मनोरंजन

लवकरच सुरू होणार कौन बनेगा करोडपती 12, बिग बीने केला खुलासा

Trupti Paradkar  |  May 3, 2020
लवकरच सुरू होणार कौन बनेगा करोडपती 12, बिग बीने केला खुलासा

‘कौन बनेगा करोडपती’ या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.  या शोसोबत जोडलेलं एक प्रसिद्ध नाव म्हणजे महानायक अमिताभ बच्चन…. और आपका अगला सवाल है… असा बिग बीचा भारदस्त आवाज ऐकण्यासाठी अनेकांचे कान नक्कीच आतूर झाले आहेत. अशातच स्वतः बिग बीने कौन बनेगी करोडपती या शोबाबत एक गुडन्यूज जाहीर केली आहे. चाहत्यांना हे ऐकून नक्कीच आनंद होईल की लवकरच या शोचा बारावा भाग सुरू होणार असून त्याची नोंदणी मे महिन्यापासून सुरू होणार आहे. 

Instagram

कधी सुरू होणार कौन बनेगा करोडपती

लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. नवीन मालिकांचे शूटिंग बंद असल्यामुळे टेलिव्हिजनवर जुन्या मालिका पुन्हा पुन्हा दाखवण्यात येत आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांना आता खरंतर फारच कंटाळा आला आहे. मात्र अशातच एक दिलासा देणारी गोष्ट घडताना दिसत आहे. कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामधुन स्वतः बिग बीने या शोची ही गुडन्यूज प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. या प्रोमोमधून अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना सांगितलं आहे की, जरी या लॉकडाऊनमुळे माणसाच्या जीवनशैलीमध्ये खंड पडला असला तरी त्यामुळे तुमच्या स्वप्नांमध्ये नक्कीच खंड पडणार नाही. हा प्रोमो बिग बींच्या घरातूनच शूट करण्यात आला आहे. ज्यामुळे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना सर्व काही पुन्हा सुरळीत सुरू होणार असा दिलासा नक्कीच मिळत आहे. यासोबतच या शोचे प्रसारण करणाऱ्या सोनी वाहिनीने ट्विटर अकाउंटवरून लवकरच बिग बी कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार असून या शोमध्ये भाग घेण्यासाठी 9 मेच्या रात्री नऊ वाजल्यापासून नोंदणी सुरू होत असल्याची बातमी दिली आहे. या शोची नोंदणी सुरू होणार असल्यामुळे सर्व प्रेक्षकांनी शो मध्ये भाग घेण्यासाठी तयारी करण्यास नक्कीच सुरूवात केली असणार आहे. लॉकडाऊन मध्ये मिळालेला रिकामा वेळ जनरल नॉलेज मिळवण्यासाठी नक्कीच वापरता येणार आहे.  

कौन बनेगा करोडपतीची वाढती क्रेझ

कौन बनेगा करोडपती हा शो देशभरात आवडीने पाहिला जातो. आतापर्यंत अनेकांची स्वप्न या शोच्या माध्यमातून पुर्ण झालेली आहेत. ज्यामुळे या शोचा टीआरपी नेहमीच अग्रस्थानी असतो. या प्रोमोच्या माध्यमातून चॅनलचा टीआरपी पुन्हा वाढवण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आलेली आहे. सध्या लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला असल्यामुळे आता केवळ कौन बनेगा करोडपतीची नोंदणीच करण्यात येणार आहे. देशभरातील जनजीवन पु्न्हा पूर्ववत झाल्यावरच या शोबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. या प्रोमोमुळे प्रेक्षकांना करोडपती होण्याचा मार्ग मात्र नक्कीच खुला झाला आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

 

बिपाशा बासूने साजरा केला लग्नाचा चौथा वाढदिवस,शेअर केला फोटो

अजून एक स्टार किडची बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी सुरू, व्हिडिओ व्हायरल

“व्हायरस मराठी” आयोजित लॉकडाउन फिल्म फेस्टिव्हल

Read More From मनोरंजन