सिंघम अजय देवगणसाठी यंदाचे वर्षही खास असणार आहे. कारण तो एकाचवेळी वेगवेगळ्या धाटणीच्या अनेक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टीच्या सिंघमने त्याला बॉलीवूडमध्ये एक वेगळीच ओळख मिळवून दिली. त्याच्या ‘रेड’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि आता एका वेगळ्या भूमिकेत तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका फुटबॉल कोचच्या जीवनावर आधारीत सिनेमात तो फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी त्याची तयारी देखील सुरु झाल्याचे कळत आहे. आता अजय देवगण कोणत्या फुटबॉल कोचची भूमिका साकारतोय असाा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
‘या’ फुटबॉल कोचची भूमिका साकारणार अजय
अजय फुटबॉल कोट सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारणार आहे. सध्या क्रिकेट या खेळाला जरी कितीही महत्व दिले असले तरी फार पूर्वीपासूनच फुटबॉलची क्रेझ आहे आणि आता हळुहळु पुन्हा या खेळाकडे अनेक जणं वळू लागली आहेत. अजयने आतापर्यंत साकारलेल्या भुमिकांपुढे ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. त्यामुळे या भूमिकेच्या तयारीला अजय देवगण लागला आहे. कारण फुटबॉल कोच म्हणजे मैदानात खेळण्याचा अनुभवही असायला हवा. यासाठीच तो सध्या फुटबॉलच्या ग्राऊंडवर धडे गिरवत असल्याचे म्हटले जात आहे.
अॅमी जॅक्सनला करायचे आहे या ठिकाणी लग्न
कोण आहेत सय्यद अब्दुल रहिम?
सय्यद अब्दुल रहिम हे भारतीय फुटबॉल विश्वातील महत्वपूर्ण नाव असून ते १९५० ते १९६३ या कालावधीत भारतीय फुटबॉल टीमचे कोच आणि मॅनेजर होते.१९६२ साली झालेल्या आशियाई खेळांच्या फुटबॉल सामन्यात भारतीय फुटबॉल टीमने कोच सय्यद अब्दुल रहिम यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मिळवला होता. तर १९५६ रोजी मेलबर्न येथे झालेल्या ऑलिम्पिक सामन्यात उपान्त्य फेरीत पोहोचला होता. त्याच्या मार्गदर्शाखाली टीमने उत्तम कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्यांना कॅन्सर झाला आणि वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
झी स्टुडिओची निर्मिती
झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही.पण झी स्टुडिओने या संदर्भातील एक पोस्टर शेअर केले आहे. त्यानुसार झी स्टुडिओ, बोनी कपूर आणि फ्रेशलाईम फिल्मजची एकत्रित निर्मिती असलेला हा सिनेमा असणार आहे. इतिहासातील महत्वपूर्ण घटनांची साक्ष देणारे अनेक चित्रपट या वर्षभरात पाहायला मिळणार आहे. क्रीडाप्रेमींसाठी हा चित्रपट खास असणार आहे.
तानाजीच्या शुटींगला सुरुवात
अजय देवगणसाठी हे वर्ष खास आहे. कारण दोन ते तीन बायोपिकमध्ये अजय देवगण आहे. शिवाजी महाराजांचे शूरवीर योद्धा तानाजी मालुसरे यांच्यावर आधारीत ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट येत आहे. यात अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. य चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. कारण या संदर्भातील काही फोटो स्वत: अजयने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले होते. यासोबतच ‘चाणक्य’ या चित्रपटातही अजयची वर्णी लागली आहे.
‘लकी’चित्रपटाच्या टीमशी एक्सक्लुझिव्ह बातचीत
आता करणार ‘टोटल धमाल’
वर्षाच्या सुरुवातीलाच अजय देवगणचा एक विनोदी चित्रपट रिलीज होत आहे. तो म्हणजे ‘टोटल धमाल’ नावाप्रमाणे या चित्रपटाचा ट्रेलरही धमालच होता. येत्या २२फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटात अजयसोबत अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख,अर्शद वारसी, जॉनी लिव्हर, जावेद जाफरी, संजय मिश्रा अशी स्टारकास्ट आहे.
(फोटो सौजन्य- Instagram)
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje