Dad

130+ आई बाबा स्टेटस मराठी | Aai Baba Status In Marathi

Trupti Paradkar  |  Jun 1, 2022
Aai Baba Status In Marathi

आईवडील या आपल्या आयुष्यातील अशा दोन व्यक्ती आहेत, ज्यांचा आधार मुलांना ती लहान असो वा मोठी कायमच लागतो. आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार असेल तर मुलं जगातील कोणत्याही कठीण आव्हानाला तोंड देऊ शकतात. मुलांना जन्म देण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आईवडील आयुष्यभर काबाडकष्ट करतात. पण त्या कष्टाची झळ कधीच मुलांपर्यंत पोहचू देत नाहीत. मुलांना मात्र नेहमीच आईवडील गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते. नंतर त्यांची आठवण काढून काहीच उपयोग नसतो. म्हणूनच आईवडील जिवंत असताना त्यांची काळजी घ्या, त्यांच्यावर भरभरून प्रेम करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही. आईवडिलांप्रती हे प्रेम व्यक्त करण्यासाठी शेअर करा हे आई बाबा स्टेटस मराठी, आई बाबा सुविचार, Aai Baba Status Marathi, आई बाबा सुविचार मराठी, Aai Baba Marathi Status for Whatsapp, Emotional Aai Baba Marathi Status for Whatsapp, Aai Baba Marathi Shayari, Miss U Aai Baba Marathi Status, Aai Baba Love Status in Marathi…. यासोबतच जाणून घ्या महत्त्व पितृदिनाचे (Father’s Day Information In Marathi), वडिलांसाठी चारोळ्या आणि कविता (Fathers Day Poem In Marathi), फादर्स डे साठी खास कोट्स आणि स्टेटस (Father’s Day Quotes In Marathi) फादर्स डे युनिक गिफ्ट आयडियाज (Father’s Day Gift Ideas In Marathi) आणि मातृदिन शुभेच्छा

आई बाबा स्टेटस मराठी | Aai Baba Status Marathi 

 Aai Baba Status In Marathi

आईवडिलांवरील प्रेम वेळीच व्यक्त करा, म्हणजे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. यासाठी शेअर करा हे आई बाबा स्टेटस मराठीतून Aai Baba Status Marathi

1.तुमचं भलं व्हावं असं जगात फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असतं…

2.या जगात आईबाबा सोडून आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते हे कधीच विसरू नका.

3.स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई असं म्हणतात, आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.

4.आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधांप्रमाणे विश्वास ठेवा, कारण ते थोडे कडू असतात पण जीवनात प्रत्येक वेळी संजिवनी ठरतात. 

5.आयुष्यात सगळी नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात… या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत राहतात… एक आईचा मायेचा हात आणि बापाची साथ!

6.हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या चुकांना माफ करणारे आईवडील पुन्हा कधीच मिळणार नाहीत.

7.तुमची झोप मोडली तरी चालेल, पण आईवडिलांची स्वप्ने नाही मोडली पाहिजेत.

8.आयुष्य एक दिवा आहे पण त्या दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आपले आईबाबा

9.स्वतः आधी जे तुमचा विचार करतात ते आईबाबा

10. जगातील अनमोल गोष्ट म्हणजे आपले आईवडील… कारण त्यांच्याइतकं प्रेम आपल्यावर दुसरं कोणीच करत नाही.

वाचा – Emotional Quotes On Father In Marathi

आईबाबा भावनिक स्टेटस | Emotional aai baba marathi status for whatsapp

Aai Baba Status In Marathi

या जगात तुम्हाला आईबाबांएवढी प्रेम करणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच आईवडिलांना कधीच दुखवू नका. आईवडिलांबाबत मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअपवर शेअर करा  Emotional Aai Baba Marathi Status for Whatsapp आणि Miss U Aai Baba Marathi Status

1.जो पर्यंत आईवडील सोबत आहेत, तो पर्यंत तुम्हाला प्रेमाची कमी कधीच भासणार नाही.

2.या जगात फक्त आपले आईबापच असतात, बाकी कोणी कोणाचे नाही…

3.आईवडिलांच्या कष्टांची जाणिव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही.

4.नात्यांची दोरी नाजुक असते, डोळ्यांतील भाव ही ह्रदयाची भाषा असते, जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हां एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…

5.विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम आईवर करा, ना कधी धोका मिळेल, ना कधी मन तुटेल…

6.सात जन्मांसाठी काही द्यायचं असेल तर देवा, हेच आईवडील दे. कारण त्यांनी आजवर मला काहीच कमी पडू दिलं नाही.

7.पैशांने सर्व काही मिळेल, पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही.

8.आईवडील घरात असताना लोक मंदिरामध्ये देव का शोधतात 

9.जग सोबत नसलं तरी चालेल पण आईबाबा नेहमी सोबत असले पाहिजेत.

10.आयुष्यात काही नसेल तरी चालेल पण आईवडिलांचा हात नेहमी पाठिशी असावा.

वाचा – father daughter quotes in marathi

आई बाबा सुविचार | Aai Baba Marathi Suvichar Marathi

Aai Baba Status In Marathi

आईबाबासारखं दैवत साऱ्या जगतात नाही असं म्हटलं जातं. म्हणूनच जाणून घ्या आईवडिलांवर आधारीत हे काही आई बाबा वर सुविचार Aai Baba Love Status in Marathi

1.मी मोठा नाही हो, माझ्या मागे जी ताकद उभी आहे ना! ती खूप मोठी आहे… आईवडील

2.देवाची पूजा करून आईवडील मिळवता येत नाहीत, आईबाबांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो.

