बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. ‘रब ने बना दी जोडी’ मधून आपल्या करिअरला सुरुवात केलेल्या अनुष्काने विविध भूमिका साकरल्या असून तिचा फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. अनुष्का सध्या मियामीमध्ये विराट कोहलीबरोबर सुट्टी एन्जॉय करत आहे. तिचा बिकिनीमधील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. अनुष्का आणि विराट दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. आपले वैयक्तिक आयुष्यातील आणि अगदी व्यावसायिक आयुष्यातील फोटोही हे दोघं नेहमीच शेअर करत असतात. असाच एक बिकिनीमधील फोटो अनुष्काने पोस्ट केला असून काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला आहे.
भुलभुलैय्या 2 : कार्तिक आर्यनचा पहिला लुक आला समोर
सुट्टीचा आनंंद घेत आहे अनुष्का
अनुष्का शर्मा सध्या तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली याच्यासह मियामीच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यावेळीच काढलेला एक बिकिनीमधील फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत आहे. नारिंगी रंगाच्या या बिकिनीमध्ये अनुष्का जितकी हॉट दिसत आहे तितकीच ती सुंदरही दिसत आहे. या स्ट्राईप्ड प्रिंट बिकिनीमध्ये अनुष्का समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बसून स्मितहास्य करत असल्याचं दिसत आहे. तसंच गॉगल लावून अनुष्काने इअररिंग्ज घालून हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये मिनिमल मेकअपमध्ये अनुष्काचं सौंदर्य खुलून दिसत आहे. तिने अगदी केसांचं सेटिंगही साधंच केलं आहे. तर फोटोला कॅप्शन दिली आहे, ‘सन किस्ड अँड ब्लेस्ड’. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला असून विराट कोहलीनेदेखील या फोटोला कमेंट केली आहे. विराटने हार्ट इमोजी देत अनुष्कावरील आपलं प्रेम कमेंटमध्ये दाखवून दिलं आहे. तिच्या चाहत्यांनी तिला सनशाईन, लव्हली, हॉट, नाईस अशा कमेंट्स दिल्या आहेत. विराटने नेहमीच अनुष्काला तिच्या प्रत्येक बाबतीत साथ दिली आहे.
एकता कपूर आणि मोना सिंग याच्या मैत्रीत का पडली फूट
अनुष्काने सध्या कोणताही चित्रपट स्वीकारलेला नाही
अनुष्का मागच्या वर्षी आनंद एल. रायच्या झिरो या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान आणि कतरिना कैफही दिसले होते. मागच्या वर्षी अनुष्काचे झिरो, सुई धागा आणि परी हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले पण एकाही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळू शकलेलं नाही. पण त्यानंतर यावर्षी तिने एकही चित्रपट स्वीकारलेला नाही. तर सध्या अनुष्का बऱ्याचदा विराट बरोबर क्रिकेट दौऱ्यावर त्याला साथ देताना दिसते. शिवाय तिने नुश नावाचा ब्रँड लाँच केला असून सध्या ती त्या व्यवसायातही व्यस्त आहे. तिच्या या ब्रँडच्या कपड्यांसाठी बऱ्याचदा तिचं फोटोशूट होत असून ती त्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण अनुष्का पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी दिसणार हा प्रश्न सध्या तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिन अजूनही कोणताही चित्रपट साईन केला नसल्याने ती आता संसारात गुंतून जाणार का अशी चर्चाही रंगू लागली आहे. सध्या तरी ती आपली सुट्टी विराटबरोबर एन्जॉय करत असून तिला या सगळ्या प्रश्नांची नक्कीच काळजी नसणार. तिचे आणि विराटचे असेच एकमेकांबरोबर फोटो पाहून तिचे चाहतेही आनंदी होत आहेत.
अनुष्का- विराटने केली स्पीडबोटची सफर, पाहा व्हिडिओ
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje