आरोग्य

जाणून घ्या अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्सची माहिती (Acupressure Points Information In Marathi)

Leenal Gawade  |  Aug 20, 2021
acupressure points in marathi

शरीराची कोणतीही यंत्रणा बिघडली की, लगेचच आपल्याला काही लक्षणे जाणवू लागतात. डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, सांधेदुखी असे काही त्रास होऊ लागले की बरेचदा डॉक्टरकडे जाऊन लगेचच औषधोपचार घेण्याचा वेळ कधी कधी आपल्याकडे नसतो. शरीरासंदर्भातील ही दुखापत दुर्लक्षित करण्यासारखीही नसते. (किंबहुना त्याकडे दुर्लक्षही करु नये) अशावेळी काही अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्स हे कामी येतात. काही असे अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्स असतात जे दाबले की, काही सूक्ष्म वेदना पटकन कमी होतात. योग्य प्रेशर पॉईंट माहीत असेल तर त्याचा परिणाम हा लगेचच जाणवतो. आपल्या शरीरात वेगवेगळ्या वेदना शमवण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्स आहेत. (Acupressure Points In Marathi) जाणून घेऊया अशा अ‍ॅक्युप्रेशरपॉईंट्सची माहिती

हँड व्हॅली पॉईंट्स (Hand Valley Point)

Acupressure Points In Marathi

हँड व्हॅली पॉईंट्स हा असा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट (Acupressure Points In Marathi) आहे ज्यामुळे अनेक दुखणे बरे होण्यास मदत मिळते. हँड व्हॅली पॉईंट हा अंगठा आणि तर्जनीच्यामध्ये असतो. अंगठा आणि त्या बाजूच्या बोटामध्ये जी जागा असते तिथे हा पॉईंट असतो. हँड व्हॅली पॉईंट्स अनेकदा रिफलेक्सलॉजिस्ट वापरतात. त्यामुळे एक आराम मिळण्यास मदत होते. व्हॅली पॉईंट्समुळे ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते. हँड व्हॅली पॉईंट हा एक सोपा आणि सहज सापडणारा असा पॉईंट आहे. या भागाकडे अगदी काही काळ मसाज केल्याने कमालीची शांतता मिळते. हा हातातील सगळ्यात महत्वाचा असा प्रेशर पॉईंट आहे. कमीत कमी 2 मिनिटं हा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट दाबल्यामुळे लगेचच आराम मिळतो.

फायदे :  हँड व्हॅली पॉईंट्स दाबल्यामुळे ताणतणाव कमी होतो. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा पॉईंट एकदम आरामदायी आहे. या शिवाय डोकेदुखी, खांदेदुखी, मानदुखी कमी होण्यास मदत मिळते.

लंग मेरिडिएन (Lung Meridian)

Acupressure Points In Marathi

लंग मेरिडिएन हा हातावरील आणखी एक प्रेशर पॉईंट आहे. अंगठ्यावर हा प्रेशर पॉईंट आहे. एकूण तीन पॉईंट असलेला असा लंग मेरिडिएन आहे. अंगठ्यावरील वरच्या भागात, पहिल्या पेरवर एक आणि अंगठ्याच्या सगळ्यात शेवटी एक असे तीन पॉईंट्स  असतात. ज्याला लंग मेरिडिएन असे म्हणतात. एकाच बोटावर हे तीन पॉईंटस असतात ते तुम्ही हळुहळू आणि मध्यम प्रेशर देऊन करु शकता.

फायदे: लंग मेरिडएन अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट (Acupressure Points In Marathi) हा फारच फायद्याचा असा प्रेशर पॉईंट आहे. जर तुम्हाला सर्दी, पडसे, वाहते नाक, खोकला, घसा खवखवणे असा त्रास होत असेल तर हा प्रेशर पॉईंट तुमच्यासाठी फारच फायद्याचा ठरतो. 

इनरगेट पॉईंट (Inner Gate Point)

Acupressure Points In Marathi

हातावर असलेला आणखी एक अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट (Acupressure Points In Marathi) म्हणजे इनरगेट पॉईंट्स.  इनरगेट पॉईंट हा मनगटापासून 3 सेंटीमीटर अंतरावर असतो. हा पॉईंट ही खूप वेळा रिफ्लेक्सोलॉजिस्ट वापरतात. हा प्रेशर पॉईंट हा अंगठ्याच्या साहाय्याने दाबला जातो. मनगटापासून थोडे खाली हा प्रेशर पॉईंट असतो. जो तुम्हाला नक्कीच आराम देतो. वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट फायद्याचा ठरतो.

फायदे:  इनरगेट पॉईंट हा पोटदुखी, पचनाच्या समस्या, शरीराला आलेला आळस झटकवण्यासाठी आणि तुम्हाला फ्रेश करण्यासाठी हा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट मदत करतो.

आऊटर गेट पॉईंट (Outer Gate Point)

Acupressure Points In Marathi

आऊटर गेट पॉईंट हा आणखी एक परिणामकारक असा प्रेशर पॉईंट आहे. मनगटावर असलेला हा प्रेशर पॉईंट आहे. हाताच्या वरच्या बाजूला हा प्रेशर पॉईंट असतो. हाताच्या वरच्या बाजूला मनगटापासून तीन बोट लांब असा हा प्रेशर पॉईंट असतो. तीन बोट त्या प्रेशर पॉईंटवर ठेवून आतल्या बाजूला अंगठा ठेवायचा असतो. अगदी हलक्या हाताने हा प्रेशर पॉईंट तुम्हाला दाबायचा आहे. या प्रेशर पॉईंटमुळे अनेक फायदे होतात.

