Inspiration

ये रिश्ता क्या कहलाता है फेम ‘या’ अभिनेत्रीने केलं कोर्ट मॅरेज, शेअर केले लग्नाचे फोटो

Trupti Paradkar  |  Dec 6, 2020
ये रिश्ता क्या  कहलाता है फेम ‘या’ अभिनेत्रीने केलं कोर्ट मॅरेज, शेअर केले लग्नाचे फोटो

लॉकडाऊनमध्ये अनेकांना त्यांचा लग्नसोहळा पुढे ढकलावा लागला होता. मात्र आता पुन्हा लग्नाचा सीझन धूमधडाक्यात सुरू झाला आहे. ज्यामुळे बॉलीवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रेटीं लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. मागील काही दिवसांपासून गायक आदित्य नारायणच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता या लग्नाच्या चर्चेत आणखी एका सेलिब्रेटीची भर पडली आहे. कारण नुकतंच ये रिश्ता क्या कहलाता है फेम या अभिनेत्रीने कोर्ट मॅरेज केलं आहे. कोरोनाच्या काळात सुरक्षितपण सर्व काही पार पडावं यासाठी तिने थाटामाटात लग्न न करता बॉयफ्रेंडसोबत कोर्टात गपचूप आणि अगदी साधेपणाने सहजीवनाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर याच अभिनेत्रीच्या लग्नाचा विषय सुरू आहे.

कोण आहे ही अभिनेत्री

कोणताही गाजावाजा न करता अचानक लग्नबंधनात अडकणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव शिरीन सेवानी आहे. तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराचा भाऊ अंशुलच्या पत्नीची म्हणजेच गुरप्रीतची भूमिका साकारली होती. एवढंच नाही तर शिरीन नागिन 2 आणि कवच 2 मध्येही झळकली होती. शिरीनने नुकतंच अगदी खाजगी आणि साधेपणाने विवाह केला आहे.  बॉयफ्रेंड उदयन सचनसोबत शिरिनने आधी कोर्ट मॅरेज केलं आणि मग फक्त कुटुंबियाच्या उपस्थितीत आणि अत्यंत साध्या पद्धतीने लग्नाचे विधी पार पाडले. शिरीनने तिच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यात तिने स्वतःचे आणि पती उदयनचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याला कॅप्शन दिली आहे की, ” मी माझ्या पायलटसोबत उडण्यासाठी तयार आहे”

शिरीन आणि उदयनचा वेडिंग लुक

शिरीनने लग्नात गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यासोबत कॅरी केलेल्या गोल्डन आणि ग्रीन कलच्या कुंदन ज्वैलरीमुळे तिचा नववधुचा लुक अगदी खुलून आला आहे. त्याचप्रमाणे उदयनने लग्नात ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केलेली आहे. दोघंही त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटोजमध्ये खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. त्यांच्याकडे पाहून सर्वांना जोडी नं वन असंच म्हणावसं वाटत आहे. या फोटोजवर शिरीनच्या चाहते आणि शुभचिंतकांकडून लाईक्स आणि शुभेच्छांचा पाऊसच पडत आहे. सुत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार शिरीनने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे की, “मला माहीत आहे की तुम्हाला हे ऐकून थोडं कसंतरी वाटेल की मी कोर्ट मॅरेज करत आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की याला पर्याय नाही. या काळात मी तुमच्याशिवाय अशापद्धतीने लग्न करत आहे यासाठी तुम्ही सर्व मला नक्कीच समजून घ्याल. देशभरातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यावर मी माझ्या सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत पुन्हा हा आनंद साजरा करेन. यासाठी एखादा कार्यक्रम नंतर आयोजित करण्याचं आमच्या नक्कीच मनात आहे. तुमच्या शुभच्छा आणि आर्शीवादांसाठी मनापासून धन्यवाद. उदयनसोबत लग्नबंधनात अडकल्यामुळे मी खूप आनंदी झाली आहे. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू देत”

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरल्या या जोड्या, मात्र प्रत्यक्षात करतात एकमेकांचा द्वेष

प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात

या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख

Read More From Inspiration