / स्टिकी ब्रा

बॅकलेस अॅडहेसिव्ह / स्टिकी ब्रा या अशा ब्रा आहेत ज्या तुमच्या क्लिव्हेज  एरियाला सपोर्ट करत साईड आर्मच्या बाजूपर्यंत पोहचतात. याचा कोणताही भाग हा तुमच्या पाठीच्या बाजूपर्यंत फिरकत नाही. याच्या आतमध्ये एक स्टिकी मटेरियल असतं, जे तुमच्या त्वचेला चिकटतं आणि तुमच्या स्तनांना योग्य फिटिंगही देतं. तसंच बॅकलेस घातल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होऊ देत नाही. हे परफेक्ट चिकटून राहिल्याने तुम्हाला अगदी मनसोक्त बॅकलेस ड्रेसचा आनंद घेता येतो आणि तुम्ही बिनधास्त यामध्ये फिरू शकता. 

कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या

स्टिक ऑन ब्रा कप

स्टिक ऑन ब्रा कप हे सिलिकॉन मटेरियलपासून बनविण्यात येतात. याचं जसं नाव आहे तशीच ही ब्रा असते. हे केवळ ब्रा कप्स असतात जे ब्रेस्ट अर्थात स्तनांच्या पुढच्या बाजूला तुम्हाला लावायचे असतात. स्तन हलू नयेत यासाठी याचा योग्य सपोर्ट मिळतो. तसंच कपड्यातून तुमच्या स्तनांचा योग्य आकार या ब्रा कप्समुळे दिसू शकतो. केवळ ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांचे स्तन हेव्ही अर्थात खूप मोठे आहेत त्यांच्यासाठी हा पर्याय अजूनही उपलब्ध नाही. कारण मोठ्या स्तनांसाठी हे कप्स योग्य नाहीत. 

लो बॅक ब्रा

ही ब्रा अनेक प्रकारच्या स्ट्रेप्ससह उपलब्ध असते. तुमच्या ड्रेसच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याची निवड करू शकता. तसंच तुम्हाला हवं तसं ही बांधून तुम्ही याला सपोर्ट देऊ शकता. ही ब्रा हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या महिलांसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्हालाही जर बॅकलेस ड्रेस अथवा ब्लाऊज घालायचा असेल तर तुम्ही नक्कीच याचा वापर करून घेऊ शकता. तसंच ही अत्यंत कम्फर्टेबल असून तुम्हाला सतत ब्रा कडे लक्ष द्यावं लागत नाही.  

रात्री झोपताना ब्रा घालणंं योग्य की अयोग्य?

U प्लंज बॅकलेस स्ट्रेपलेस ब्रा

तुम्ही घालणारा बॅकलेस ड्रेस हा फ्रंट नेक असून डीपदेखील असेल तर त्यासाठी तुम्हाला U प्लंज बॅकलेस स्ट्रेपलेस ब्रा हा उत्तम पर्याय आहे. या ब्रा चा आकार पुढच्या बाजूने डीप यू असतो आणि यामध्ये स्टिकी मटेरियल लावण्यात आलेले असते, जे त्वचा इरिटेट न होऊ देता चांगला सपोर्ट देऊ शकते. त्यामुळे तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि तुम्हाला स्टिकी मटेरियलचा त्रास होत नसेल तर तुम्हाला बॅकलेस ड्रेससाठी या ब्रा चा पर्याय निवडणं अत्यंत फायदेशीर ठरते. 

ब्रेस्ट पेटल्स / निपल कव्हर

ब्रेस्ट पेटल्स अथवा निपल कव्हर त्या महिलांसाठी उत्कृष्ट आहे ज्यांना ब्रेस्ट सपोर्टचे टेन्शन नसते आणि त्यांना केवळ फॅशन करायची आहे. ही ब्रा देखील त्वचेवर चिकटते आणि कोणत्याही बॅकलेस अथवा डीप फ्रंट नेक ड्रेस घालायचा असेल तेव्हा तुम्ही याचा बिनधास्त वापर करू शकता. 

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From DIY फॅशन