बॉलीवूड

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’चं बजेट होणार कट

Trupti Paradkar  |  Sep 16, 2020
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’चं बजेट होणार कट

आलिया भट आणि रणबीर कपूर या लव्हबर्डचा ब्रम्हास्त्र अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.ब्रम्हास्त्र हा धर्मा प्रॉडक्शनचा एक सुपरहिरो ड्रामा चित्रपट आहे. ज्यामुळे शूटिंगसाठी भव्य दिव्य सेट उभारण्यात आले होते.  या चित्रपटाच्या चर्चेचं प्रमुख कारण होतं त्याच्या बजेटमध्ये होत असलेली वाढ. करणने आधीच या चित्रपटाचं बजेट जवळजवळ शंभर कोटी ठरवलं होतं. मात्र त्यानंतर या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन आणि व्हीएफएक्स इफेक्टमुळे त्याचं बजेट दिडशे कोटींच्याही पुढे गेलं होतं. सहाजिकच हा चित्रपट या वर्षीचा सर्वात जास्त बजेट असलेला असेल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र आता कोरोनामुळे करण जोहरने चित्रपटाचं बजेट कट करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रम्हास्त्र च्या बजेटमध्ये किती आणि कशी होणार कटौती –

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचं संकट आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे करण ब्रम्हास्त्रचं बजेट कमी करणार आहे. कोरोनामुळे अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या कामाला खीळ बसली आहे. शिवाय सुशांत सिंह राजपूत प्रकरणात करणचं नाव गोवलं गेल्यामुळे काही दिवसांपासून त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. याचा परिणाम कुठे ना कुठे तरी धर्मा प्रॉडक्शनवर झाल्याशिवाय राहणार नाही. याचाच परिणाम आता ब्रम्हास्त्र चित्रपटावर होण्याची शक्यता आहे. कारण हा चित्रपट जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि हा धर्मा प्रॉडक्शनचा सर्वात जास्त बजेट असलेला चित्रपट आहे.

चित्रपटाच्या लांबीवरही होणार परिणाम –

ब्रम्हास्त्रचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाचं जवळजवळ सर्वच शूटिंग पूर्ण झालेलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करणने अयानला उर्वरित चित्रपटाच्या बजेटमध्ये भरपूर कटौती करण्यास सांगितलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाची वेळही आता  कमी केली जाणार आहे. एडीट आणि पोस्ट – प्रॉडक्शननंतर हा चित्रपट जवळजवळ तीन तास लांबीचा झाला होता. मात्र आत अयान तो आणखी एडीट करून फक्त दोन तासांचाच करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अयानप्रमाणे एपिक ड्रामा तयार करणाऱ्या सर्व दिग्दर्शकांसाठी ही एक मोठी शिकवणच आहे. कारण आता वेळ बदलली आहे. सर्व काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही. बिग बजेट आणि तीन तासांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आता पुर्वीप्रमाणे उत्सुक असतील असं निर्मात्यांना वाटत नाही. 

ब्रम्हास्त्रमध्ये पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर एकत्र काम करत आहेत. त्यांच्यासोबतच या चित्रपटात अमिताभ बच्चन, नार्गार्जून आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटा रणबीर एक काल्पनिक सुपर हिरो साकारणार आहे. ज्याचं नाव शिवा असणार आहे. धर्मा प्रॉडक्शनचा बिग बजेट चित्रपट असल्यामुळे या चित्रपटाच्या फर्स्ट लुकपासूनच खूप थाटमाट करण्यात आला होता. फर्स्ट लुकचं प्रमोशन कुंभ मेळ्यात महाशिवरात्रीच्या निमित्ताने करण्यात आलं होतं. जिथे आलिया, रणबीर आणि अयानने महा आरतीही केली होती, दीडशे ड्रोनच्या माध्यमातून आकाशात एक ब्रम्हास्त्र करण्यात आलं होतं. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाचा पूर्णच कायापालट होणार आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर बजेट कमी करण्याची वेळ आली आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘या’ मराठी चित्रपटाला पुरस्कार

सारा अली खानचे नाव का येत आहे ड्रग्ज प्रकरणात, काय म्हणाली रिया

करण जोहरच्या घरात झालेल्या ‘त्या’पार्टीची होणार चौकशी

Read More From बॉलीवूड