मनोरंजन

अभिनेत्री अंजुम फकिहने दिली प्रेमाची कबुली ‘हा’ आहे नवा क्रश

Trupti Paradkar  |  Jul 13, 2020
अभिनेत्री अंजुम फकिहने दिली प्रेमाची कबुली ‘हा’ आहे नवा क्रश

लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या दशहतीमुळे गेले काही महिने सर्वजण घरात कोंडून होते. कोरोनाची भिती अजूनही कमी झाली नसली तरी अनलॉकमुळे आता पुन्हा सर्वकाही सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. बॉलीवूडप्रमाणेच टेलिव्हिजन दुनियेवरही याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. ‘कुंडली भाग्य’ आणि ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’ या दोन मालिका भारतीय टेलिव्हिजनवरील आवडत्या मालिकांपैकी आहेत. या मालिकांनी आपल्या चित्रीकरणाला पुन्हा नव्याने सुरूवात केली आहे. एवढंच नाही तर लॉकडाऊननंतर मोठा धमाका करण्यासाठी या दोन मालिका मिळून तीन तासांचा एक खास महासंगम एपिसोड ‘नये कल की सुनहरी शुरूआत’ चित्रीत करण्यात आला आहे. या मालिकांची सुरूवात तर जोरदार होईलच पण यासोबतचच कुंडली भाग्यची अभिनेत्री अंजुम फकिहने आणखी एक धमाकेदार बातमी चाहत्यांसाठी शेअर केली आहे. ज्यामुळे या महाएपिसोडची रंगत आणखीनच वाढणार आहे. 

Instagram

अंजुम फकिह पडली आहे प्रेमात…

अभिनेत्री अंजुम फकिह ही ‘कुंडली भाग्य’मध्ये हसरी–खेळकर ‘सृष्टी’ नावाची भूमिका करत आहे. लॉकडाऊननंतर होणाऱ्या या महाएपिसोडसाठी ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’ मधील नायक निशांत मलकानी याच्यासोबत काम करता करता तिने एकागोष्टींचा खुलासा करत आपल्या प्रेमाची कबुलीच दिली आहे. मात्र तिचे प्रेम निशांतवर आहे की एजेवर ते मात्र गुलदस्त्यात आहे. निशांतची डॅशिंग ऑनस्क्रीन व्यक्तिरेखा ‘एजे’वर तिने आपला क्रश असल्याचं सर्वांसमोर कबूल केले. अंजुम सोशल मीडिया स्टार असून ती चित्रीकरणातील फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिने शेअर केलेल्या दोन व्हिडीओजनां चाहत्यांनी खास प्रतिसाद दिला आहे. यातील एकात अंजुम कनिकाला म्हणजेच ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’ची नायिका हिला तिचा सहकलाकार निशांत मलकानीची विचारपूस करताना दिसत आहे. तर दुसऱ्यात ती पटकन आपल्या शॉटसाठी जाण्याआधी तयार होताना निशांतवर तिचा क्रश असल्याचे सांगते. ज्यामुळे अंजूमचा निशांतवर क्रश असल्यासारखं जाणवत आहे. चित्रीकरणाला सुरूवात झाल्यानंतर आता प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांची अशी अनेक गुपितं उघड होणार आहेत. त्याची सुरूवात या व्हिडिओने झाली आहे. टेलिव्हिजन मालिका आणि त्यात काम करणारे कलाकार यांचे प्रेक्षकांसोबत नेहमीच एक अतुट नातं असतं. त्यामुळे त्यांच्या जीवनातील अशा खाजगी आणि खास गोष्टी जाणून घ्यायला प्रेक्षकांना नक्कीच आवडतं. आता अंजुम खरंच निशांतच्या प्रेमात आहे की या महाएपिसोडचा हा एक भाग आहे हे मालिका सुरू झाल्यावर नक्कीच समजेल. 

Instagram

अंजुमचा करिअर ग्राफ

अंजुम फकिह एक सुपर मॉडल असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या टेलिव्हिजनवरील ती एक हॉट, सेक्सी आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या बोल्ड फोटोशूट आणि अफेअर्ससाठी ती नेहमीच चर्चेत असते. अंजुमने 2015 साली एका चॅट हाऊस शोमधून टेलिव्हिजनमध्ये डेब्यू केलं होतं. याशिवाय तिने टाईम मशिन, तेरे शहर में, एक था राजा एक थी रानी, देवान्शी अशा मालिकांमध्ये झळकली होती. 

Instagram

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत येणार छोटे शिवबा!

अभिनेता कार्तिक आयर्नने केला एक मोठा खुलासा, लवकरच करणार लग्न

KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल

Read More From मनोरंजन