Diet

नाश्त्याला असतील हे पदार्थ तर झटपट वजन होईल कमी

Leenal Gawade  |  Apr 29, 2021
नाश्त्याला असतील हे पदार्थ तर झटपट वजन होईल कमी

आपण काय खातो? यावर आपले शरीर अवलंबून असते. हल्ली जंकफूड आणि चटपटीत खाण्याच्या नादात आपण बरेचदा आपल्या खाण्याच्या सवयी इतक्या बदलतो की,त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ लागतो. खरंतरं आहारात योग्य पदार्थ असतील तर डाएट  करायची काहीच गरज भासणार नाही.  दिवसातून आपण साधारण 4 वेळा काहीना काही खातो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण असे आपण सगळेच काही ना काही खात असतो. पण यातील जर काही पावरफुल आणि महत्वाचे असे तर ते आहे नाश्त्याचे पदार्थ. नाश्ता हा सगळ्या मिल मधील सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे नाश्ता. या नाश्त्याला तुम्ही काही पदार्थांचे सेवन केले तर तुम्हाला उपाशी राहून डाएट करण्याची वेळ येणार नाही किंवा आावडीचे पदार्थ खाण्यावाचूनही तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. 

मटकीपासून बनवा चटकदार रेसिपी आणि वजन करा कमी

भाजणीचे थालिपीठ

Instagram

महाराष्ट्रीयन घरात अगदी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे भाजणीचे थालिपीठ. हे थालिपीठ म्हणजे सकस आणि परिपूर्ण असा आहार आहे. थालिपीठाची भाजणी ही मिश्र डाळींपासून बनवली जाते. त्यामुळे पोटात अनेक वेगवेगळ्या डाळी या निमित्ताने जातात. यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळते. शिवाय हा पदार्थ छान चटपटीत लागतो. पण तरीही त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे शक्य राहते. अनेक डाएटीशन त्यामुळे खूप वेळा नाशत्याला भाजणीचे थालिपीठ खाण्याचा सल्ला देतात. शिवाय थालिपीठ खाल्ल्यामुळे भूक लवकर लागत नाही.

बेकरीसारखा लुसलुशीत लादीपाव करा घरीच,परफेक्ट रेसिपी

ज्वारीची भाकरी

Instagram

पोटभरीचा आणि सहज उपलब्ध असलेला आणि एक सोपा नाश्त्याच्या पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकरी… तांदुळाच्या भाकरीपेक्षा ज्वारीची भाकरी ही अधिक पौष्टिक असते. ही भाकरी म्हणजे फायबरचा साठा आहे. ज्वारीची भाकरी खाल्ल्यानंतर पोट चांगलेच भरलेले जाते. सकाळी सकाळी भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला अजून काहीही खाण्याची इच्छा राहणार नाही. आठवड्यातून तीन दिवस तरी सकाळी भाकऱ्या खा. तुम्हाला तुमच्या शरीरात नक्कीच बदल जाणवेल. या शिवाय फायबरच्या सेवनामुळे तुमचे पोटही साफ राहण्यास मदत मिळते. 

आम्लेट आणि ब्राऊन ब्रेड

Instagram

जर तुम्ही अंड खात असाल तर अंड आणि ब्राऊन ब्रेड हा तुमच्यासाठी एकदम बेस्ट असा नाश्ता आहे. प्रोटीन आणि फायबरचा साठा असलेला हा ब्रेकफास्ट तुम्ही खाल्ला की, तुम्हाला डाएट करायची गरज नाही. कारण हा नाश्ता चटपटीत लागतो त्यामुळे तुम्हाला बाहेरचे काही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. तुम्ही आम्लेट कमी तेलात करुनही छान चटपटीत करु शकता.त्यामुळे नाश्ता छान लागतो. 

उपवासाची रेसिपी बनवा घरी, खमंग पदार्थ रेसिपी (Upvasache Recipes In Marathi)

वर्मिसेलीचा उपमा

Instagram

रोजचा उपमा खाण्यापेक्षा जर तुम्हाला थोडासा वेगळा काहीतरी पदार्थ खायचा असेल तर तुम्ही वर्मिसेलीचा उपमा करु शकता. वर्मिसेली म्हजेच शेवया. या शेवया गव्हापासून बनवल्या जातात. त्यामुळे हा उपमाही एक परिपूर्ण असा नाश्ता आहे. या उपम्यासोबत तुम्हाला दही किंवा चटणी खाता येईल.त्यामुळे हा नाश्ता छान लागतो. 

ब्राऊन ब्रेड व्हेजिटेबल सँंडवीच

Instagram

 बर्गर किंवा पावजन्य पदार्थ हा खूप जणांना खायला आवडतो. जर तुम्हाला ते पावजन्य पदार्थ खायची खूप इच्छा होत असेल तर त्याला थोडा हेल्दी टच देण्यासाठी तुम्ही ब्राऊन ब्रेड व्हेजिटेबल सँडवीच खाऊ शकता. व्हेजिटेबल सँडवीचमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे हा पदार्थ तुमचे वजन कमी करण्यास मदत करतो. 

आता तुम्हाला जर वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही नाश्त्यामध्ये या पदार्थांचा नक्की समावेश करायला हवा. 

Read More From Diet