लाईफस्टाईल

100+ आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 2022 | Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha

Trupti Paradkar  |  Jul 9, 2022
100+ आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 2022 | Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha

आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पायी चालणारी दिंडी, चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळ नाद, भोळ्या भाबड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी असलेली आस आणि विठ्ठल माऊलीचे भक्ताला प्रेमपान्हा पाजणारे मनोहर रूप. भारतीय कालदर्शिकेनुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात. वर्षभरातील ही एक महत्त्वाची एकादशी असते. सध्या कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग मुळे असं करणं शक्य नसलं करी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi) शक्य आहे. यासाठीच आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha In Marathi) आणि आषाढी एकादशी खास कोट्स (Ashadi Ekadashi Quotes In Marathi) नक्की शेअर करा. त्यासोबतच कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ही शेअर करा.

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi)

Ashadhi Ekadashi Wishes In Marathi

आषाढी एकादशीला महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भक्त या दिवशी पंढरपूरच्या दिंडीत सहभागी होतात. आषाढी एकादशीची माहिती सर्वांना असतेच. आषाढी एकादशीनिमित्त सर्व भक्तगणांना द्या या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi).

यंदा आषाढी एकादशीची सुरूवात करा पहाटेची भक्तीगीते ऐकून 

आषाढी एकादशीनिमित्त सुविचार (Ashadhi Ekadashi Quotes In Marathi)

Ashadhi Ekadashi Quotes In Marathi

आषाढी एकादशीला पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले जाते. महाराष्ट्रात आजवर अनेक संत होऊन गेले. यासाठीच आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी मनात घोळवत ठेवा संताचे हे अभंग आणि सुविचार (Ashadi Ekadashi Quotes In Marathi).

यासोबतच आषाढी एकादशीला मानसिक समाधान मिळवण्यासाठी वाचा हे आध्यात्मिक सुविचार (Spiritual Quotes In Marathi)

आषाढी एकादशीसाठी स्टेटस (Ashadhi Ekadashi Status In Marathi)

Ashadhi Ekadashi Status In Marathi

कोरोनामुळे मागच्या वर्षीपासून पंढरपूरची वारी सगळेच मिस करत आहेत. यंदा जरी पंढरपूरात भक्तांची मांदियाळी जमा नाही झाली तरी इन्स्टाग्राम, फेसबूकवर आषाढी एकादशीला हे खास स्टेटस (Ashadi Ekadashi Status In Marathi) ठेवून तुम्ही आषाढी एकादशी साजरी करू शकता. 

आषाढी एकादशीचे मेसेज (Ashadhi Ekadashi Messages In Marathi)

Ashadhi Ekadashi Messages In Marathi

आषाढी एकादशीच्या आनंद आणि उत्साहात भर टाकण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना व्हॉटसअप मेसेज, शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha)संदेश पाठवण्याची सध्या पद्धत आहे. तेव्हा आषाढी एकादशीचे मेसेज (Ashadhi Ekadashi Messages In Marathi) पाठवून करा आजचा दिवस साजरा. 

यासोबत जाणून घ्या आषाढी एकादशीनंतर लगेच येणाऱ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व आणि शुभेच्छा 

आषाढी एकादशीचे अभंग (Ashadhi Ekadashi Abhang In Marathi)

Ashadhi Ekadashi Abhang In Marathi

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सोबतच तुम्ही सोशल मीडियावर खास विठूमाऊलींचे अभंग ही शेअर करू शकता. पाहा खास आषाढी एकादशीचे अभंग (Ashadhi Ekadashi Abhang In Marathi).

1. चला मंगळ वेढे पाहू …
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….|

वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती…
ती कथा मुखाने गाऊ…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….

भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी…
आदराने सुमने वाहू…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….

कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी…
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ…

2. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

3. ह्रदय बंदी खाना केला 
आत विट्ठल कोंडिला 
शब्दी केलि जड़ा जोड़ी 
विट्ठल पायी घातली वेडी 
धरिला पंढरीचा चोर..

4. भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या  बोलानं शांति नाही मनी । 
देव बाजारचा.

5. तुला साद आली तुझ्या लेकरांची
लंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

6. एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्‍वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसीं ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षितां तांबुल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥३॥
सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण नवजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महोमेरु ॥५॥
तया दंडी यमदुत । झालेस तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकाद्शी चुकलिया ॥६॥

7. पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो  एका दिसें । फ़राळाच्या मिसें धनी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथ पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥४॥
तुका म्हणे कां रे सकुमार झालासी । काय जाब देसी यमदुतां ॥५॥

8. आनंदले वैष्णव गर्जती नामें । चौदाही भुवनें भरली परब्रम्हे ॥१॥
नरहरि नरहरि नारायणा । सनकसनंदन मुनिजनवंदना ॥२॥
गातां वातां वाचता प्रेमें उल्हासें । चराचरींचे दोष नाशियले अनायासें ॥३॥
हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं । तयातें देखोनि हरि चार्‍ही बाह्या पसरीं ॥४॥
अंध्रिरेणु ज्याचा उद्धरिते पतिता । प्राकृतवाणी केवि वानुं हरिंभक्ता ॥५॥
तीर्थें पावन जिहीं धर्म केला धडौती । कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥
मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहाले॥७॥
बापरखुमादेविवरा पढयंती जिया तनु । तया संतचरणीं स्थिर हो कां मनु ॥८॥

9. पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । तीं मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥
परमानंदु आजि मानसीं । भेटी झाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ॥ ३॥
एकएका तीर्थहूनी आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥
निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥
वत्स बिघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥
हें पियुषा परतें गोड वाटत । पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले । संत भेटतां भव दु:ख फ़िटलें ॥८॥

10. उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजंती । आनंदे प्रेमें गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचे ॥१॥
आले हरिचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहले दिप्पट । पळती थाट दोषांचे ॥२॥
तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी ।बारा वाटा पळताती ॥३॥
सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रुदयकमळीं । शांति क्षमा तया जवळीं । जीवें भावें अनुसरल्या ॥४॥
सहस्त्र नामाचें हतियार । शंखचक्राचे शृंगार । अति बळ वैराग्याचें थोर । केला मार षडूवर्गा ॥५॥
ऎसे एकांग वीर । विठ्ठल रायाचे डिंगर । बापरखुमादेविवर । तिहीं निर्धारीं जोडीला ॥६॥

Read More From लाईफस्टाईल