बदलत्या ऋतू आणि प्रदूषणानुसार आपण आपल्या त्वचेची काळजी ज्याप्रमाणे घेतो तशीच काळजी केसांचीही घेणे गरजेचे आहे. केसांची स्वच्छता करण्यासह त्यांना पोषण देणेही तितकेचे महत्त्वाचे आहे. केसांना पोषण देणे तसे तर सोपे आहे पण केसांना ऑईलिंग करणे मात्र सगळ्यांना जमतेच असं नाही. केसांना तेल मालिश करण्यामुळे योग्य पोषण मिळते आणि केसातील कोरडेपणा कमी होतो. केसांना तेल लावणं कठीण काम नाही मात्र केसांना हॉट ऑईल मसाज (Hot Oil Massage) जर तुम्ही करत असाल तर केसांना अधिक मजबूती आणि चमकदेखील मिळते. तसंच यामुळे तुमच्या केसांना अधिक फायदा मिळतो. तुम्ही नियमित अंतराने केसांना हॉट ऑईल मसाज देत असेल तर केसांना मिळू शकतो फायदा.
केसांची वाढ (Hair Growth)
केसांच्या वाढीवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. केवळ धूळ – माती आणि खाण्यापिण्याचाच नाही तर तणावामुळेही केसांची वाढ थांबते. तुम्ही गरम तेलाने केसांची चंपी केली तर त्यामुळे तुमचा तणाव दूर होतो आणि तुम्हाला डोकेही हलके वाटते. याचा परिणाम केसांच्या वाढीवर अधिक चांगला होतो. केसांना गरम तेलाने मालिश केल्यामुळे झोप चांगली येते. त्यामुळे जमल्यास, तुम्ही रोज कॅस्टर ऑईल (Castor Oil) अथवा नारळाच्या तेलाने (Coconut Oil) केसांना मसाज करा.
केसगळतीवर उपायकारक (Hair Fall)
तुमचे केस अधिक गळत असतील तर गरम तेलाने मसाज करायला हवा. विशेषतः विटामिन ईयुक्त बदामाच्या तेलाने केसांची चंप केल्याने तुमची केसगळती बंद होते आणि केस अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तुम्हाला लांब आणि चमकदार केस हवी असतील तर तुम्ही रोज केसांना गरम तेलाने मसाज द्यावा. हॉट ऑईल हेअर मसाज (Hot Oil Hair Massage) मुळे आपल्या केसांचे क्युटिकल्सदेखील दुरुस्त होण्यास मदत मिळते. हे तुमच्या निस्तेज केसांना अधिक चांगले आरोग्य मिळवून देते.
कंडिशनर (Hair Conditioner)
तुमचे केस कोरडे असल्यास, तुम्हाला नारळाच्या तेलाने केस कंडिशनिंग करायला हवेत. हे तुमच्या केसांचे फॉलिकल्स सहज पेनिट्रेट करतात आणि मुळापासून मॉईस्चराईज करण्यास मदत करतात. तुम्ही रोज याचा वापर केल्यास, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या केमिकलयुक्त कंडिशनरचा वापर केसांवर करण्याची गरज भासणार नाही. केस अधिक चमकदार आणि घनदाट होण्यास मदत मिळेल.
कोंड्यासाठी उपुयक्त (Remove Dandruff)
तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल आणि कितीही उपचार करूनही केसातील कोंडा जात नसेल तर तुम्ही केसांना हॉट ऑईल मसाज द्या. हे तुमच्या केसातील कोंडा दूर करून केस अगदी व्यवस्थित स्वच्छ करण्यास मदत मिळते. तसंच डोक्यात खाज येत नाही.
स्ट्रेटनिंग (Straightening)
तुम्हाला केसांना स्ट्रेटनिंग करण्याची इच्छा आहे अथवा तुम्ही नियमित स्ट्रेटनिंग करत असाल तर तुम्ही केसांना नक्कीच हॉट ऑईल मसाज द्यायला हवा. यासाठी तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. तेल गरम करून तुम्ही केसांच्या मुळापासून अगदी खालपर्यंत लावा. यामुळे केसांना चमक मिळण्यासह केसांना स्ट्रेट लुकदेखील मिळेल. तसंच केसांना शँपू केल्यानंतरही केस सरळ दिसतील.
दुहेरी केस (Split Hair)
प्रदूषण आणि जगण्याची पद्धत तसंच सतत ऋतूमध्ये होणारे बदल केसांना फाटे फोडतात आणि त्यामुळे दुहेरी केसांची समस्या निर्माण होते. यामुळे केस कोरडे होणे आणि निस्तेज होणे हेदेखील दिसून येते. तसंच केस दुहेरी झाल्यास, केसांची वाढही थांबते. तुम्हाला जर दुहेरी केसांची समस्या नको असेल तर तुम्ही सर्वात पहिले नारळाच्या तेलाने केसांना पोषण द्या आणि हॉट ऑईल मसाज करून केसांना कव्हर करा.
फ्रिजीनेस
आपल्याकडे अधिक महिने उन्हाळाच असतो. त्यामुळे केस फ्रिजी होणे हे अत्यंत कॉमन आहे. अशावेळी केस अधिक चिकट होतील असा मनात विचार करून अनेक महिला केसांना तेल लावत नाहीत. मात्र त्यामुळे केस अधिक निस्तेज आणि कोरडे होतात. केसांना दमटपणाची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही नियमित हॉट ऑईल मसाज केल्याने केस चमकदार होतात आणि सुटसुटीत होतात. यामध्ये गुंता होत नाही. तसंच यानंतर तुम्ही केसांना माईल्ड शँपूने धुवायला हवे.
सूचना – केसांच्या कुठल्याही समस्या हा हॉट ऑईल मसाजने दूर होतात असा दावा आम्ही करत नाही. मात्र हॉट ऑईल मसाजने केसांसाठी वर दिलेले फायदे नक्की मिळतात. समस्या मुळापासून कदाचित जाणार नाही. पण फायदा मात्र नक्की होईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक