Fitness

‘या’ आजारांवर गुणकारी ठरते कोथिंबीर, जाणून घ्या फायदे

Dipali Naphade  |  Jan 29, 2020
‘या’ आजारांवर गुणकारी ठरते कोथिंबीर, जाणून घ्या फायदे

बाजारात गेल्यानंतर इतर कोणतीही गोष्ट कदाचित आपण जास्त विकत घेत नाही जितकी खरेदी आपण कोथिंबीरची करतो. कोथिंबीर हा आपल्या जेवणातील अविभाज्य भाग आहे. पण कोथिंबीरचे आरोग्यासाठी किती फायदे होतात आणि कोणत्या आजारांवर कोथिंबीर गुणकारी ठरते याविषयी  आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. प्रत्येक भाजीत अथवा इतर गोष्टींमध्येही आपण कोथिंबीरचा उपयोग स्वादासाठी हमखास करत असतो. याचा सुगंध आणि याचा स्वाद हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. कोथिंंबीर केवळ स्वादासाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. कोथिंबीर हे एक औषधीय झाड आहे, जे अनेक गुणांनी उपयुक्त आहे. पचन शक्ती वाढवण्यासाठी, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, किडनीच्या रोगांवर अनेक ठिकाणी कोथिंबीर उपयुक्त ठरते. यामध्ये प्रोटीन, वसा, फायबर, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, थियामिन, पोटॅशियम, विटामिनशिवाय कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह याचाही समावेश  आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक अनेक पोषक तत्व यातून मिळत असतात. कोथिंबीर नक्की कोणत्या आजारांवर गुणकारी आहे ते पाहूया. 

1. मधुमेहासाठी गुणकारी

Shutterstock

कोथिंबीर ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण इलाज असल्याचं म्हटलं जातं. मधुमेहाच्या रूग्णांसाठी कोथिंबीर हे कोणत्याही औषधीय वनस्पतीपेक्षा नक्कीच कमी नाही. जेवणातील याच्या नियमित सेवनाने रक्तातील इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी याचा नियमित जेवणामध्ये वापर करायला हवं. कच्ची कोथिंबीर खाल्ल्यानेही फायदा होतो. पण तुम्हाला कच्ची कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही पदार्थांमध्ये त्याचा वापर करून खा. 

2. किडनीच्या आजारावर परिणामकारक

Shutterstock

बऱ्याच शोधामध्ये हे सिद्ध झालं आहे की, कोथिंंबीर हे किडनीसाठी अतिशय परिणामकारक आहे. कोथिंबीरमध्ये असणारे पोषक तत्व हे किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. किडनीवर कोणताही वाईट परिणाम होऊ द्यायचा नसेल तर आहारात रोज नियमित प्रमाणात कोथिंबीरचा समावेश करून घ्यायला हवा.

3. पचनशक्ती वाढण्यासाठी

Shutterstock

आपण नेहमी बघतो की, जेवणानंतर देण्यात येणाऱ्या ताकात कोथिंबीर मिक्स करून दिली जाते. याचं कारण नक्की काय  तर कोथिंबीर हे जेवण पचवण्यासाठी आणि अर्थात आपली पचनक्रिया आणि पाचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते. पोटात दुखत असल्यास अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर कुस्करून दिली आणि ते पाणी प्यायल्यास पोटातील दुखणं लगेच बरं होतं. कोथिंबीरच्या सेवनाने पचनासंबंधी त्रास हे लवकर बरे होतात. तसंच पचनशक्ती वाढते. 

दररोज धण्या-जिऱ्याचं पाणी प्या आणि निरोगी राहा

4. कोलेस्ट्रॉल करते कमी

Shutterstock

कोथिंबीर ही केवळ खाण्यात सुगंध देत नाही तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. कोथिंबीरमध्ये असणारे पोषक तत्व हे कोलेस्ट्रॉल कमी करून त्याची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत करते. त्यासाठी कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या व्यक्तींना पाण्यात धणे अर्थात कोथिंबीरचे दाणे उकळून ते पाणी प्यायला द्यावे. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखणं सोपं जातं. 

सकाळच्या नाश्त्यामध्ये असतील अशा चटणी तर आरोग्यही राहील स्वस्थ

5. एनिमियापासून मिळते सुटका

कोथिंबीर आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरते. तसंच यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं.  त्यामुळे रक्त पटकन वाढतं. याच्या वापराने याच कारणामुळे एनिमिया दूर होण्यास फायदा मिळतो. तसंच यामध्ये अँटिऑक्सिडंट, मिनरल्स, विटामिन ए आणि सी याचं प्रमाण अधिक असल्याने कॅन्सरपासूनही बचाव करण्यास याचा फायदा होतो. 

कोथिंबीरमध्ये असतात औषधीय गुण

6. डोळ्यांची दृष्टी वाढवते

Shutterstock

कोथिंबीरमध्ये असणारे विटामिन ए हे डोळ्यांसाठी उत्तम ठरते. रोज तुम्ही कोथिंबीर खाल्ली तर डोळ्यांची दृष्टी वाढण्यास याची मदत मिळते. त्याशिवाय तुम्हाला बरेच वर्ष चश्म्याची गरज भासत नाही. याबरोबरच तुम्ही गाजर ज्युसदेखील पिऊ शकता. गाजर आणि कोथिंबीरचा मिक्स ज्युस करून प्यायल्यास, तुमच्या डोळ्यांना अधिक फायदा मिळतो. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From Fitness