ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ती परत आलीये

ती परत आलीये’ मध्ये तिचा करावा लागेल सामना

 भूतांच्या किंवा रहस्यमयी मालिका, चित्रपट अनेकांच्या आवडीच्या असतात. कितीही भीती वाटली तर घाबरत का असेना त्या बघायला सगळ्यांना आवडतात. अशीच एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती म्हणजे ‘ती परत आलीये’ या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर या मालिकेत प्रत्यक्ष भूत भेटीला येणार आहे. याचा प्रत्यय आता सगळ्यांनाच आला आहे. पण आता आणखी एक प्रोमो आल्यानंतर आता या मध्ये नेमकं ती कोणं असणार आहे याचा अंदाज आला आहे. आता या ‘ती’ चा सामना आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे.

ती आहे एक बाहुली किंवा मुखवटा

 या मालिकेचा एक नव व्हिडिओ समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला एक मुखवटा घातलेली व्यक्ती दिसते. ही मुलगी किंवा बाई आहे की, कोणी हा मुखवटा घातला आहे. असा प्रश्न पडू लागतो. पण हा मुखवटा पाहिल्यानंतर तो अगदीच विचित्र आणि घाबरवणारा असा मुखवटा आहे . जो पाहिल्यानंतर भीती वाटल्यावाचून राहात नाही. त्यामुळेच आता हे या बाहुलीतलं भूत आपल्याला नेमकं कसं घाबरवणार हे पाहायला हवं की, या मालिकेचे रुपडे पालटणार हे देखील मालिका आल्यावरच आपल्याला कळू शकेल.

तिन्ही प्रोमोमधून भीती

आतापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आलेले आहेत. पहिल्या प्रोमोमध्ये विजय कदम सोसायटीत फिरत असताना त्यांना अचानक कसला तरी भास होतो आणि ते एकदम घाबरुन जातात. दुसऱ्या प्रोमोमध्ये विजय कदम शेकोटी घेत सोसायटीच्या परिसरात गाणं गात बसलेले असतात. एवढ्यात घाबरुन किंचाळण्याचा आवाज येतो. ते पटकन तिथे जातात. ती मुलगी पैंजण न घालता पैंजणांचा आवाज येण्याचा भास होतो. पण ती खोटं बोलते असं सांगून ते तिकडे लक्ष देत नाही. पण तिला आत पाठवल्यानंतर त्यांच्या पायातच पुन्हा पैंजण वाजल्याचा त्यांना भास होतो आणि ते धूम ठोकतात. या तिन्ही प्रोमोचा विचार करता काहीतरी भयंकर आणि रहस्यमय असे या सोसायटीत घडत असल्याचा अंदाज येतो. 

शेवंताही परतणार

झी मराठीवर अनेक नव्या मालिकांची मेजवानी आपल्या सगळ्यांसाठी लवकरच येणार आहे. अनेक नव्या मालिका या येणार आहेत. पण काही मालिका ज्या लॉकडाऊनमुळे अर्ध्यावर बंद पडल्या होत्या अशा मालिका या आता पुन्हा सुरु होणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका लॉकडाऊन आणि शूटिंगच्या परवानगीमुळे रखडली होती. पण आता ही मालिका देखील पुन्हा भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो आला असून 16 ऑगस्टपासून ही मालिका सुरु होणार आहे. शेवंता या प्रोमोमध्ये दिसत असून आता ती तिचा बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे असेच या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे दोन मालिका त्याही अशा रहस्यमयी या प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

ADVERTISEMENT

आता या मालिकांव्यतिरिक्त  ‘मन उडु उडु झालंय’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवंय’, माझी तुझी रेशीमगाठ’ , ‘मन बाजिंद झालंय’ अशा काही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अधिक वाचा

सनी देओल आणि पूजा भट चोविस वर्षांनंतर एकत्र, या चित्रपटात झळकणार जोडी

करिना कपूर झाली निर्माती, लवकरच तयार करणार थ्रिलर चित्रपट

ADVERTISEMENT

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार भन्साळी यांचा ‘हीरामंडी’

12 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT