बॉलीवूड

अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडमध्ये पूर्ण झाली 52 वर्ष, शेअर केल्या जुन्या आठवणी

Trupti Paradkar  |  Nov 8, 2021
Amitabh Bachchan completes 52 years in Bollywood in Marathi

बॉलीवूडचा महानायक आणि सर्वांचे आवडते अभिनेते अमिताब बच्चन यांना बॉलीवूडमध्ये 52 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमिताभ बच्चन आता ऐंशी वर्षांचे झाले आहेत. तरिदेखील त्यांचे स्टारडम किंचितही कमी झालेले नाही. आजही ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. ज्या माध्यमातून ते त्यांचे चित्रपट, वैयक्तिक जीवन आणि सामाजिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतंच बॉलीवूडमध्ये 52 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी काही जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

अभिनेत्री पूजा बॅनर्जीने चाहत्यांना दिली गोड बातमी, मार्चमध्ये देणार बाळाला जन्म

अमिताभ बच्चन यांचा डेब्यू चित्रपट

अमिताभ बच्चन यांनी 1969 साली सात हिंदुस्थानी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बिग बीने शेअर केलेल्या फोटोमधील पहिला फोटोत ते बॉलीवूड पदार्पणच्या काळात कसे दिसत होते हे दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत ते सर्व स्टारकास्टसोबत चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोसोबत बिग बीने शेअर केलं आहे की, 15 फेब्रुवारी 1069 साली मी माझा पहिला चित्रपट सात हिंदुस्थानी साईन केला आणि 7 नोव्हेंबर 1969 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता… आज या गोष्टीला 52 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

कतरिना कॅफ झाली ‘बोटॉक्स क्वीन’ प्लास्टिक सर्जरीने बदलला चेहरा

सात हिंदुस्थानीपासून सुरू झाला बॉलीवूड प्रवास

अमिताभ बच्चन यांच्या करिअरला सात हिंदुस्थानी या चित्रपटातून सुरुवात झाली. ख्वाजा अहमद अब्बास यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. सात भारतीयांच्या साहसाची ही कथा होती. ज्यांनी गोव्यातील पोर्तुगीज शासनाला नष्ट करण्यासाठी जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटाला त्या काळी अनेक पुरस्कार मिळाले होते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटामधून बॉलीवूला त्यांचा महानायक मिळाला. त्यानंतर बिग बीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजवर त्यांनी 200 पेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट बॉलीवूडला दिलेले आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते बॉलीवूडमध्ये कार्यरत आहेत. लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्रमधून बिग बी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. यासोबतच अमिताभ बच्चन अजय देवगनसोबत मेडे चित्रपटातही दिसणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या खेळावर आधारित चित्रपटात आणि  गुडबाय या चित्रपटातही बिग बीची मुख्य भूमिका असणार आहे.

सुश्मिता सेनच्या घरी दिवाळीत लक्ष्मीचं आगमन, चारू असोपा झाली आई

Read More From बॉलीवूड