Diet

रिकाम्या पोटी कधीही घेऊ नये महत्त्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

Aaditi Datar  |  Sep 25, 2019
रिकाम्या पोटी कधीही घेऊ नये महत्त्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात महिला इतक्या बिझी झाल्या आहेत की, कधी कधी त्यांना व्यवस्थित जेवायलाही वेळ मिळत नाही. कोणाला घरकामामुळे उशीर होतो तर कोणाला ऑफिसच्या कामाचं टेन्शन आहे. अनेकदा महिला रिकाम्या पोटी तासंतास काम करत राहतात. असंही होतं की, कामाच्या गडबडीत महिलांचं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर वेळीच सावधान व्हा. खासकरून रिकाम्या पोटी जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा तो योग्य ठरत नाही. कारण आपल्या आयुष्य आपण घेतलेल्या निर्णयावर आधारित असतं. चांगले निर्णयच आपल्याला भविष्यात यशाच्या मार्गावर नेतात. एका स्टडीनुसार बिजनेस डील, पगार यासारख्या मोठ्या बाबींवर कधीही रिकाम्या पोटी निर्णय घेऊ नये.

रिकाम्या पोटी राहण्याचे नुकसान

जेव्हा आपण रिकाम्या पोटी असतो तेव्हा आपला संयम कमी होतो आणि आपल्या क्षमतेपेक्षा एखादी गोष्ट कमी मिळाल्यास असंतुष्टता निर्माण होते. रिकाम्या पोटी आपण नेहमीप्रमाणे नसतो आणि स्वतःला रिलॅक्सही करू शकत नाही. अशावेळी निर्णय घेणं कठीण होतं. रिकाम्या पोटी असल्यास आणि एनर्जी लेव्हल डाऊन असल्यावर आपल्यामध्ये जास्त राग आणि चिडचिडलेपणा येतो. ज्यामुळे शरीराचं नुकसान होतं. रिकाम्या पोटी एखाद्या गोष्टीसाठी महिला लवकर चिंतित होतात आणि त्यामुळे त्रास वाढतो. म्हणून पोट रिकामं असल्यास एखादी समस्या नसतानाही आपण त्रागा करू लागतो.

शॉपिंग आणि आऊटिंग

एवढंच नाहीतर शॉपिंगला जातानाही रिकाम्या पोटी बाहेर पडू नये. कारण यामुळे आपण नीट निर्णय घेऊ शकत. त्यामुळे आपण एखादं अनहेल्दी ऑप्शन निवडतो किंवा बजेटपेक्षा जास्त शॉपिंगही करू शकतो. या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत. अनहेल्दी खाणं आरोग्यासाठी हानीकारक आहे आणि बजेट बिघडल्याने महिलांचा तणाव अजून वाढू शकतो. यासाठी एक प्रयोगही करण्यात आला होता. ज्यामध्ये भाग घेणाऱ्यांना रिकाम्या पोटी आणि खाल्ल्यानंतर प्रश्न विचारण्यात आले. या प्रयोगात आढळलं की, भरल्या पोटी लोकांनी लगेच उत्तर दिली आणि ते आनंदीही होते. रिसर्चर्सना आढळलं की, रिकाम्या पोटी लोकांच्या प्रायोरिटीज बदलतात. यावरून हेच कळतं की, याचा परिणाम तुमच्या आर्थिक आणि नातेसंबंधांवरही पडू शकतो.

लाँग टर्म प्लॅनिंगसाठी हानीकारक

तुम्ही जर रिकाम्या पोटी असाल तर तुम्हाला एखाद्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणंही कठीण होतं. ज्याचा परिणाम तुमच्या भविष्यातील प्लॅनिंगवरही होऊ शकतो. मार्केटिंग क्षेत्रातील लोकं अशा गोष्टींचा नेहमी फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महिलांनी आणि पुरूषांनीही याबाबतीत सजग असावं. जेव्हा तुम्ही भरल्या पोटी असता तेव्हा जास्त फ्रेश असता. त्यामुळे तुमचे निर्णय आणि आवडही बदलते.

नकारात्मक विचार

आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण कधी कधी असं वाटतं की, आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये खूप वाईटरित्या अडकलो आहोत आणि बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नाही. अशा परिस्थितीत बऱ्याचश्या महिला डिप्रेशनमध्येही जातात किंवा आक्रमक वागू लागतात. पण जर तुम्ही अशा परिस्थितीत आहार सोडल्यास परिस्थिती अजून बिकट होऊ शकते. कारण रिकाम्या पोटी डोक्यात जास्त नकारात्मक विचार येतात. त्यामुळे महिलांनी खासकरून आपल्या डाएटची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुमचं डाएट हेल्दी असेल तर विचारांवर ताबा ठेवण्यास मदत मिळेल. 

मग पुढच्या वेळी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी किंवा अगदी शॉपिंगला जातानाही व्यवस्थित आहार घेऊनच बाहेर पडा. नक्कीच चांगले रिजल्ट्स मिळतील.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

हेही वाचा –

जीभेच्या रंगावरून ओळखा तुमच्या आरोग्य समस्या

Black Tea मुळे आरोग्य राहतं फिट, सौंदर्यासाठीही होतो उपयोग

रात्री केस धुण्याची सवय केसांच्या आरोग्यासाठी ठरु शकते घातक

Read More From Diet