लाईफस्टाईल

ढोल ताशाला जेव्हा चढते गेम ऑफ थ्रोन्सची झिंग

Leenal Gawade  |  Apr 10, 2019
ढोल ताशाला जेव्हा चढते गेम ऑफ थ्रोन्सची झिंग

मराठी सण आणि ढोलपथक नसेल तर हल्ली मजाच येत नाही. ढोलवर एक थाप पडली की, अगदी दूरदूरपर्यंत त्याचा आवाज येणार आणि तुमचा पाय थिरकणार नाही, असे होत नाही. नुकतेच मराठी नवीन वर्ष सुरु झाले. गुढीपाडव्याला महत्त्व असते ते शोभा यात्रेचे. अर्थातच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शोभा यात्रा काढली जाते. गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा दिल्या जातात. डोंबिवलीची पाडव्याची शोभा यात्रा तर फारच प्रसिद्ध आहे.पण यंदा सगळ्या तरुणांचे लक्ष वेधून घेतले ते आरंभ या ढोलपथकाने कारण जसे त्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले की, हे नेहमीचे नाहीतर काहीतरी वेगळे आहे…हे वेगळेच म्हणजे होते गेम ऑफ थ्रोन्स (Game of thrones)च्या म्युझिकने

आरंभने केला अनोखा प्रयोग

सध्या तरुणांची आवड लक्षात घेत आरंभने हा नवा प्रयोग केला असे म्हणायला हवे. अॅक्शन आणि अॅनिमेशनमध्ये येणाऱ्या या गेम ऑफ थ्रोन्स (Game of thrones) ची क्रेझ संपूर्ण जगात आहे. हे लक्षात घेऊनच त्यांनी त्यांचा यंदाचा आरंभ गेम ऑफ थ्रोन्स (Game of thrones) च्या थीम म्युझिकने केला. आपोआपच या सीरिजचा चाहता वर्ग दोन मिनिटांसाठी थबकला. ढोल ताशावर असाही प्रयोग केला जाऊ शकतो. असे कधीच कोणाला वाटले नसेल पण ते  आरंभने शक्य करुन दाखवले त्यामुळे सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

पाहा व्हिडिओ

(सौजन्य- youtube)

गेम ऑफ थ्रोन्स (Game of thrones) ची झिंग

GOT चे आतापर्यंत 7 भाग  आलेले आहेत. संपूर्ण जगात या सीरिजचे चाहते आहे. हल्ली ट्रेन,बस, मेट्रो सगळ्याच ठिकाणी अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती गेम ऑफ थ्रोन्स (Game of thrones) पाहताना दिसतात. या सीरिजने सगळ्यांना इतके वेड लावले आहे की, गेम ऑफ थ्रोन्स (Game of thrones) चे memes देखील सोशल मीडियावर चांगलेच चालले आणि अजूनही हे मीम्स चालत आहेत. या सीरिजचे 7 भाग आल्यानंतर पुढे काय होईल याची उत्सुकताही लोकांना होती. 2011 साली या सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित करण्यात आला आणि आता येत्या मे महिन्यात याचा 8 वा सीझन येणार आहे. हा नवा सीझन पाहण्याची उत्सुकतादेखील लोकांमध्ये वाढली आहे. जर तुम्ही अजूनही ही वेबसीरिज पाहिली नसेल तर आता मे महिनयात नवा सीझन आल्यानंतर याचा श्री गणेशा करायला काहीच हरकत नाही.

(सौजन्य- youtube)

अॅनिमेटेड चित्रपटांनी नेहमीच खाल्ला भाव

भारतात अॅनिमेशनचा भडीमार असलेले चित्रपट फार बनत नाहीत त्यामुळे सीरिज बाबत बोलायलाच नको. हॉलीवूडमधील अशाच काही चित्रपटांनीही देशातील प्रत्येक लहान मुलाला आणि तरुणांना भूरळ घातली होती ती हॅरी पॉटर या चित्रपटाने. जे. के. राऊलिंग लिखित या अकल्पनीय, काल्पनिक अशा विश्वास कित्येक वर्ष लोक जगली. त्या चित्रपटातीलही काही म्युझिक पीस चांगले गाजले होते. याशिवाय twilight, lord of the rings, nanrnia, avtar असे काही चित्रपट आजही लोकांच्या लक्षात आहेत. पण सध्या तरी GOT गेम ऑफ थ्रोन्स (Game of thrones) ची क्रेझ आहे असेच म्हणायला हवे.

डॉन ३ मधून शाहरुखचा पत्ता कट, गली बॉयला मिळाली संधी

(फोटो सौजन्य- Instagram)

Read More From लाईफस्टाईल