बॉलीवूड अभिनेत्री आणि एक्स मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) लवकरच एका मेगा बजेट चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध फिल्ममेकर मणिरत्नम (Mani Ratnam) करत आहे. ऐश्वर्याने आधीच या बातमीचा खुलासा केला होता की, ती मणिरत्नमच्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातबाबत ती फारच उत्साहीत आहे. अजून या चित्रपटाबाबत कोणतीही ऑफिशयली घोषणा करण्यात आलेली नाही.
हिंदी नाही तामिळ
या चित्रपटाबाबत सध्या बॉलीवूडच्या गल्ल्यांमध्ये खूपच चर्चा आहे. या चित्रपटाचं नाव आहे पोन्नियन सेल्वम (Ponniyin Selvan). या चित्रपटातून ऐश्वर्या पुन्हा एकदा तामिळ चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहे. सूत्रानुसार या चित्रपटात ऐश्वर्या डबल रोलमध्ये दिसू शकते. चित्रपटात ती आई आणि मुलीच्या भूमिकेत दिसेल. हिंदी नाही पण निदान तामिळ चित्रपटात ऐश्वर्या दिसणार असल्याने तिच्या फॅन्समध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण आहे. ऐश्वर्या या चित्रपटात राजकुमारीच्या भूमिकेत दिसेल. जिचं लग्न एका राजाशी होतं. पण तिच्या लग्नाच्या उपयोग ती तिच्या इच्छापूर्तीसाठी करते. ही कथा एका तामिळ कांदबरीवर आधारित आहे.
मेगा बजेट चित्रपट
हा चित्रपट मोठ्या स्तरावर बनवण्याची तयार सुरू आहे. फिल्मची निर्मिती लायका प्रोडक्शन्स करत आहे. ज्यांनी याआधी ब्लॉकबस्टर चित्रपट 2.0 ची निर्मिती केली होती. हा चित्रपट संपूर्ण देशात मोठ्या स्तरावर रिलीजही करण्यात येईल. या चित्रपटासाठी सर्वात निवड झालेली अभिनेत्रीही ऐश्वर्याच होती.
ऐश्वर्या कटप्पासोबत करणार रोमान्स
अशीही बातमी आहे की, मणिरत्नमच्या या चित्रपटात बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘कट्प्पा’ सोबत ऐश्वर्या ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. कटप्पाची भूमिका करणाऱ्या अभिनेता सत्यराजची या चित्रपटात एंट्री झाली असून ऐश्वर्या राय बच्चनच्या नवऱ्याच्या भूमिकेत तो दिसेल. महत्त्वाची बाब म्हणजे या आधी सत्यराज यांच्या भूमिकेसाठी दक्षिणेतील एका स्टारचं नाव समोर आलं होतं. सूत्रानुसार दाक्षिणात्य सुपरस्टार मोहन बाबू यांना या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आलं होतं. पण नंतर काय बिनसलं कळलं नाही.
अमिताभही असण्याची शक्यता
या चित्रपटात ऐश्वर्यासोबतच तिचे सासरे अमिताभ बच्चनही दिसू शकतात. ज्यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. पण अजून चित्रपटाला बिग बींनी होकार दिला की नाही याबाबत स्पष्ट कळलेलं नाही. पण दिग्दर्शकाने दोघांनीही अप्रोच केल्याची बातमी आहे.
P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.
हेही वाचा –
मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या साकारणार खलनायिका
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade