DIY सौंदर्य

फाऊंडेशन आधी चेहऱ्याला प्राईमर लावणे म्हणून असते आवश्यक

Leenal Gawade  |  Oct 21, 2019
फाऊंडेशन आधी चेहऱ्याला प्राईमर लावणे म्हणून असते आवश्यक

प्रत्येक महिलेला बेसिक मेकअप हा करताच आला पाहिजे. पण मेकअप येण्यासोबतच मेकअप संदर्भातील काही गोष्टी माहीत असणे आवश्यक असते. काही महिला फाऊंडेशनच्या रंगावरुन फारच गोंधळात पडतात. तर काहींना ब्लशर कसे लावायचे ते कळत नाही. पण हे सगळे तुमच्या चेहऱ्याला लावण्याआधी तुम्हाला तुमच्या त्वचेला काही होऊ नये म्हणून प्राईमर लावायचे असते. आता या आधी तुम्ही प्राईमर संदर्भात नक्कीच ऐकले असेल. पण त्याचा वापर का करायचा हे तुम्हाला माहीत हवा. म्हणूनच आज जाणून घेऊया फाऊंडेशन आधी चेहऱ्याला लावणाऱ्या प्राईमवर विषयी

स्ट्रेटनिंगमुळे तुमचेही केस झाले आहेत खराब मग एकदा वाचाच

चेहऱ्यावर नेमकं काय करते प्राईमर?

shutterstock

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लहान लहान ओपन पोअर्स येतात. तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये मेकअप गेला तर तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात किंवा तुम्हाला अन्य काही त्रास होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या चेहऱ्याला प्राईमर लावले तर तुमच्या त्वचेवर एक संरक्षक लेअर तयार करते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या आत मेकअप जात नाही. त्यामुळे फाऊंडेशनच्या आधी तुम्हाला प्राईमर लावायचे असते.  ते लावल्यानंतर तुमचा मेकअप चांगला दिसतो आणि अधिक काळ टिकतो. त्यामुळे किंचितसे प्राईमरही तुमच्या चेहऱ्यावर खूप मोठा फरक आणते.

चेहरा करते एकसारखा

shutterstock

आता पोअर्स बंद करण्यासोबत प्राईमरचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील असलेले पिंपल्स, अॅक्ने मार्क्स लपवायला ते मदत करते. त्यामुळे तुमची त्वचा एकसारखी दिसते. तुम्हाला फाऊंडेशन लावल्यानंतर तुमची त्वचा एकसारखी दिसते. जी प्रत्येकालाच हवी असते. त्यानंतर मेकअप लावल्यानंतर तुमची त्वचा एकदम परफेक्ट दिसू लागते.

असे लावा प्राईमर

चेहऱ्याला प्राईमर लावण्याचीही एक पद्धत आहे. 

  1. चेहरा स्वच्छ धुवून घ्या. 
  2. चेहरा स्वच्छ पुसून कोरडा करुन घ्या. 
  3.  हातावर प्राईमर अगदी किंचित घेऊन ते चेहऱ्याला लावा. 
  4. चेहरा फार चोळू नका. 
  5. मेकअप काढताना प्राईमरही काढणे आवश्यक असते. कारण तुमच्या चेहऱ्यानेही श्वास घेणे गरजेचे असते.  त्यामुळे ते लावल्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ करायला विसरु नका.

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

प्राईमरचे प्रकार

आता जर तुम्ही प्राईमरचे फायदे माहीत करुन घेतल्यानंतर तुम्हाला जर प्राईमर घ्यायचे असेल तर तुम्हाला बाजारात अनेक प्राईमर दिसतील. अनेक चांगल्या ब्रँडचे प्राईमर बाजारात मिळतात. तुम्हाला फाऊंडेशनच्या रंगाप्रमाणे आणि ट्रान्सफरंट अशा प्रकारातले प्राईमरही मिळतील. तुम्हाला तुमच्या त्वचेला बेस्ट वाटेल असा प्राईमर निवडायचे आहे. आम्ही तुमच्यासाठी काही खास प्राईमर निवडले आहेत तुम्ही त्यांचीही निवड करु शकता. तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार हे प्राईमर निवडता येतील. प्राईमर हे तुमच्या बजेटमध्ये असल्यामुळे तुम्हाला ते तुमच्या मेकअप किटमध्ये नक्कीच अॅड करता येतील.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From DIY सौंदर्य