3.जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान!

4.आईबाबाचं प्रेम आपल्याला वेळ असते तेव्हा कळत नाही पण सत्य हेच आहे की, आईबाबांसारखं प्रेम या जगात आपल्यावर कोणीच करू शकत नाही. 

5.दुनियादारी अनुभवली की कळतं की, आईवडिलांशिवाय कोणीच आपलं नसतं

6.सातजन्मांसाठी काही द्यायचं असेल तर देवा एकच दे हेच आईवडील सातजन्म दे

7.आयुष्यात प्रत्येकजण स्वतःसाठी जगत असतो, पण आईवडील मात्र फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात.

8.देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव त्यांना ज्यांनी जन्म दिलाय मला

9.का कुणावर प्रेम करावं, का कुणासाठी झुरायचं, का कुणासाठी मरायचं, देवाने आईवडील दिले आहेत, त्यांच्यासाठीच सगळं करायचं…

10.प्रेम करायचं असेल तर आईवडिलांवर करा, आयुष्यात कधीच ब्रेकअप होणार नाही.

आईबाबा स्टेटस मराठीतून | Aai papa status in marathi 

Aai Baba Status In Marathi

आईबाबांमध्ये ज्यांना देव दिसतो त्यांना देवाच्या शोधासाठी वणवण हिंडावं लागत नाही, कारण त्यांना देवाचे आशीर्वाद घरबसल्याच मिळतात. अशा प्रेमळ आईवडिलांसाठी खास आई बाबा स्टेटस मराठी Aai Papa Status in Marathi

1.खरा आनंद तर तेव्हा होईल जेव्हा पैसे माझे असतील आणि शॉपिंग माझे आईबाबा करतील.

2.आईबाबा तुम्ही सोबत आहात म्हणून कशाची चिंता नाही…

3.ज्यांनी तुमचे बोट पकडून चालायला शिकवलं त्यांना कधीच विसरू नका

मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत.

4.एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करतेय ती म्हणजे आई… आणि एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो तो बाबा!

5.आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला चालायला शिकवतात जे आपले आईबाबा असतात.

6.आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नका, कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही…

7.आईबाबांनी मला सगळं शिकवलं पण त्यांच्याशिवाय राहायचं कसं ते शिकवलं नाही.

8.औषधं आणि आईवडील दोघं सारखेच असतात, थोडेसं कडवट वाटतात पण आपल्या फायद्यासाठीच असतात.

9.सर्वांना सुट्टी असते, पण आईवडीलांना कधीच सुट्टी नसते. 

10. लोक काय म्हणतील याचा विचार करत बसाल तर, आईवडिलांची स्वप्नं तुम्ही केव्हाच पूर्ण करू शकणार नाही.

आईबाबा शायरी मराठीतून | Aai Baba Shayari Marathi

Aai Baba Status In Marathi

प्रेमात पडल्यावर शायरी सुचू लागते, मग ज्यांना आपल्याला खऱ्या प्रेमाचा अर्थ शिकवला त्या आपल्या आईवडिलांसाठी खास शायरी असायलाच हवी Aai Baba Marathi Shayari

1.कधी खिसा रिकामा असला तरी, कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही. माझ्या आईवडिलांसारखी मनाने श्रीमंत  माणसं मी या जगात कुठेच पाहिली नाही.

2.आईबाबा शब्दात मांडण्याएवढे लहान नाहीत… आणि आईबाबांना शब्दात मांडण्याइतका मी मोठा नाही.

3.आईबाबा कितीही मोठा झालो तरी तुझ्यासमोर लहानच आहे, अजून आजही शांत झोप लागते मला कारण डोक्यावर तुमचा हात आहे.

4.कोणी सोबत असो वा नसो आईची माया आणि वडिलांचे प्रेम यातच मी समाधानी आहे.

5.आईवडील असताना त्यांना घट्ट मिठी मारून घ्या, कारण आठवण आभास देते पण स्पर्श देत नाही!

6.आईवडील कितीही अशिक्षित असू देत, मोठमोठ्या विद्यालयांपेक्षा जास्त संस्कार हे आईवडिलांकडूनच मिळतात. 

7.नको धडे विश्वासाचे, 

आपलं आपलं म्हणता

आपलंच सूत्र फसतं, 

माय-बाप सोडून या जगात

कुणीच कुणाचं नसतं !

8.काही लोकांचं प्रेम कधी बदलत नाही आणि त्यांना आईबाबा म्हणतात

9. आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत, की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करूच शकत नाही. 

10. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि बाबाच्या चेहऱ्यावर समाधान असतं. तोच खरा श्रीमंत माणूस

11. आयुष्यात फक्त एवढंच पाहिजे की, यशस्वी मी व्हावं आणि नाव मात्र माझ्या आईवडिलांचे असावं. 

12. आई दिव्यातून पडणारा प्रकाश असला तरी वडील त्या दिव्यातील जळणारी वात आहे. 

Conclusion –  आम्ही शेअर केलेले आई बाबा स्टेटस मराठी, आई बाबा सुविचार, Aai Baba Status Marathi, आई बाबा सुविचार मराठी, Aai Baba Marathi Status for Whatsapp, Emotional Aai Baba Marathi Status for Whatsapp, Aai Baba Marathi Shayari, Miss U Aai Baba Marathi Status, Aai Baba Love Status in Marathi वाचून तुमचं मन नक्कीच भरून आलं असेल, तेव्हा वाट कसली पाहताय… तुमच्या लाडक्या आईबाबांवरील प्रेम लगेच व्यक्त करा. यासाठी शेअर करा हे स्टेटस आणि सुविचार

Read More From Dad