DIY सौंदर्य

बेकिंग सोड्याचे हे 8 फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

Aaditi Datar  |  May 13, 2019
बेकिंग सोड्याचे हे 8 फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

 

 

 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या किचनमध्ये एक असा घटक उपलब्ध आहे जो आपले केस, त्वचा आणि शरीर तिन्हीसाठी फायदेशीर आहे. तो घटक आहे बेकिंग सोडा. आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या बेकिंग सोड्याचा वापर आपण चेहऱ्यापासून अगदी पायापर्यंत सुंदर दिसण्यासाठी करू शकतो.

बेकिंग सोडा हा सोडियम बायकार्बोनेटच्या नावानेही ओळखला जातो. खरंतर बेकिंग सोडा हा कडक क्रिस्टलच्या रूपात असतो मात्र नंतर त्याची वाटून पावडर केली जाते. यातील अल्कालाईन घटकांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टीक आणि अँटी इंफ्लेमेट्री गुण असतात. तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच बेकिंग सोडा हा औषधीसुद्धा आहे. पण याचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, बेकिंग सोडा शरीराच्या कमीत कमी वेळ संपर्कात राहील. त्वचेवर बेकिंग सोड्याचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून घ्या.

चला जाणून घेऊया बेकिंग सोड्याचे आश्चर्यकारी फायदे:

पिंपल्सपासून सुटका

पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम उपाय आहे. हे त्वचेचं पीएच लेव्हल बॅलन्स ठेवण्यात मदत करतं. एक चमचा सोडा थोड्याश्या पाण्यात मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट पिंपल्स असलेल्या जागी एक दोन मिनिटांसाठी लावून ठेवा. दिवसातून 2-3 वेळा असं केल्यास फायदा नक्कीच होतो.  

दातांचा पिवळेपणा होईल दूर

दाताच्या पिवळेपणापासून सुटका होण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त आहे. पिवळेपणासोबतच चेहऱ्यावरील प्लाक दुर करण्यातही सोड्याची मदत होते. ब्रशवर थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा घेऊन ब्रश केल्यास दातांचा पिवळेपणा निघून जातो. पण याचा जास्त वापर करू नका.  

टॅन होईल गायब

सनबर्न दूर करण्यासाठीही बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. बेकिंग सोडा थंड पाण्यात मिक्स करून सरसरीत पेस्ट बनवून घ्या. एका स्वच्छ कपड्यावर ही पेस्ट घेऊन ती सनबर्नने प्रभावित जागी लावा. लगेच फरक जाणवेल.  

अंगाला खाज का येते आणि काय असतात त्यावर उपाय 

चेहरा उजळेल

चेहरा उजळण्यासाठीही बेकिंग सोडाचा वापर करता येतो. हा डेड सेल्स दूर करून त्वचा उजळवतो. बेकिंग सोडा गुलाब पाण्यात मिक्स करून काही मिनिंट चेहऱ्याला लावल्यास नक्कीच फायदा होईल.

नखं होतील स्वच्छ

 

दांतांप्रमाणेच नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. बेकिंग सोडा, पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचं मिश्रण करून नखांना लावल्यास त्यांचा पिवळेपणा दूर होतो. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास तुम्हाला लगेच परिणाम दिसून येईल.

शरीराच्या दुर्गंधीवर रामबाण

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठीही तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. बेकिंग सोडा घाम शोषून घेतो आणि दुर्गंधीही दूर करतो. बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून अंडरआर्म्सला लावा नक्कीच उपयोग होईल.

स्कॅल्प ठेवेल निरोगी

केसांच्या स्वच्छतेसाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. तेलकट केसांसाठी बेकिंग सोडा उपयुक्त आहे. याच्या वापराने तुमचं स्कॅल्प निरोगी ठेवण्यास मदत होते.

‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक

डँड्रफ होईल गायब

जर तुमच्या केसांत डँड्रफ झाला असेल तर बेकिंग सोड्याचा उपाय लगेच परिणामकारी ठरतो. ओल्या केसांवर एक चमचा बेकिंग सोडा हळूहळू चोळा आणि काही वेळाने धुवून टाका. असं केल्यास केसांतील डँड्रफ साफ करता येईल.

पुढे वाचा – 

Skin Baking Soda Benefits in Hindi

Read More From DIY सौंदर्य