बॉलीवूड

कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यामुळे सारा झाली ट्रोल

Leenal Gawade  |  Aug 12, 2021
सारा अली खान झाली ट्रोल

हुशार आणि सुस्वभावी अशी ओळख असलेली अभिनेत्री सारा अली खान काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत असते.आता ती एका नव्याच विवादामुळे चर्चेत आली आहे. कामाख्या देवीचे दर्शन घेतलेला एक फोटो तिने पोस्ट केला आहे. या फोटोवर तिला असंख्य प्रतिक्रिया आल्या असून खूप जणांनी तिला मुस्लिम असून मंदिरात जाण्यावर ट्रोल केले आहे. या फोटोमुळे तिची सतत चर्चा होतेय. दरम्या, सारा अली खान हिचा आज 26 वा वाढदिवस आहे. हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घेऊया.

साराच्या फोटोला वाईट कमेंट

सारा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गुवाहाटीमध्ये आहे. या शूटिंग दरम्यान गुवाहाटी परिसर फिरताना तिने कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तिच्या मंदिर परिसरात तिने जाऊन फोटो काढले आणि हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. कामाख्या देवीच्या मंदिरात तिने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी ड्रेस घातला आहे. डोक्याला टिळा लावला आहे. तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताच काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्या धर्मावरुन अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. तुझा धर्म कोणता? तू मुस्लिम धर्माची आहेस की हिंदूची?, तू मुस्लिम धर्माला कलंक आहेस. अशा पद्धतीने मंदिरात जाणे हे धर्माचा अपमान आहे असे देखील तिला खूप जणांनी कमेंट करुन म्हटले आहे. 

साराची आई हिंदू

सारा ही अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मोठी मुलगी आहे. अमृता सिंह ही हिंदू शीख आहे. सैफ अली खानसोबत वेगळे झाल्यानंतर साराचे सगळे संगोपन हे आईने केले आहे. त्यामुळे साहजिकच ती वडिलांचे नाव लावत असली तरी देखील तिच्यावर सगळे संस्कार हे हिंदू धर्माचे आहे. असे असले तरी ती दोन्ही धर्माचा तितकाच आदर करते. तिच्या नावापुढे खान आडनाव लागल्यामुळेच तिला अनेकदा या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. हे आताच नाही तर या आधीही अनेकदा घडलेले आहे.

सारा या साठीही झाली आहे ट्रोल

सारा अली खान या आधीही बऱ्याच कारणांमुळे ट्रोल झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ती मालदिव्सजला असताना तिच्या भावासोबत ती टू पीसमध्ये पाण्याचा आनंद घेताना दिसली होती. तिला तशा रुपात पाहूनही खूप जणांना तिचा राग आला होता. खूप जणांनी तिल तिच्या बोल्‍ड अवतारासाठी खूप कमेंट्स केल्या होत्या. त्यावेळीही तिला मुस्लिम असून असे कपडे घालण्यावरुन ट्रोल केले होते. त्यामुळ सारासाठी असे ट्रोल होणे काही नवे राहिलेले नाही. आता यामध्ये आणखी एका फोटोमुळे भर पडली इतकेच!

अतंरगी चित्रपटाचे शूटिंग सुरु

साराचा ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज करण्यात आला. वरुण धवनसोबत ती पहिल्यांदाच या चित्रपटात दिसली. आता ती तिच्या आगामी ‘अतरंगी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष्यसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

दरम्यान, तुम्हाला साराला असे ट्रोल करणे कितपत योग्य वाटते ते आम्हाला नक्की कळवा. 

अधिक वाचा

सनी देओल आणि पूजा भट चोविस वर्षांनंतर एकत्र, या चित्रपटात झळकणार जोडी

ती परत आलीये’ मध्ये तिचा करावा लागेल सामना

करिना कपूर झाली निर्माती, लवकरच तयार करणार थ्रिलर चित्रपट

Read More From बॉलीवूड