बॉलीवूड

हिंदीमध्ये शाहीदने साकारलेला अर्जुन रेड्डी AKA कबीर सिंह पाहिलात का

Leenal Gawade  |  Apr 8, 2019
हिंदीमध्ये शाहीदने साकारलेला अर्जुन रेड्डी AKA कबीर सिंह पाहिलात का

जर तुम्ही साऊथ इंडियन चित्रपटाचे चाहते असाल तर तुम्ही विजय देवरकोंडाचा ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल किंवा तुम्ही तो पाहिला नसेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण अर्जुन रेड्डी हा चित्रपट आता हिंदीमध्ये येत आहे. हिंदीमध्ये शाहीद कपूर अर्जुन रेड्डीची भूमिका साकारत असून यात त्याचे नाव कबीर सिंह असे आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आला असून शाहीदने साकारलेला कबीर एकदम फर्स्ट क्लास आहे असे म्हणायला हवे.

करण जोहरला करायचंय कंगना सोबत काम? 

कसा आहे टीझर?

विजय देवरकोंडाचा अर्जुन रेड्डी 2017 साली रिलीज झाला होता.या चित्रपटाला कोणत्याही अन्य भाषेतून डब करण्यात आले नाही. त्यामुळे इतर भाषिकांची निराशा झाली होती. पण फायनली हिंदीमध्ये हा चित्रपट येतोय. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. साऊथच्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाचा ट्रेलर आहे. अगदी तसाच आहे असे म्हणायला हवे. फक्त साऊथमध्ये अर्जुन शालिनीला लिप लॉक करताना दिसतो. तर या चित्रपटात तो किआराला गालाला किस करताना… इतकाच फरक या टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. कबीर ‘द अँग्री मॅन’ आणि तितकाच हुशार सर्जन शाहीदने मस्त वठवलाय असे दिसत आहे. शिवाय हा टीझर पाहून तुम्हालाही शाहीदची निवड विजयच्या रोलसाठी परफेक्ट असल्याचे वाटल्यावाचून राहणार नाही.

शाहीद पहिल्यांदाच साकारतोय अशी भूमिका

पद्मावतमध्ये साकारलेल्या राजा रतनसिंहच्या भुमिकेतून बाहेर पडत शाहीद एका व्यक्तिची भूमिका साकारतोय ज्यात तो तुम्हाला दारु, चरस, गांजा जी काही व्यसने आहेत ती सगळी करताना तो दिसणार आहे. त्यामुळे शाहीदच्या फॅनसाठी हा वेगळाच अनुभव असणार आहे. शाहीदला या आधीही बऱ्यापैकी गुडीगुडी भूमिका करताना पाहिले आहे हा म्हणजे उडता पंजाबमध्ये त्याने अशाच प्रकारची भूमिका साकारली होती.पण कबीर हा थोडा वेगळा आहे कारण कबीर नुसताच एक चरसी नाही तर चांगला डॉक्टर आहे. त्यामुळेच शाहीदसाठी हा वेगळा अनुभव असेल आणि त्याच्या फॅन्ससाठीसुद्धा

मिलिंद सोमण आणि अंकिताचा हॉट अंदाज पाहिलात का?

लवकरच येणार ट्रेलर

कबीर सिंहचा टीझर पाहून सिनेमाच्या रिलीजची उत्सुकता लागते. पण थोडं थांबा कारण आधी ट्रेलर तर येऊ द्या. १९ जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण त्या आधी या चित्रपटाचा ट्रेलर येणार आहे.

100 उत्कृष्ट चित्रपटात 1968 साली आलेल्या पडोसनचा समावेश

साऊथचा रिमेक ठरेल का सुपरहिट

आता साऊथचा हा पहिलाच चित्रपट रिमेक करण्यात येत नाहीए. तर या आधीही बरेच चित्रपट हिंदीमध्ये रिमेक करण्यात आले आहेत. शिवाय हिंदी चित्रपटही साऊथमध्ये रिमेक करण्यात  आले आहे. उदाहरणादाखल द्यायचे झाले तर अक्षय कुमार आणि परेश रावलचा ‘oh my god’ हा चित्रपट gopala gopla नावाने साऊथमध्ये प्रदर्शित झाला. तर एस.एस. राजमौलीचा प्रतिघात हा चित्रपट 2006 साली रिलीज झाला. तर तब्बल 6 वर्षांनी राऊडी राठोड हा चित्रपट प्रभुदेवा यांनी हिंदीमध्ये तयार केला. असे अनेक प्रयोग या आधीही हिट झाले आहेत. त्यात अर्जुन रेड्डी हा साऊथचा प्रसिद्ध चित्रपट त्याने तिथे भरघोस कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट  बॉक्स ऑफिसवर हवा करणार यात काही शंका नाही.

(सौजन्य- Youtube, Instagram)

Read More From बॉलीवूड