फायदे:  आईटर गेट प्रेशर पॉईंट दाबल्यामुळे पटकन उर्जा मिळण्यास मदत मिळते. या शिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यासही हा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट (Acupressure Points In Marathi) फार महत्वाचा आहे.

फोर सिअम्स (Four Seams)

Acupressure Points In Marathi

बोटांवरील हा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट्स (Acupressure Points In Marathi) हा देखील फारच फायद्याचा प्रेशर पॉईंट्स आहे. हातावर हा प्रेशर पॉईंट्स असतात. प्रत्येक बोटाचे पेर म्हणजेच वरचे पेर हा भाग फोर सिअम्स म्हणून ओळखला जातो. (यात अंगठा येत नाही म्हणूनच त्याला फोर सिअम्स असे म्हणतात) तुम्ही एक एक करुन हा प्रेशर पाॉईंट दाबायचा असतो. अगदी हळुवारपणे तुम्हाला हा प्रेशर पॉईंट दाबायला असतो.

फायदे : लहान मुलांमध्ये पोटाच्या समस्या असतील तर हा प्रेशर पॉईंट त्या दुखापतीपासून आणि पोटाच्या समस्येपासून  हा पॉईंट्स फारच फायद्याचा ठरतो. 

बेस ऑफ थम पॉईंट (Base Of Thumb Point)

Acupressure Points In Marathi

बेस ऑफ थम पॉईंट हा तुमच्या हातावरील आणखी एक पॉईंट आहे. बेस ऑफ थम पॉईंट्स हा अंगठ्याच्या सगळ्यात खाली असतो.  हात सरळ करुन हाताच्या आतल्या बाजूला तर्जनीच्या पकडायचे आहे. म्हणजे मागच्या बाजूलाच म्हणजेच हँड व्हॅली पॉईंट्समध्ये तुमचा अंगठा येईल. या साठी हात हलका सोडायचा आहे. प्रेशर पॉईंट अशापद्धतीने दाबल्यामुळे लगेचच आराम मिळण्यास मदत मिळते. अगद हलका असा दाब तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे.

फायदे : तुम्हाला एखादा मूड स्विंग होत असेल तर तुम्ही हा पॉईंट्स दाबू शकता. त्यामुळे मन:शांती मिळण्यास मदत होते.  याशिवाय सतत होणारी चिडचिड कमी करण्यासाठी हा पॉईंट एकदम उत्तम आहे. 

हार्ट पॉईंट (Heart Point)

Acupressure Points In Marathi

ह्रदयाच्या आरोग्यासाठी हार्ट पॉईंट हा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट (Acupressure Points In Marathi) आहे.  हार्ट पॉईंट हा मनगटाला जिथे चुरगळी पडतो तिथे असतो. करंगळी आणि रिंग फिंगर यांच्यामध्ये मनगटावर हा पॉईंट असते. हातावर असलेल्या आणखी एका अ‍ॅक्युप्रेशर पॉईंटपैकी हा एक पॉईंट आहे.  रिफ्लॅक्सोलॉजिस्ट तुमच्या या प्रेशर पॉईंटला दाबतात त्यावेळी तुम्हाला कमालीची शांतता मिळते. पूर्ण शरीराचा मसाज करताना अनेकदा हे अॅक्युप्रेशर पॉईंट दाबले जातात.

फायदे : हार्ट पॉईंट हा अगदी अलगद दाबला जातो. असे केल्यामुळे ताणतणाव, निद्रानाश, डिप्रेशन आणि ह्रदयाशी संबधित असलेले त्रास कमी होण्यास मदत मिळते. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. अॅक्युप्रेशर कसे काम करते?

हो, शरीरातील प्रत्येक दुखण्यावर प्रेशर पॉईंट असतो. तो प्रेशर पॉईंट दाबला की,  तुम्हाला त्या दुखण्यातून सुटका मिळते. पण आराम त्वरीत मिळण्यासाठी अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट हा योग्य पद्धतीने दाबला गेला तरच त्याचा परिणाम तुम्हाला जाणवतो म्हणजेच त्याचा फायदा तुम्हाला मिळतो. अ‍ॅक्युप्रेशर पॉईंटचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर हे पॉईंटस अधिक चांगल्या पद्धतीने कळतात.

2. सर्वसाधारण प्रेशर पाँईंट कोणता आहे?

शरीरावर असे काही प्रेशर पॉईंट आहेत जे कॉमन असतात. त्यापैकीच काही म्हणजे स्पिरिट गेट, बबलिंग स्प्रिंग,  इनर फ्रंटायर गेट्स, विंड पुल असे काही प्रेशर पॉईंट्स आहेत जे सर्वसाधारण प्रेशर पॉईंट्स म्हणून ओळखले जातात.

3. अॅक्युप्रेशर एक्स्पर्टकडून करुन घेणे गरजेचे असते का?

हो, अर्थात प्रत्येक प्रेशर पॉईंटसचे फायदे आणि काही तोटे असतात. त्यामुळे प्रेशर पॉईंट्सचा योग्य अभ्यास असायला हवा. तरच त्या प्रेशर पॉईंटसा उपयोग होतो. खूप ठिकाणी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे आराम मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला काही जास्त त्रास असेल तर योग्य प्रशिक्षित अॅक्युप्रेशर एक्सपर्टकडून तुम्ही हे करुन घ्यावे. 

Read More From आरोग्य