लग्नसराई

बॉलीवूडच्या प्रसिद्ध कुटुंबांचे जावई

Aaditi Datar  |  Apr 9, 2020
बॉलीवूडच्या प्रसिद्ध कुटुंबांचे जावई

बॉलीवूड सेलिब्रिटी हे फक्त त्यांच्या लुक्स, अभिनय आणि फॅशनसाठी फेमस असतात असं नाहीतर त्यांच्या खाजगी आयुष्यात फॅन्सना जास्त रस असतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात किती जण आहेत, ते कुठे राहतात आणि त्यांचे नातेवाईक यातही त्यांना इंटरेस्ट असतो. बॉलीवूड सेलिब्रिटी हे फक्त त्यांच्या लुक्स, अभिनय आणि फॅशनसाठी फेमस असतात असं नाहीतर त्यांच्या खाजगी आयुष्यात फॅन्सना जास्त रस असतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात किती जण आहेत, ते कुठे राहतात आणि त्यांचे नातेवाईक यातही त्यांना इंटरेस्ट असतो. मग ते त्यांच्या कुटुंबातील जावयांबाबतही लागू होतं. जर तुम्ही बॉलीवूड की टीव्हीवरील अभिनेता आहात आणि भर म्हणून एखाद्या बॉलीवूड फॅमिलीचे जावई असाल तर क्या कहने. अशाच बॉलीवूड फॅमिलीजच्या जावयांची यादी POPxoMarathi ने आणली आहे.

आयुष शर्मा

आयुष हा बॉलीवूडच्या खानदानचा जावई आहे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुषचं लग्न 18 नोव्हेंबर 2014 ला हैद्राबादमध्ये अगदी राजेशाही थाटामाटात झालं. आयुष हा स्वतः बिझनेसमन असून आता अभिनयातही नाव कमवू पाहत आहे. तर आयुषचे वडील अनिल शर्मा हे राजकारणात आहेत. आयुष आणि अर्पिताची भेट 2013 साली कॉमन फ्रेंड्समुळे झाली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. आता या दोघांनाही गोड मुल आहेत अहील आणि आयत.

अक्षय कुमार

एकेकाळी बॉलीवूडचा कॅसनोव्हा असलेल्या अक्षयकुमारने राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. या दोघांचं लग्न 17 जानेवारी 2001 साली झालं. त्यांना दोन मुलंही आहेत. अक्षय-ट्विंकलच्या मुलाचं नाव आरव तर मुलीचं नाव नितारा आहे.

कुणाल कपूर

अभिनेता कुणाल कपूर हा बच्चन कुटुंबियांचा जावई आहे हे खूप कमी जणांना माहीत असेल. कुणालचं लग्न नैना बच्चन म्हणजे अजिताभ बच्चन यांची मुलगी, जे अमिताभ बच्चन यांचे भाऊ आहेत. नैना आणि कुणालमध्ये क्युपिडचं काम केलं ते श्वेता बच्चनने. लग्नाआधी हे दोघं एकमेकांना 3 वर्ष डेट करत होते.

शर्मन जोशी

बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्हिलन प्रेम चोपडा यांचा जावई आहे अभिनेता शर्मन जोशी. शर्मन आणि प्रेरणा चोपडा यांचं लग्न झालं 2000 साली. या दोघांना एक मुलगी ख्याना आणि जुळी मुलं वार्यन आणि विहान आहेत. शर्मन आणि प्रेरणाची भेट कॉलेजच्या दिवसात नाटकाच्या तालमीदरम्यान झाली होती.

एकेकाळी ऑडीशनमध्ये रिजेक्ट झालेले हे स्टार्स तुम्हाला माहीत आहेत का?

सैफ अली खान

सैफ अली खान आणि करिना कपूरचं लग्न तर टिपीकल बॉलीवूड चित्रपटांप्रमाणे झालं होतं. सैफपासून वेगळं झाल्यावर सैफचं नाव रोजा कॅटलोनाशी जोडलं गेलं होतं. दुसरीकडे करीनाचं अफेयर शाहिद कपूरसोबत होतं. तर करीना-सैफचं जुळलं ते टशन या चित्रपटाच्या सेटवर. पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 16 ऑक्टोबर 2012 ला लग्न केलं. त्यांचा मुलगा तैमूर अली खान तर सगळ्यांना माहीत आहेच.

मुंबईत राहणाऱ्या bollywood सेलिब्रिटींची ही घरं तुम्हाला माहीत आहेत का?

कुणाल खेमू

अभिनेता कुणाल खेमू हा पतौडी राजघराण्याचा जावई आहे. कुणालने को-स्टार सोहा अली खानशी लग्न केलं. सोहाचे आईवडील म्हणजे क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर. कुणाल आणि सोहाचं जुळलं ते ढूंढते रह जाओगे या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान. कुणालने सोहाला 2014 साली पॅरीसमध्ये प्रपोज केलं. लग्नाआधी दोन वर्ष हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 25 जानेवारी 2015 साली त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव इनाया आहे.

बाॅलीवूड स्टार्सना आहे विचित्र फोबिया, तुम्हाला वाटेल आश्चर्य

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

Read More From लग्नसराई