ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सुश्मिता सेनच्या घरी दिवाळीत लक्ष्मीचं आगमन, चारू असोपा झाली आई

सुश्मिता सेनच्या घरी दिवाळीत लक्ष्मीचं आगमन, चारू असोपा झाली आई

अभिनेत्री सुश्मिता सेनच्या घरी दिवाळीच्या आधीच आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण नुकतंच तिच्या घरी लक्ष्मीच्या रूपात एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. सुश्मिताचा भाऊ रावीज सेन आणि वहिनी चारू असोपा यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे घरातले सर्वच खूप खूश झाले आहेत. राजीव सेनने याबाबत इन्स्टा अकाउंटवरून ही गोड खबर सर्वांसोबत शेअर केली आहे. चारूच्या बाळंतपणासाठी सुश्मिता सेन स्वतः हॉस्पिटलमध्ये उपस्थित होती. तिने एका पोस्टमधून या गोड बातमीचा आधीच संकेतही दिला होता. 

आलिया भटच्या बॉलीवूड डेब्यूसाठी या गोष्टीचा केला त्याग, सोनी राजदान यांचा खुलासा

राजीव आणि चारू झाले आईबाबा

सुश्मिताचा भाऊ राजीव सेन याने शेअर केलं आहे की, ईश्वरकृपेने घरात चिमुकलीचे आगमन झाले आहे. चारू पूर्णपणे फिट आणि बरी आहे. मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. तिने शेवटपर्यंत हिंमतीने तिचं धैर्य टिकवून ठेवलं. सर्वांनी केलेल्या शुभेच्छा आणि आर्शीवादासाठी खूप मनापासून धन्यवाद. देवा मी तुझा खूप आभारी आहे. या पोस्टसोबत त्याने तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये राजीव चारू आणि बाळाची काळजी घेताना दिसत आहे आणि आत्या झालेली सुश्मिता सेन दोघांचे अभिनंदन करताना दिसत आहे. घरातील सर्वांना बाळ सुश्मिता सेनच्या वाढदिवशी म्हणजे 19 नोव्हेंबरमध्ये जन्माला येईल असं वाटत होतं पण बाळाने ऐश्वर्या रायच्या जन्मदिवशी म्हणजेच 1 नोव्हेंबरला जन्म घेतला ही एक मजेशीर गोष्ट घडली. 

अंकिता लोखंडेच्या घरी लगीनघाई, या तारखेपासून सुरू होणार लग्नाचे विधी

ADVERTISEMENT

बाळाच्या आगमनाने घर झालं आनंदी

सुश्मिता सेनने यावर्षीच तिचा भाऊ आणि वहिनी लवकरच आईबाबा होणार हे चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. तिने तिच्या अकाउंटवरून चारूच्या बेबी बंप आणि डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले होते. ऑगस्ट महिन्यात चारूचे डोहाळजेवण थाटामाटात झाले होते. चारू असोपा ही टेलीव्हिजन अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे. 2019 मध्ये तिने सुश्मिताचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केलं. दोघंही वेगवेगळ्या प्रांतातून असल्यामुळे दोन पद्धतीने हे लग्न पार पडलं होतं. राजस्थानी आणि बंगाली पद्धतीने गोव्यात हा विवाहसोहळा झाला होता. आता ते दोघंही आईबाबा झाल्यामुळे त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे असं म्हणावं लागेल. 

प्राजक्ताच्या ‘साजनी’ या नवीन गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती

02 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT