आरोग्य

पाण्यात मिसळा हे पदार्थ आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या, होईल फायदा

Dipali Naphade  |  May 16, 2022
ayurvedic-herbal-water-drinks-for-health-benefits-in-marathi

पाण्याची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते. शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर जाण्यासाठी नियमित दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसात तर बाहेरचे तापमान अधिक असल्यामुळे पाण्याची अधिक आवश्यकता भासते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात. पण केवळ पाणीच आपल्या शरीरातील सर्व आवश्यकता पूर्ण करू शकते का? तर अजिबात नाही. साध्या पाण्यामध्ये तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास अथवा हर्बल वॉटर ड्रिंक्स (Herbal Water Drinks) तुमच्या नियमित आयुष्यात समाविष्ट करून घेतल्यास, त्याचा नक्कीच फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात असेल कोणते पदार्थ तुम्ही मिसळू शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल याची महत्त्वाची माहिती. 

धन्याचे पाणे (Coriander Seeds Water)

धन्यामध्ये विटामिन के, विटामिन सी आणि विटामिन ए अधिक प्रमाणात असते असे म्हटले जाते. हे शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुम्ही एक चमचा धने पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या. गाळलेले पाणी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी प्या. शरीर थंड ठेवण्यासह हे धन्याचे पाणी बॉडी डिटॉक्स आणि किडनी डिटॉक्ससाठीही (Kidney Detox) उपयुक्त ठरते. तसंच शरीराला येणारी सूज अथवा जळजळ कमी करण्यासाठीही याची मदत मिळते. 

मेथी दाण्याचे पाणी (Fenugreek Seeds Water)

मेथीच्या दाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. वजन कमी करण्यासाठी याचा महत्त्वाचा फायदा होतो. याशिवाय मेथी दाण्याचे पाणी अत्यंत उपयुक्त असते. मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठीही रिकाम्या पोटी तुम्ही उठल्या उठल्या मेथी दाण्याचे पाणी प्यावे. याशिवाय तुमच्या पचनशक्तीची समस्या असल्यास तीदेखील पाण्यामुळे कमी होते. शिवाय कोलस्ट्रॉल कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ज्या व्यक्तींना कफ आणि पित्ताची समस्या आहे त्यांच्यासाठीही हे मेथीचे पाणी अत्यंत लाभकारक ठरते. 

खसचे पाणी (Khus Water)

खसमध्ये जिंकचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी याचा अधिक उपयोग करून घेता येतो. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्याशिवाय डोळ्याची जळजळ आणि इन्फेक्शन असल्यासही कमी करण्यासाठी याची मदत मिळते. जिंक आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम ठरते आणि याचे शरीरामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पाण्यात खस मिसळून अथवा खसचे सरबत पिणेही शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. 

चिया सीड्सचे पाणी (Chia Seeds Water)

Chia Seeds Water

चिया सीड्सचे पाणी पिणे आजकाल अत्यंत चांगले मानण्यात येते. यामुळे मासिक पाळीच्या दिवसात ब्लोटिंग (पोटफुगी) होत असेल तर ती कमी होण्यास मदत होते. तसंच वजन कमी करण्यासाठीही या पाण्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. चिया सीड्समुळे पोटांसंबंधिक समस्या सोडविण्यास अधिक मदत मिळते. पचनशक्ती सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही चिया सीड्सचे पाणी नक्की पिऊ शकता. 

सब्जाच्या बी चे पाणी (Basil Seeds Water)

Sabja Seeds Water

सब्जा अर्थात तुळशीच्या बी चे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. सरबत करून त्यात सब्जाचे बी अथवा दुधातून सब्जाचे बी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात प्यावे. चीया सीड्सप्रमाणेच याचे गुणधर्म आहेत. विशेषतः शरीर थंड राखण्यासाठी आणि पोटात जळजळ होत असेल अथवा पोटात अॅसिडीची समस्या जाणवत असेल तर सब्जाचे बी अत्यंत उत्तम ठरते. त्यामुळे तुम्ही पाण्यातूनही नुसते सब्जाचे बी भिजवून प्यायल्यास, तुम्हाला फायदा मिळतो. 

बडिशेपचे पाणी (Fennel Water)

Fennel Water

तुम्हाला जर अपचनाची समस्या अधिक त्रासदायक ठरत असेल तर सकाळी उठल्यावर तुम्ही बडिशेपेचे पाणी प्यावे. हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरते. गॅसची समस्या कमी होते आणि याशिवाय मेटाबॉलिजमही योग्य होते. तुम्हाला जर भूक लागत नसेल तर त्यासाठीही तुम्ही बडिशेपेचे पाणी पिऊ शकता. तसंच बडिशेपचं सरबतही तुम्हाला उपयुक्त ठरतं. 

तसे तर हे सारे पदार्थ आयुर्वेदिक आहेत आणि तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात. मात्र तुम्हाला कोणतीही शारीरिक समस्या असेल अथवा यापैकी कोणत्याही पदार्थाची अलर्जी असेल तर तुम्ही आधी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्या आणि नंतरच याचे सेवन करावे. कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य